अवघ्या 20 रुपयांच्या समभागाने गुंतवणूकदारांना केले मालामाल, एका लाख गुंतवून 31 लाखांचा परतावा

Share Market | गेल्या काही दिवसांत अगदी कवडीमोल भावात मिळणाऱ्या penny stock ने गुंतवणूकदारांना चांगली कमाई करून दिली आहे. अशा समभागांची किंमत साधारण 25 रुपयांच्या आसपास असते. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांना हे समभाग खरेदी करणे शक्य असते.

अवघ्या 20 रुपयांच्या समभागाने गुंतवणूकदारांना केले मालामाल, एका लाख गुंतवून 31 लाखांचा परतावा
शेअर मार्केट
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 1:04 PM

मुंबई: सध्या शेअर बाजाराच्या निर्देशंकांनी विक्रमी टप्प्याला गवसणी घातली आहे. त्यामुळे दीर्घकालीन कालावधीसाठी पैसे गुंतवणारे लोक अक्षरश: मालामाल झाले आहेत. आगामी काही महिन्यांमध्ये मुंबई बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स एक लाखांचा टप्पा ओलांडेल, असे भाकीत वर्तविले जात आहे. अशावेळी आतापासूनच गुंतवणूक करुन चांगला फायदा पदरात पाडून घेण्याची संधी आहे.

गेल्या काही दिवसांत अगदी कवडीमोल भावात मिळणाऱ्या penny stock ने गुंतवणूकदारांना चांगली कमाई करून दिली आहे. अशा समभागांची किंमत साधारण 25 रुपयांच्या आसपास असते. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांना हे समभाग खरेदी करणे शक्य असते. सध्याच्या घडीला शेअर मार्केटमध्ये असे अनेक पेनी स्टॉक आहेत. भविष्यात हे पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना चांगली कमाई करुन देऊ शकतात.

अशाच एका समभागांपैकी एक म्हणजे Xpro India. गेल्या एका महिन्यात या समभागाची किंमत 401.50 रुपयांवरून 693 रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत भागधारकांना सुमारे 70 टक्के परतावा मिळाला आहे. गेल्या 6 महिन्यांत या समभागाने गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले आहेत.

2021 मध्ये या समभागाने ₹ 33.75 वरून ₹ 693 पर्यंत झेप घेतली आहे. याचा अर्थ Xpro India च्या समभागाने गुंतवणूकदारांना 1900 टक्के रिटर्न्स दिले आहेत. सहा महिन्यांपूर्वी एखाद्याने या समभागात 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आता त्याचे मूल्य 7.35 लाख इतके झाले आहे. 2020 साली या समभागात केलेल्या गुंतवणूकीचे मूल्य 20 लाख इतके झाले आहे.

गुडलक इंडियाची वेगवान घोडदौड

यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. गुडलक इंडिया (Goodluck India) हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिले होते. मध्यंतरी या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपये इतका झाला आहे. एका सत्रात गुडलक इंडियाच्या शेअर्सची किंमत इतकी वाढली की, 10 टक्क्यांवर अप्पर सर्किट लागले होते. गेल्या पाच सत्रांमध्ये या समभागाची किंमत तब्बल 31 टक्क्यांनी वाढली होती.

संबंधित बातम्या:

अवघ्या 24 रुपयांच्या शेअरची किंमत झाली 2064 रुपये; गुंतवणूकदारांना बक्कळ फायदा

अवघ्या 1.55 रुपयांच्या शेअरची किंमत झाली 301.60 रुपये; गुंतवणूकदारांना बक्कळ फायदा

अवघ्या सात रुपयांत मिळणाऱ्या शेअरची किंमत झाली 718 रुपये, एका लाखाचे झाले 1 कोटी

देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.