Share Market : एकाच वर्षात पैसा डबल! शेअर दोनशे रुपयांच्या आत, तुम्ही लावणार का डाव

Share Market : बांधकाम क्षेत्रातील या कंपनीने गुंतवणूकदारांना जॅकपॉट लावला आहे. या कंपनीमुळे गुंतवणूकदारांना एकाच वर्षात दुप्पट फायदा दिला. आता या कंपनीला मोठी ऑर्डर मिळाल्याने बाजारातील तज्ज्ञांचे लक्ष या शेअरने वेधले आहे. कंपनीच्या शेअरमध्ये एक टक्के तेजी दिसून आली. काय आहे तज्ज्ञांचा दावा?

Share Market : एकाच वर्षात पैसा डबल! शेअर दोनशे रुपयांच्या आत, तुम्ही लावणार का डाव
Follow us
| Updated on: Sep 22, 2023 | 6:23 PM

नवी दिल्ली | 22 सप्टेंबर 2023 : बांधकाम क्षेत्रातील(Construction Company) या कंपनीची शेअर बाजारात सध्या चर्चा सुरु आहे. शेअर बाजारात सध्या पडझडीचे सत्र सुरु आहे. सलग 11 दिवसांच्या चढाईनंतर शेअर बाजाराने रिव्हर्स गिअर टाकला आहे. या कंपनीला BMC कडून 6300 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. ही वार्ता येऊन धडकताच हा शेअर एक टक्क्यांनी वधारला. शेअरमध्ये (Share Market) तेजी दिसून आली. या कंपनीचे मार्केट कॅप 9480 कोटी रुपये आहे. या कंपनीला इतर ठिकाणाहून पण कामासाठी कार्यादेश मिळाले आहेत.  बाजारातील तज्ज्ञांनी या शेअरवर भरवसा दाखवला आहे. हा शेअर सध्या दोनशे रुपयांच्या आत असल्याने गुंतवणूकदारांसाठी हा चांगला सौदा ठरु शकतो. पण गुंतवणूकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे सर्वात महत्वाचे असते.

काय करते काम

एनसीसी (NCC Ltd) कंपनीने शेअर बाजाराला नवीन घडामोडींची माहिती दिली आहे. या कंपनीला जे कुमार इन्फ्रो प्रोजेक्टस मिळून 6300 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. हे काम दोन्ही कंपन्या मिळून करणार आहेत. बीएमसीसाठी दोन्ही कंपन्यांचे ज्वाईंट व्हेंचर असेल. कंपनीला ट्वीन टनल तयार करण्याचे जोड बोगदा तयार करण्याचे काम मिळाले आहे. हा बोगदा फिल्म सिटी गोरेगाव ते किहिंदीपाड्यापर्यंत असेल.

हे सुद्धा वाचा

असा आहे वाटा

या प्रकल्पासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये भागीदारी ठरली आहे. एसीसी कंपनीकडे यातील 51 टक्के तर जे कुमार कंपनीकडे 49 टक्के वाटा आहे. कंपनीला हे काम पुढील पाच वर्षांत पूर्ण करायचे आहे. तर 10 वर्षांचे देखरेख, दुरुस्तीचे काम कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. यावर्षी कंपनीच्या महसूलात 20 टक्के वाढ होईल. सध्या कंपनीकडे जवळपास 60,000 रुपयांची वर्क ऑर्डर आहे.

शेअर वधारला

शुक्रवारी एनसीसीच्या लिमिटेडचा शेअर 149.70 रुपयांवर उघडला. कंपनीचा शेअर 1 टक्क्यांहून अधिक तेजीने धावला. हा शेअर 151.85 रुपयांवर पोहचला. गेल्या एका वर्षांत एनसीसी लिमिटेडच्या शेअरच्या किंमतीत शंभर टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली. एकाच वर्षांत गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट झाला. भविष्यात हा शेअर अजून धावेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.