Share Market Jawan : हा शेअर झाला ‘जवान’! कंपनीने दोन मिनिटात कमावले इतके कोटी
Share Market Jawan : बॉक्स ऑफिस आणि दलाल स्ट्रीट दोन्ही ठिकाणी शाहरुख खानची जादू चालली. शेअर बाजार सुरु होताच दोनच मिनिटात या कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये कोट्यवधी रुपयांची वाढ झाली. या कंपनीचा शेअर पण चांगली घौडदौड करत आहे.
नवी दिल्ली | 8 सप्टेंबर 2023 : पठाण नंतर जवान (Jawan) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसच नाही तर शेअर बाजारात (Share Market) जादू चालवली. या कंपनीचा शेअर पण वधारला. सध्या जवान चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईचा नवीन रेकॉर्ड केला आहे. हिंदीसह इतर ही भाषेत या चित्रपटाने चांगली कमाई केली. दक्षिणात्य कलाकारांसह शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने, त्याची जादू कायम असल्याचे दाखवून दिले. या सिनेमाने दलाल स्ट्रीटवर पण कमाल केली. शेअर बाजार सुरु होताच दोनच मिनिटात या कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये कोट्यवधी रुपयांची वाढ झाली. या कंपनीच्या शेअरने पण चांगली घौडदौड केली. गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला नसला तरी कंपनीला फायदा झाल्याने या शेअरवर त्याचा परिणाम दिसून येणार आहे. येत्या काही दिवसात हा शेअर जलवा दाखवू शकतो.
या कंपनीला झाला फायदा
पठाण चित्रपटानंतर जवान चित्रपटाने पण गल्ला जमावला. त्याचा फायदा मल्टिप्लेक्स पीव्हीआर आयनॉक्सला झाला. गुरुवारी या कंपनीचे मार्केट कॅप 400 कोटी रुपयांनी वधारले. तर शुक्रवारी केवळ 2 मिनिटात कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 325 कोटी रुपयांची वाढ झाली. दोनच दिवसात कंपनीला जोरदार कमाई करता आली. पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअरने घौडदौड केली असली तरी मोठा पल्ला गाठता आलेला नाही.
पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअरमध्ये मामूली तेजी
शुक्रवारी पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअरमध्ये मामूली तेजी दिसून आली. सकाळी 10 वाजून 38 मिनिटांना या कंपनीचा शेअर 0.23 टक्क्यांनी वधारला. हा शेअर 1850.8 रुपयांवर व्यापार करत होता. तर बाजार सुरु होताच या कंपनीचा शेअर 1879.75 रुपयांवर पोहचला होता. आज कंपनीच्या शेअरने 1869 रुपयांवर ओपनिंग केली. एक दिवसापूर्वी कंपनीचा शेअर एक टक्क्यांच्या तेजीसह 1846.50 रुपयांवर बंद झाला. बाजारातील तज्ज्ञांच्या मते पीव्हीआर आयनॉक्सचा शेअर 2000 रुपयांचा टप्पा गाठू शकतो.
दोन मिनिटात 325 कोटींची कमाई
कंपनीच्या भांडवलात मोठी वाढ झाली. दोनच मिनिटांत या कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 325 कोटी रुपयांची वाढ झाली. एक दिवसापूर्वी पीव्हीआर आयनॉक्सचे मार्केट कॅम्प 18,097.13 कोटी रुपये होते. तर आज बाजारात दोनच मिनिटात मार्केट कॅप 18423.011 कोटी रुपयांवर पोहचले. दोनच मिनिटात या कंपनीला 325.87 कोटी रुपयांचा फायदा झाला. सध्या कंपनीचे मार्केट कॅम्प 18,133.89 कोटी रुपयांवर पोहचले आहे.
अशी झाली कमाई
इंडस्ट्री ट्रॅकर Sacnilk.com नुसार, जवान चित्रपटाने सुरुवातीलाच अंदाजे 75 कोटी रुपयांची जोरदार कमाई केली. हिंदी भाषेत या चित्रपटाने 65 कोटी रुपयांची ओपनिंग केली. तामिळ आणि तेलुगू भाषेत 5-5 कोटी रुपयांचा गल्ला जमावला. रिपोर्टनुसार हा चित्रफट दुसऱ्या दिवशी 21.62 कोटी रुपयांची कमाई करु शकतो.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.