Share Market : आता उशीर विसरुनच जा, सकाळी शेअर विका, संध्याकाळी पैसा खात्यात

Share Market : शेअर विकल्यावर खात्यात रक्कम येण्यासाठी सध्या प्रतिक्षा करावी लागते. पण आता सत्र संपतानाच ग्राहकाच्या खात्यात रक्कम येऊन पडू शकते. त्यासाठी सेबीने पुन्हा एकदा पाऊलं टाकलं आहे. काय आहे ही सुविधा..

Share Market : आता उशीर विसरुनच जा, सकाळी शेअर विका, संध्याकाळी पैसा खात्यात
Follow us
| Updated on: Jul 25, 2023 | 3:01 PM

नवी दिल्ली | 25 जुलै 2023 : शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक सोयी-सुविधा लागू करण्यात आला आहेत. हर्षद मेहता आणि अनेक प्रकरणानंतर शेअर बाजार सजग झाला आहे. पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यावर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, 27 जानेवारी, 2023 रोजी T+1 सेटलमेंटचा (T+1 Settlement) निर्णय लागू करण्यात आला होता. त्यामुळे शेअर विक्री केल्यानंतर एका दिवसांत पैसा खात्यात जमा होत होता. आता त्यापेक्षा झटपट रक्कम खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी सेबीने पुन्हा एकदा पाऊलं टाकलं आहे. काय आहे ही सुविधा..

यंदा गुंतवणूकदारांना लॉटरी

बाजारात ट्रेड पूर्ण झाल्यावर, शेअर विक्री झाल्यावर गुंतवणूकदारांना यापूर्वी पैसे खात्यात जमा होण्यासाठी वाट पाहावी लागत होती. पण जानेवारीत सेबीने नियम बदलले. ट्रेडची रक्कम अवघ्या 24 तासात खात्यात जमा होऊ लागली. खरेदीदार आणि विक्री करणाऱ्यांना 24 तासात रक्कम मिळण्याची परवानगी मिळाली. लार्ज कॅप आणि ब्लू-चिप कंपन्यांनी T+1 ही सुविधा सुरु केली.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी काय होती सुविधा

शेअर बाजारात T+2 पद्धत लागू आहे. यामुळे बँक खात्यात ट्रेड सेटलमेंटनंतरची रक्कम पोहचण्यास 48 तासांचा कालावधी लागतो. शेअर बाजारात T+2 नियम 2003 साली लागू करण्यात आला होता. 27 जानेवारी 2023 रोजी हा नियम बदलला. एका दिवसात रक्कम जमा होऊ लागली. सहाच महिन्याय या प्रणालीला गती मिळाली.

काय म्हणाले अध्यक्ष

सेबीचे अध्यक्ष मधाबी पुरी यांनी गुंतवणूकदारांना या महत्वाच्या अपडेट्स विषयी माहिती दिली. जगात अशी T+1 सेटलमेंट लागू करणारा भारत अत्यंत कमी अर्थव्यवस्थांपैकी एक असेल. त्यामुळे अधिकाधिक गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक करतील, अशी आशा आहे.

1 ऑक्टोबरपासून नियम लागू

येत्या 1 ऑक्टोबर 2023 रोजी पासून हा नियम लागू होईल. आता हा नियम जवळपास सर्वच ट्रेडसाठी लागू होईल. असा करणारा भारत हा मोजक्याच प्रतिनिधित्व करणाऱ्या देशांपैकी एक होईल. यामुळे व्यवहारात पारदर्शकता येईल. परदेशी गुंतवणूकदारांची संख्या पण वाढेल.

बाजारात तेजीसोबत फटका

भारतीय शेअर बाजार नवनवीन रेकॉर्ड करत आहे. बीएसई सेन्सेक्स 65,000 तर निफ्टीने 20,000 अंकांचा पल्ला जवळपास गाठला आहे. अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल उत्साहजनक आहे. अनेक कंपन्यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. बाजार लवकरच नवीन उच्चांकावर स्थिर होण्याचे दावे करण्यात येत आहे. तरी पण बाजार अचानक गुंतवणूकदारांचे पाय खेचत असल्याने ते गंटागळ्या खात आहेत. बाजार अचानक रेड सिग्नल दाखवत असल्याने हवसे, नवसे, गवसेंची पंचाईत होत आहे.

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.