Share Market : अर्थसंकल्पाचा प्रभाव संपला? शेअर बाजारात घसरणीचं सत्र, सेंन्सेक्ससह निफ्टी ‘डाउन’

आज (शुक्रवारी) सेन्सेंक्स 143.20 अंकांच्या घसरणीसह 58,644.82 आणि निफ्टी 43.90 अंकांच्या घसरणीसह 17,516.30 वर बंद झाला.

Share Market : अर्थसंकल्पाचा प्रभाव संपला? शेअर बाजारात घसरणीचं सत्र, सेंन्सेक्ससह निफ्टी ‘डाउन’
शेअर बाजार
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 5:55 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share market) सलग दुसऱ्या दिवशी घसरणीचं सत्र सुरू असल्याचं दिसून आलं. आज (शुक्रवारी) सेन्सेंक्स 143.20 अंकांच्या घसरणीसह 58,644.82 आणि निफ्टी 43.90 अंकांच्या घसरणीसह 17,516.30 वर बंद झाला. अर्थसंकल्प (Budget 2022) सादर झाल्यानंतर शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला होते. शेअर बाजार अर्थसंकल्पानंतर अवघ्या दोनच दिवसात स्थिरस्थावर झाल्याचं चित्र निर्माण झालं. आज आठवड्याच्या अखरेच्या दिवशी अल्ट्राटेक, टाटा स्टील आणि जेएसडब्ल्यूची कामगिरी वरचढ राहिली. हिरोमोटो कॉर्प, एसबीआय, एम अ‌‌‌‌ॅण्ड एम, एनटीपीसी, आयसर, बजाज ऑटो स्टॉक्स मध्ये घसरण नोंदविली गेली. अर्थसंकल्पाच्या आठवड्यात बाजारातील घसरण गुंतवणुकदारांच्या गोटात अस्वस्थता निर्माण करणारी ठरली आहे. प्रमुख वित्तीय संस्थांचे आर्थिक तिमाही अहवाल (Q3 Results) पटलावर येत असल्यामुळे गुंतवणुकदारांनी सावधगिरीचे धोरण स्विकारले आहे.

शेअर बाजाराचे दिवसभराचे अपडेट्स एका दृष्टीक्षेपात

1. बँक निफ्टी 221 अंकांच्या घसरणीसह 38,789वर 2. मिड-कॅप इंडेक्स 232 अंकांच्या घसरणीसह 30,442वर 3. ऑटो, फायनान्शियल स्टॉक सर्वाधिक घसरणीचे ठरले 4. आर्थिक तिमाही अहवालानंतर एसबीआय स्टॉक 2% घसरण 5. कच्चा तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ,ओएनजीसी 1%टक्क्यांनी वधारले 6. सन-फार्माच्या कामगिरीनं गुंतवणुकदारांत उत्साह 7. अल्केम लॅब्स, फर्स्टसोर्स, एबी फॅशन रिटेल डाउन 8. टोरंट पॉवर, हिंदुस्थान कॉपर, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट, वेदांता, पीआय इंडस्ट्रीज सर्वाधिक मिड-कॅप गेनर्स ठरले. 9. आर्थिक तिमाहीत नकारात्मक सूरानंतर एम अँड एम सलग दुसऱ्या दिवशी घसरण

आजचे तेजीचे शेअर्स :

• हिंदाल्को (2.44) • ओएनजीसी (1.25) •सनफार्मा (1.18) •एशियन पेंट्स (1.05) •डिव्हिज् लॅब्स (0.99)

आजचे घसरणीचे शेअर्स : 

•हिरो मोटोकॉर्प (-2.15) • एसबीआय (-1.81) •एनटीपीसी (-1.79) •एम अँड एम (-1.69) •एचडीएफसी लाईफ (-1.58)

बजेट इफेक्ट नगण्य?

अर्थसंकल्पातील घोषणांचा प्रभाव मार्केटवर अधिक काळ टिकला नसल्याचे स्पष्ट झालं आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आठवड्याभराच्या आतच मार्केट स्थिरस्थावर झाले आहे. गेल्या वर्षी अर्थसंकल्प 2021 दिवशी सेंन्सेक्स मध्ये 5 टक्क्यांची तेजी दिसून आली. पुढील सहा दिवसांपर्यंत तेजी टिकून राहिली. 22 फेब्रुवारी 2021 पर्यंत मार्केट पुन्हा स्थिरस्थावर झाले. यंदाच्या वर्षी अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतर अवघ्या दोन दिवसांत मार्केट स्थिरस्थावर झाल्याचं चित्र दिसून आलं आहे.

संबंधित बातम्या

Gold Price Today : सोन्याच्या भावात घसरण, मुंबईतले दर 450 रुपयांनी गडगडले; जाणून घ्या आजचे भाव

क्रिप्टो करन्सीवरील टीडीएस मधूनच सरकारची एक हजार कोटींची कमाई

खुशखबर!, 100 पेटीएम भाग्यवंतांना एलपीजी गॅस सिलेंडर मिळणार मोफत

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.