Tata Share : टाटा कंपनीचा हा शेअर ठरला रॉकेटसिंग! एकाच दिवसात गुंतवणूकदार मालामाल

Tata Share : शेअर बाजारात सातत्याने चढउतार होत आहे. टाटा समूहाच्या या शेअरने मात्र गुंतवणूकदारांना एकाच दिवसात मालामाल केले. या शेअरने 10 टक्क्यांची उसळी घेतली. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले.

Tata Share : टाटा कंपनीचा हा शेअर ठरला रॉकेटसिंग! एकाच दिवसात गुंतवणूकदार मालामाल
फायदाच फायदा
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 8:15 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारात चढउतार सुरु आहे. या घडामोडीत टाटा समूहाच्या (Tata Group) या शेअरने घौडदौड केली. या शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून आली. बुधवारी या शेअरमध्ये 10 टक्क्यांची जबरदस्त उसळी दिसून आली. हा शेअर टाटा समूहाच्या टेलिकॉम सेक्टरशी संबंधित उपकंपनी तेजस नेटवर्क्सचा (Tejas Networks Ltd) आहे. या कंपनीचा शेअरसह आज सेंच्युरी टेक्सटाईलच्या (Century Textile and Industries Ltd) शेअरमध्ये पण तेजी दिसून आली. सेंच्युरी टेक्सटाईलच्या शेअरमध्ये आज वाढ झाली. हा शेअर 647.40 रुपयांवर बंद झाला. बाजारात या दोन्ही शेअरने धुमाकूळ घातला. अचानक या दोन्ही शेअरमध्ये तेजीचे वारे कसे आले? येत्या काही दिवसांत गुंतवणूकदारांना या शेअर्समधून कमाईची संधी मिळेल का? असे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात घोळत आहेत.

टाटा समूहाच्या टेलिकॉम सेक्टरमधील तेजस नेटवर्क्स या उपकंपनीच्या शेअरमधील वृद्धीमागे एक कारण आहे. टेलिकॉम सेक्टरमधून बाहेर पडल्यापासून टाटा एक मोठी योजना तयार करत आहे. या समूहाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी याविषयीचे संकेत दिले आहेत. त्यानुसार, टाटा समूह टेलिकॉम सेवेपेक्षा साधनं आणि सॉफ्टवेअरवर लक्ष्य केंद्रीत केले आहे.

टाटा समूह टेलिकॉक व्यवसाय वृद्धीवर जोर देत आहे. तेजस नेटवर्कस् च्या माध्यमातून इक्विपमेंट आणि टेक्नोलॉजीमध्ये कंपनी दावेदारी मजबूत करत आहे. टाटा सन्सने वर्ष 2021 मध्ये 56 टक्के हिस्सेदारी अधिग्रहित केली होती. तेजस नेटवर्क्सच्या शेअरमध्ये एका वर्षात 67.80 टक्क्यांची वृद्धी झाली.

हे सुद्धा वाचा

आज तेजस नेटवर्क्सचा शेअर सकाळी 541.05 रुपयांवर उघडला. त्यानंतर या शेअरमध्ये तेजी दिसून आली. शेअरमध्ये 11 टक्क्यांची वाढ झाली. हा शेअर 595.25 रुपयांवर बंद झाला. येत्या काही दिवसांत हा शेअर अजून धावेल, अशी गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांना मोठा फायदा होणार आहे.

सेंच्युरी टेक्सटाईलच्या शेअरमध्येही पुढे तेजीचे सत्र कायम राहण्याची शक्यता आहे. सेंच्युरी टेक्सटाईलचा शेअर सकाळी 643.60 रुपयांवर उघडला. त्यानंतर या शेअरमध्ये तेजी दिसून आली. या शेअरने 656.65 रुपयांचा उच्चांक गाठला. आज सकाळीच या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. हा शेअर 647.40 रुपयांवर बंद झाला.

सेंच्युरी टेक्सटाईल आणि इंडस्ट्रीज लिमिटेड ही मुंबईतील एक मोठी कंपनी आहे. कापड आणि कागद निर्मितीत ही कंपनी अग्रेसर आहे. कंपनी प्रामुख्याने सूती कापड, सूत, डेनिम, व्हिस्कोस फिलामेंट रेयॉन यार्न, टायर-कॉर्ड्स, कॉस्टिक सोडा, सल्फ्यूरिक ऍसिड, मीठ, लगदा आणि कागदाच्या निर्मितीमध्ये गुंतली आहे.

Non Stop LIVE Update
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.