Share Market Outlook : ‘या’ 10 मिडकॅप शेयर्सची किंमत आठवडाभरात 22 टक्क्यांनी कमी, योग्यवेळी खरेदी करुन मालामाल व्हा
साप्ताहिक आधारावर लागोपाठ चौथ्या आठवड्यात बाजार तेजीसह बंद झालाय. एकूच योग्यवेळी शेअर बाजारात खरेदी केल्यास गुंतवणुकदारांना मालामाल होण्याची संधी आहे.
Share Market Outlook मुंबई : या आठवड्यात शेअर बाजाराने एक नवं रेकॉर्ड केलं. यानंतर बाजारावर काही दबावही दिसत आहे. साप्ताहिक आधारावर लागोपाठ चौथ्या आठवड्यात बाजार तेजीसह बंद झालाय. असं असलं तरी साप्ताहिक आधारावर निफ्टी सातत्याने तिसरे आठवड्यात घसरणीसह बंद झाला. मानसशास्त्रीय स्तरावर मात्र बाजारात अद्यापही तेजी आहे. या स्थितीत थोडीशी घसरण देखील गुंतवणुकदारांवर परिणाम करण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यामुळे एकूच योग्यवेळी शेअर बाजारात खरेदी केल्यास गुंतवणुकदारांना मालामाल होण्याची संधी आहे (Share Market Outlook 10 Midcap Smallcap shares BSE Sensex).
दुसरीकडे BSE Midcap आणि Smallcap index मध्ये या आठवड्यात 3 टक्के आणि 1.8 टक्के घट झाली. BSE 500 इंडेक्समधील काही शेअर्समध्ये या आठवड्यात 23 टक्क्यांपर्यंत पडझड झाली. यात अदानी टोटल गॅस, अदानी ट्रांसमिशन, अदाणी पावर, ग्रेफाइट इंडिया, अदानी पोर्ट अँड एसईजेड, भेल, अदानी ग्रीन एनर्जी, अशोक लेलँड, हिंदुस्तान कॉपर आणि ट्यूब इन्वेस्टमेंट सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
स्मॉलकॅप आणि मिडकँपवर दबाव
बाजारातील जाणकारांच्या माहितीनुसार, सद्यस्थितीत स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये पडझड दिसत आहे. या दोन इंडेक्समध्ये सध्या तेजी शिल्लक आहे. आगामी काळात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये आणखी सुधारण दिसेल. कमोडिटी सेक्टरमध्ये पुन्हा एकदा सुधारणा झालेली दिसेल.
बाजाराची पुढील दिशा कशी असणार?
आगामी काळात बाजाराची स्थिती कशी राहणार यावर जाणकार म्हणतात, “निफ्टी 50 दिवसांच्या मूविंग एवरेज 15063 च्या वर ट्रेड करत आहे. 24 जूनला या महिन्याची फ्यूचर अँड ऑप्शनची एक्सपायरी आहे. तोपर्यंत बाजारात वोलाटिलिटी पाहायला मिळेल. त्यामुळे पहिल्यांदा सर्वांची नजर 15450-15550 च्या सपोर्ट स्तरावर असेल. यासाठी रेसिसस्टंस लेवल 15800-15900 च्या स्तरावर असेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात निफ्टी 50 आठ अंकांच्या पडझडीस 15683 वर बदं झाला. सेंसेक्समध्ये 21 अंकांची तेजी दिसली, तो 52344 वर बंद झाला.
हेही वाचा :
Share Market: ‘या’ बड्या कंपनीच्या शेअरची किंमत होणार शून्य, कारण…
Consistent Losers : ‘या’ 5 शेअर्समधील पडझड सुरुच, तुम्ही गुंतवणूक केली असेल तर सावध व्हा
HDFC बँकेच्या शेअर होल्डर्ससाठी महत्वाची बातमी; 18 जूनला मोठया घोषणेची शक्यता
व्हिडीओ पाहा :
Share Market Outlook 10 Midcap Smallcap shares BSE Sensex