AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market ची हनुमान उडी; विक्रमाची मालिका सुरूच, सेन्सेक्स लवकरच 86 हजार अंकाचा टप्पा ओलांडणार

Sensex New High : BSE चा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने 57 अंकांच्या उसळीसह आज 85,893 अंकांचा टप्पा गाठला. तर एनएसई निफ्टी 32 अंकासह 26,248 अंकावर उघडला. या नवीन घडामोडींमुळे शेअर बाजाराची घौडदौड सुरूच असल्याचे दिसून आले. बाजार लवकरच एक लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Share Market ची हनुमान उडी; विक्रमाची मालिका सुरूच, सेन्सेक्स लवकरच 86 हजार अंकाचा टप्पा ओलांडणार
सेन्सेक्सची घौडदौड सुरूच
Follow us
| Updated on: Sep 27, 2024 | 9:57 AM

भारतीय शेअर बाजाराने गुंतवणूकदारांनाच नाही तर जगातील अनेक बाजारांना धक्का दिला आहे. स्टॉक मार्केटने सलग 8 व्यांदा तेजीचे सत्र आहे. BSE चा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने 57 अंकांच्या उसळीसह आज 85,893 अंकांचा टप्पा गाठला. तर एनएसई निफ्टी 32 अंकासह 26,248 अंकावर उघडला. या नवीन घडामोडींमुळे शेअर बाजाराची घौडदौड सुरूच असल्याचे दिसून आले. बाजार लवकरच एक लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

86,000 टप्पा गाठणार

सेन्सेक्स आज मोठा टप्पा गाठणार असा अंदाज बाजार उघडण्यापूर्वीच तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. आज बाजाराच्या पूर्व सत्रात त्यांचे संकेत मिळाले. त्यानंतर बाजार उघडताच दोन्ही निर्देशांकाची घोडदौड सुरू झाली. आज दिवसभरात सेन्सेक्स 86,000 अंकांचा टप्पा ओलांडेल असा अंदाज व्यक्त होत आहे. गुरुवारी अमेरिकेतील शेअर बाजार S&P 500 विक्रमी उच्चांकावर पोहचला होता. तर आशियाशी बाजारात पण तेजीचे संकेत मिळत आहेत. सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने 85,893 अंकांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे 86,000 अंकांचा टप्पा गाठणे अवघड नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या 9 वाजून 47 मिनिटाला सेन्सेक्स 85,866 अंकावर ट्रेडिंग करत आहे.

हे सुद्धा वाचा

भारतीय शेअर बाजाराचा बेंच मार्क इंडेक्स सेन्सेक्स आणि निफ्टीने गुरुवारी सर्वकालीन उच्चांक गाठला. सेन्सेक्स एकावेळी तर 85,930.43 अंकावर पोहचला होता. दिवसभरात 666.25 अंकांची भरारी घेत तो बाजार बंद होताना 85.835.12 अंकावर स्थिरावला. निफ्टी 50 ने 26,250.90 अंकांचा टप्पा गाठला. दिवसभरात 211.90 अंकांसह निफ्टी 26,216.05 अंकावर बंद झाला.

जागतिक संकेत काय?

Wall Street मध्ये तेजीचे गाणे वाजताच आशियात पण तेजीची धून वाजली. आशियातील बाजारात शुक्रवारी, बाजाराच्या अखेरच्या सत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटली. जापानचा निक्केई 225 अंकांनी वधारला. तर टॉपिक्स 0.23 टक्क्यांनी घसरला. दक्षिण कोरियातील कोस्पी 0.18 टक्क्यांनी उतरला. कोस्डॅक बाजार 0.15 टक्क्यांनी घसरला. हाँगकाँगचा सेंग इंडेक्स फ्यूचर्सने तेजीचे संकेत दिले.

सेन्सेक्सचा जादुई 1 लाखांचा आकडा गाठण्यासाठी बाजाराला 17.5% ची उसळी घ्यायची आहे. रोज जर बाजाराने एक टक्क्यांची उडी घेतली तर हा आकडा बाजार 18 ट्रेडिंग सेशनमध्ये पूर्ण करेल. पण सध्या लागलीच हा चमत्कार होण्याची शक्यता धूसर आहे. डेझर्व्हचे सहसंस्थापक वैभव पोरवाल यांच्या मते, बाजाराला प्रति वर्ष 12-15% रिटर्न द्यावा लागेल. त्यामुळे 1,00,000 हा टप्पा गाठण्यासाठी बाजाराला 18-24 महिने लागतील.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.