Share Market : सकाळी शेअर विका, घरी पोहचेपर्यंत पैसे खात्यात जमा, शेअर बाजारात ऐतिहासिक बदल

Share Market : आता शेअर बाजारात मोठा बदल होत आहे. त्याची जादू तुम्हाला अनुभवता येईल.

Share Market : सकाळी शेअर विका, घरी पोहचेपर्यंत पैसे खात्यात जमा, शेअर बाजारात ऐतिहासिक बदल
मोठा बदल
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 9:07 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारात ऐतिहासिक बदल होत आहे. 27 जानेवारी 2023 रोजी स्टॉक मार्केटमध्ये (Stock Market) मोठा बदल होत आहे. आता भारतीय बाजारात सर्वच स्टॉक, टी+2 ऐवजी टी+1 सेटलमेंट (T+1 Settlement) मध्ये बदलतील. सोप्या शब्दात सकाळच्या सत्रात शेअरची विक्री केल्यास संध्याकाळी तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल. म्हणजे शेअर अथवा पैसे लवकर क्रेडिट होतील. या प्रक्रियेमुळे भारतीय शेअर बाजार जगातील प्रगतीशील आणि पारदर्शी इक्विटी बाजारापैकी एक होईल. यामुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा ओढा वाढेल. परदेशी गुंतवणूकदारही भारतीय बाजाराकडे आकर्षीत होतील, असा अंदाज आहे.

बाजारात आता ट्रेड पूर्ण झाल्यावर गुंतवणूकदारांना सेटलमेंटची रक्कम खात्यात जमा (Bank Account) होण्यासाठी वाट पहावी लागणार नाही. ट्रेडची रक्कम अवघ्या 24 तासात खात्यात जमा होईल. खरेदीदार आणि विक्री करणाऱ्यांना 24 तासात रक्कम मिळण्याची परवानगी मिळेल. लार्ज कॅप आणि ब्लू-चिप कंपन्यांना पुढील आठवड्यात T+1 ही सुविधा देतील.

सध्या शेअर बाजारात T+2 पद्धत लागू आहे. यामुळे बँक खात्यात ट्रेड सेटलमेंटनंतरची रक्कम पोहचण्यास 48 तासांचा कालावधी लागतो. शेअर बाजारात T+2 नियम 2003 साली लागू करण्यात आला होता. 27 जानेवारी 2023 रोजी आता हा नियम बदलेल.

हे सुद्धा वाचा

T+1 सुविधेमुळे गुंतवणूकदारांना निधी आणि शेअरमध्ये तेजीने ट्रेड सेटलमेंट करता येतील . त्यांच्या खात्यात आता पूर्वीपेक्षा एक दिवस आधी रक्कम जमा होईल. सेटलमेंटची सायकल आता लवकर पूर्ण होईल.

शेअर बाजारात खरेदीदार आणि विक्री करणारे यांच्यात ट्रेड पूर्ण झाला की रक्कम ही लवकर मिळेल. जुन्या नियमामुळे सेटलमेंटसाठी दोन दिवसांची वाट पहावी लागत होती. पण आता एका दिवसातच ट्रेड सेटलमेंट होतील.

अर्थात या नियमामुळे बाजारात गुंतवणूकदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. एकाच दिवसात खात्यात रक्कम येत असल्याने व्यवहारांनाही गती मिळेल. तर परदेशातील गुंतवणूकदारही आता जादा रक्कम गुंतवू शकतील.

काही तज्ज्ञांनी या नियमाचे कौतुक करतानाच गैरप्रकाराविषयीही अलर्ट केले आहे. या बदलामुळे बाजारात आता मोठे चढउतार पहायला मिळतील. काही कॉर्पोरेट्स, परदेशी गुंतवणूकदार, मोठे शेअरधारक याचा फायदा उचलत धडाधडा ट्रेड पूर्ण करुन बाजाराला झटका देतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.