Share Market : शेअर बाजारात पण या चित्रपटांची जोरदार एंट्री, अशी होणार गुंतवणूकदारांची कमाई

Share Market : आता मनोरंजनासोबतच तुम्हाला कमाईचा पण मौका मिळत आहे. शेअर बाजारात पण चित्रपट त्यांचा कमाईचा रंग दाखवतील. यापूर्वी चित्रपट कंपन्यांशी संबंधित शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले होते. आता नवीन चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करणार तसाच शेअर बाजारात पण कमाल दाखवणार आहेत.

Share Market : शेअर बाजारात पण या चित्रपटांची जोरदार एंट्री, अशी होणार गुंतवणूकदारांची कमाई
Follow us
| Updated on: Oct 01, 2023 | 5:34 PM

नवी दिल्ली | 1 ऑक्टोबर 2023 : गदर2, जेलर, ड्रीम गर्ल 2, ओएमजी 2 या चित्रपटांमुळे शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाला. गुंतवणूकदार मालामाल झाले. चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचे आतापर्यंत तुम्ही ऐकले असेल पण आता सिनेमा शेअर बाजारातही कमाल दाखवत आहे. चित्रपट तयार करणाऱ्या कंपन्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून देत आहेत. आता पुढील तीन महिन्यात सलमान खान, रणबीर कपूर, शाहरुख खान यांची डंकी, टायगर श्रॉफची फायटर आणि प्रभासची सालार पार्ट 1 रिलीज होत आहे. हे नवीन चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) धमाका करणार तर शेअर बाजारात पण कमाल दाखवणार आहेत. गुंतवणूकदारांचा असा फायदा होईल.

या चित्रपटांनी दिला फायदा

गदर2, जेलर, ड्रीम गर्ल 2, ओएमजी 2 यासारख्या चित्रपटांनी शेअर बाजारात गुंतवणूकदारांना फायदा मिळवून दिला. पीव्हीआर आयनॉक्सचा शेअर सप्टेंबरच्या तिमाहीत 25 टक्क्यांनी वधारला. तर पुढील तीन महिन्यात या शेअरमध्ये तुफान येण्याची शक्यता आहे. डंकी, फायटर आणि सालार पार्ट 1 रिलीज होणार आहेत. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालतील असा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे शेअर पण चांगला परतावा देईल, असा दावा करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअरमध्ये तेजी

तज्ज्ञांच्या मते, येत्या तीन महिन्यात पीव्हीआर आयनॉक्सचा शेअर जबरदस्त तेजीत असेल. यापूर्वी या कंपनीने कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले आहे. कंपनीच्या महसूलात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचा थेट फायदा शेअर बाजारात दिसेल. शेअरमध्ये मोठी कमाई होईल. तज्ज्ञांच्यामते, येत्या तीन महिन्यात पीव्हीआर आयनॉक्सचा शेअर गुंतवणूकदारांना 40 टक्क्यांहून अधिकचा परतावा देईल. कंपनीचा शेअर डिसेंबर महिन्यात 2400 रुपयांपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. सध्याच्या स्तरापेक्षा हा भाव 700 रुपयांनी अधिक आहे. तर कंपनीचे मार्केट कॅप 20 हजार कोटींपेक्षा अधिक असेल.

गेल्या तिमाहीत 25 टक्के परतावा

गेल्या तिमाहीत पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअरमध्ये 25 टक्के तेजी दिसून आली. गदर 2 आणि जेलर या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केल्याने हा फायदा मिळाला. या चित्रपटांना रसिकांनी भरभरुन दाद दिली. त्यामुळे कमाईचे सर्व रेकॉर्ड तुटले. सध्या या कंपनीचा शेअर 716.80 रुपयांवर आहे. शुक्रवारी या शेअरमध्ये 0.41टक्के तेजी दिसून आली. ऑक्टोबर महिन्यात या शेअरमध्ये 10 टक्के तेजी दिसू शकते.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू.
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक.
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?.
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'.
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.