Share Market | अरे हा शेअर आहे की परीस! दहा वर्षांत 10 हजारांचे केले 16 लाख

Share Market | रिफेक्स इंडस्ट्रीजच्या शेअरने कमाल दाखवली. गुंतवणूकदारांना दहा वर्षांत छप्परफाड परतावा दिला. या शेअरमध्ये दहा वर्षांत 16,000% तेजी दिसली. ज्यांनी सुरुवातीला 10,000 रुपये गुंतवले. त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 16 लाख रुपये झाले. या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले.

Share Market | अरे हा शेअर आहे की परीस! दहा वर्षांत 10 हजारांचे केले 16 लाख
Follow us
| Updated on: Feb 04, 2024 | 9:22 AM

नवी दिल्ली | 4 February 2024 : रिफेक्स इंडस्ट्रीजच्या शेअरने गेल्या 10 वर्षांत 16,000% रिटर्न दिला. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या कंपनीत 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्याचे मूल्य जवळपास 16 लाख रुपये असते. ही कंपनी रेफ्रिजरेंट गॅस आणि रिफील करण्याचे काम करते. गेल्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 9 टक्क्यांची तेजी आली. तर तीन महिन्यात हा शेअर 29 टक्के वधारला. या कंपनीत 53.37 टक्के शेअर प्रमोटर्सकडे आणि 46.73 टक्के वाटा शेअर धारकांकडे आहे. यामध्ये एकही म्युच्युअल फंड्स अथवा परदेशी गुंतवणूकदार नाही. कंपनीत 29% वाटा सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडे आहे.

किती महसूल, फायदा किती

सप्टेंबरच्या तिमाही आकड्यांनुसार, कंपनीला ऑपरेशन्समधून तिमाही आधारावरील महसूलात 8 टक्क्यांची घसरण झाली. हा महसूल 352 कोटी रुपये होता तर नफ्यात किंचित वाढ होऊन तो 21.43 कोटी रुपयांवर पोहचला. विश्लेषकांच्या मते, बेंचमार्क इंडेक्सपेक्षा हा शेअर चांगली कामगिरी दाखवेल. टेक्निकल चार्टमध्ये पण तो उजवा ठरला आहे. आठवड्याच्या कसोटीवर त्याची कामगिरी जोरदार आहे. तज्ज्ञांच्या मते 644 रुपयांचा स्टॉप लॉससह 760 ते 800 रुपयांपर्यंत हा स्टॉक उसळी घेईल.

हे सुद्धा वाचा

अशी बजावली कामगिरी

सध्या हा स्टॉक 620 रुपयांच्या सरासरी गतिशील स्तरापेक्षा अधिक व्यापार करत आहे. हा शेअर 750 रुपयांपर्यंत मजल मारु शकतो. अथवा त्यापेक्षा पण उसळी घेऊ शकतो. काही तज्ज्ञांच्या मते, येत्या तिमाहीपर्यंत हा शेअर 1000 रुपयांच्या घरात जाईल. शुक्रवारी कंपनीचा शेअर 0.23% घसरणीसह बीएसईवर 680.20 रुपयांवर बंद झाला. 52 आठवड्यातील उच्चांकी किंमत 923.95 रुपये होती. तर 52 आठवड्यातील निच्चांकी किंमत 221.30 रुपये आहे. गेल्या वर्षी 28 मार्च रोजी रिफेक्स इंडस्ट्रीजचा शेअर या निच्चांकावर होता. या शेअरने अनेकांना मालामाल केले.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.