बजेटनंतर शेअर बाजार उसळला, सलग 7 व्या सत्रात सेंसेक्स आणि निफ्टीने मोडला रेकॉर्ड

बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या दोन्ही कंपन्यांनी पुन्हा नवीन उच्चांक गाठला असल्याचं समोर आलं आहे.

बजेटनंतर शेअर बाजार उसळला, सलग 7 व्या सत्रात सेंसेक्स आणि निफ्टीने मोडला रेकॉर्ड
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 11:37 AM

मुंबई : घरेलू शेअर बाजारात मंगळवारी सलग सातव्या सत्रात तेजी दिसून आली. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या दोन्ही कंपन्यांनी पुन्हा नवीन उच्चांक गाठला असल्याचं समोर आलं आहे. मागच्या सत्रामध्ये सेन्सेक्स 200 अंकांनी वाढून 51,575 वर पोहोचला होता. आतापर्यंतची ही विक्रमी पातळी आहे. त्यानुसार, आज निफ्टीनेही पहिल्यांदाच 15,188 चा आकडा पार केला आहे. परदेशी बाजारातील हालचालींमुळे शेअर मार्केटमध्ये उसळी आल्याचं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (share market todays news sensex and nifty record high on tuesday here is details )

मागच्या सत्रानंतर सेन्सेक्स 228 अंकांनी म्हणजेच 0.28 टक्क्यांनी वाढून 51,577 वर व्यापार करत आहे. तर निफ्टी 81 अंकांच्या म्हणजेच 0.24 टक्क्यांनी वाढीसह 15,197 वर आहे . मंगळवारच्या सुरुवातीच्या व्यापारात सेन्सेक्स आणि निफ्टी नवीन विक्रमांसह मार्केट करत आहेत.

सकाळपासून आहे तेजी

मुंबई शेअर बाजारावर आधारित सेन्सेक्सचे 30 शेअर्स मागच्या सत्रातल्या तुलनेमध्ये 135.46 अंकांच्या वाढीसह 51,484.23 वर उघडला आणि 51,575.20 वर पोहोचला. याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) च्या 50 शेअर्स मागील सत्रांच्या तुलनेत 48.35 अंकांनी वाढून 15,164.15 वर पोहोचला आणि 15,188.45 मार्केट करत आहे.

दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर भांडवली बाजारात आलेल्या तेजीचे वातावरण अजूनही कायम आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स (Sensex) 617 अंकांनी वधारताना दिसला. दिवसाअखेर सेन्सेक्स 51348 च्या पातळीवर राहिला. बाजारातील तेजीचा हा सलग सहावा दिवस होता. यामुळे गुंतवणुकदारांच्या संपत्तीत 2.62 लाख कोटींची भर पडली. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला निफ्टीही 191अंकांनी वधारला होता.

शेअर बाजारात तेजी का?

अमेरिकेकडून प्रोत्साहनपर पॅकेजची घोषणा होण्याची दाट शक्यता असल्याने आशियाई बाजारात सध्या तेजीचे वातावरण आहे. याशिवाय, कोरोनाच्या लसीकरण मोहीमेने बऱ्यापैकी वेग पकडल्याने गुंतवणुकदारांचा आशावाद आणखी वाढला आहे. त्यामुळे गुंतवणुकदार बाजारपेठेत आणखी पैसे ओतत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

गुंतवणूकदारांनी काय करावं?

भारतासह जगातील शेअर बाजारामध्ये तेजी पाहायला मिळेल. शेअर बाजारांचे इंडेक्स वधारणार नसले तरी मिड कॅप आणि स्मॉलकॅफ शेअर्समध्ये तेजी असेल, असा अंदाज ब्रोकरेज फर्म वर्तवत आहेत.येत्या काळात एलं अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट, गोदरेज प्रॉपर्टीजमध्ये गुंतवणूक वाढू शकते. पुढील एक वर्षात निफ्टी 15 हजार ते 16 हजारादरम्यान राहील, असा अदाज वर्तवण्यात आला आहे.

कोरोना काळातील सुधारणांचा फायदा

एस्कॉर्ट सिक्युरिटीचे रिसर्च हेड आसिफ इकबाल यांनी TV9 हिंदीला दिलेल्या माहितीनुसार जागतिक बाजारातील तेजी हे भारतीय सेन्सेक्समध्ये तेजी असण्याचं कारण आहे. कोरोना संसर्गाच्या काळात केंद्र सरकारनं देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा परिणाम दिसत आहे. जागतिक रेटिगंक संस्थांनी केंद्र सरकारनं उचलेल्या पावलांचं कौतुक केल आहे. या सर्व कारणांमुळे भारतीय शेअर बाजारावरील परकीय गुंतवणूक दारांचा विश्वास वाढल्याचं आसिफ इकबाल यांनी सांगितलं. (share market todays news sensex and nifty record high on tuesday here is details )

संबंधित बातम्या – 

gold today rate : बजेटनंतर अवघ्या 9 दिवसांत सोनं झालं स्वस्त, पाहा तुमच्या शहरातले आजचे भाव

‘या’ बड्या बँकेत 1 मार्चपासून होणार आहे मोठा बदल, नाही करता येणार पैसे ट्रान्सफर

Petrol Diesel Price Today: दिल्लीत पेट्रोल 87 रुपये पार; डिझेल खूप महाग; मुंबईत भाव काय?

(share market todays news sensex and nifty record high on tuesday here is details )

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.