AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market | रामलल्ला अयोध्येत होणार विराजमान! हे 5 दमदार शेअर तुमच्याकडे आहेत का?

Share Market | उद्या अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होत आहे. भव्यदिव्य राम मंदिर साकारत आहे. त्यामुळे अयोध्येतील विकास कामे, सेवा क्षेत्राशी संबंधित या कंपन्यांचे स्टॉक, शेअर बाजारात दमदार कामगिरी बजावत आहेत. इंडियन हॉटेल्स कंपनी आणि आयआरसीटीसीच्या शेअरमध्ये तेजीचे सत्र आहे.

Share Market | रामलल्ला अयोध्येत होणार विराजमान! हे 5 दमदार शेअर तुमच्याकडे आहेत का?
Follow us
| Updated on: Jan 21, 2024 | 11:21 AM

नवी दिल्ली | 21 January 2024 : सोमवारी, 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात येईल. अयोध्या आता धार्मिक राजधानी होणार आहे. जगभरातील भाविक भक्त अयोध्येकडे कूच करत आहेत, अयोध्येत वेगाने विकास कामे सुरु आहे. सेवा क्षेत्रात मोठ्या उलाढाली सुरु आहेत. त्याचा परिणाम शेअर बाजारात दिसून येत आहे. विकास आणि सेवा क्षेत्रातील कंपन्याच्या शेअरने बाजारात धुमाकूळ घातला आहे. या शेअरमध्ये तुफान आले आहे. प्राण प्रतिष्ठेनंतर हे शेअर रॉकेट सारखी घौडदौड करतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

  1. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड – राम मंदिरात दर्शनासाठी अयोध्येत काही दिवसांतच लाखो भाविक भक्त येतील. दरवर्षी हा आकडा कोट्यवधीच्या घरात जाईल. टाटा समूहाची हॉस्पिटॅलिटी कंपनी इंडियन हॉटल लिमिटेडने अयोध्येत दोन आलिशान हॉटेल तयार करण्याची योजना आखली आहे. Indian Hotels Company Share मध्ये तुफान तेजीचे सत्र आहे. हा शेअर 4.18 टक्क्यांनी उसळून 483 रुपयांवर बंद झाला. या शेअरने गेल्या एका महिन्यात 13 टक्के, सहा महिन्यात 23 टक्के, एका वर्षात 62 टक्के, तर पाच वर्षांत 262 टक्क्यांचा रिटर्न दिला.
  2. लार्सन अँड टुब्रो – लार्सन अँड टुब्रो कंपनीचा शेअर सध्या तेजीत आहे. या कंपनीला राम मंदिर तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 4.99 लाख कोटी रुपये आहे. टाटा समूहातील कंपनी Tata Consultancy Engineers पण या विकास कामात सहभागी आहे. एलअँडटीचा स्टॉक 1.15 टक्क्यांनी उसळला असून तो सध्या 3627.40 रुपयांवर बंद झाला. सहा महिन्यात या शेअरने 47 टक्के, एका वर्षात 63 टक्के परतावा दिला.
  3. प्रवेग लिमिटेड – Praveg Ltd Share च्या गुंतवणूकदारांना पण फायदा झाला आहे. ही कंपनी लक्झरी टेन्ट सिटी तयार करत आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 2440 कोटी रुपये आहे. या कंपनीने आलिशान रिसॉर्ट पण उभारले आहे. लक्षद्वीपमध्ये पण टेन्ट सिटी उभारण्यात येत आहे. कंपनीने एका वर्षात 63 रिटर्न परतावा दिला. एका वर्षात 200 टक्के, पाच वर्षात 44,000 टक्के परतावा दिला.
  4. IRCTC Limited – आयआरसीटीसीच्या शेअरने एका वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केले. रेल्वेच्या सेवांशी संबंधित या कंपनीने शनिवारच्या विशेष सत्रात 10.70 टक्क्यांची तेजीन नोंदवली. हा शेअर 1026.40 रुपयांवर आहे. तिकिट बुकिंगसह अनेक सुविधा ही कंपनी देते. IRCTC शेअरने एका महिन्यात 19 टक्के, सहा महिन्यात 65 टक्के, तर पाच वर्षांत 558 टक्के रिटर्न दिला.
  5. हे सुद्धा वाचा
  6. अपोलो सिंदुरी हॉटेल – नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील अपोलो सिंदुरी हॉटेलचा शेअर दमदार ठरला आहे. एका महिन्यात या शेअरमध्ये 48 टक्के, सहा महिन्यात 74 टक्के, एका वर्षांत 78 टक्के तर पाच वर्षांत 140 टक्क्यांची तेजी दिसून आली. हा शेअर सध्या 2285 रुपयांवर ट्रेड करत आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. 

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...