Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SHARE MARKET: घसरणीचं सत्र कायम, सेन्सेक्स 537 अंकानी डाउन; निफ्टी 17 हजारांच्या खाली

भारतीय शेअर बाजारातील अस्थिरतेचा भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIFE INSURANCE CORPORATION) बहुचर्चित एलआयसी आयपीओला फटका बसण्याची शक्यता आहे. आयपीओच्या बाजार मूल्याबाबत (MARKET VALUE) केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

SHARE MARKET: घसरणीचं सत्र कायम, सेन्सेक्स 537 अंकानी डाउन; निफ्टी 17 हजारांच्या खाली
घसरणीचं सत्र कायम, सेन्सेक्स 537 अंकानी डाउन; निफ्टी 17 हजारांच्या खालीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 5:30 PM

नवी दिल्लीः शेअर बाजारात (SHARE MARKET) अस्थिरतेचं सावट कायम आहे. तेजी-घसरणीचं चित्र आजही दिसून आलं. आज (बुधवार) सेन्सेक्स आणि निफ्टी एक टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. बँकिंग आणि फायनान्शियल्स सर्व्हिस सेक्टरमध्ये घसरण झाली. दोन्ही सेक्टरचे निर्देशांक एक टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले. आज (बुधवारी) सेन्सेक्स 537 अंकांच्या घसरणीसह 56,819 वर आणि निफ्टी 162 अंकांच्या घसरणीसह 17038 च्या स्तरावर बंद झाले. रिलायन्सचा इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (RELIANCE INDUSTRIES) (आरआयएल) शेअरमध्ये तेजी नोंदविली गेली. कंपनीचा मार्केट कॅपने 19 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. मार्केट कॅप (TOP MARKET CAP) मूल्यांकनचा टप्पा पार करणारी आरआयएल पहिली भारतीय कंपनी ठरली आहे

आजचे वधारणीचे शेअर्स (Todays Top gainers)

· हिरो मोटोकॉर्प (3.85%)

· टाटा स्टील (1.06%)

· एशियन पेंट्स (0.73%)

· टीसीएस (0.42%)

· बजाज ऑटो (0.35%)

आजचे घसरणीचे शेअर्स (Todays Top Loosers)

· बजाज फायनान्स (-7.27%)

· बजाज फिनसर्व्ह (-3.94)

· टाटा कॉन्स.प्रॉ (-2.85%)

· अदानी पोर्ट्स (-2.44%)

· श्री सिमेंट्स (-2.28%)

एलआयसीचं ठरलं?

भारतीय शेअर बाजारातील अस्थिरतेचा भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIFE INSURANCE CORPORATION) बहुचर्चित एलआयसी आयपीओला फटका बसण्याची शक्यता आहे. आयपीओच्या बाजार मूल्याबाबत (MARKET VALUE) केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सरकार बाजारमूल्य कंपनीच्या एकूण समभागाच्या 5 ते 3.5 टक्क्यांनी कपात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे एलआयसी शेअरची किंमत आणखी कमी होणार आहे. आयपीओचा प्राईस बँड पूर्वीच्या अंदाज 1,550 ते 1,700 रुपयांपेक्षा 902 ते 949 असणार आहे. सरकारने आयपीओच्या माध्यमातून निर्धारित केलेले 63 ते 65 हजार कोटींचे लक्ष्य 30-32 हजार कोटींवर येण्याची अंदाज आहे.

शेअर बाजाराचे अस्थिर घट-

• अमेरिका फेडरल रिझर्व्हचे व्याजदर फेररचनेचे संकेत

• रशिया-युक्रेन विवाद

• कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार

• महागाईचा उच्चांक

गुंतवणुकदारांचे आस्ते कदम

अर्थजाणकारांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ, वाढती महागाई, जीडीपी दरात वाढीचे संकेत यामुळे भविष्यात परकीय गुंतवणुकीचे प्रमाण कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. केवळ भारतच नव्हे जगातील अन्य भांडवली बाजारांना शेअर विक्रीचा सामना करावा लागतो आहे.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.