SHARE MARKET : घसरणीचं सत्र कायम, सेन्सेक्स 617 अंकानी डाउन; निफ्टी 17 हजारांच्या खाली

शेअर बाजारात (SHARE MARKET) सध्या अनिश्चिततेचं सावट आहे. गुंतवणुकदारांतील चलबिचल शेअर बाजाराच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.

SHARE MARKET : घसरणीचं सत्र कायम, सेन्सेक्स 617 अंकानी डाउन; निफ्टी 17 हजारांच्या खाली
घसरणीचे सलग 6 दिवस, शेअर बाजार गडगडलाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 7:21 PM

नवी दिल्ली : जागतिक अर्थकारणातील घडामोडीचा फटका भारतीय शेअर बाजाराला (INDIAN SHARE MARKET) बसला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये 1.25 टक्क्यांची घट नोंदविली गेली. शेअर बाजारात गेल्या आठवड्यात विक्रीचा दबाव दिसून आला. चालू आठवड्याची सुरुवातही घसरणीसह झाली. निफ्टी पुन्हा एकदा 17 हजार अकांच्या खाली बंद झाला. सेन्सेक्स 617.26 अंकाच्या घसरणीसह (1.08%) 56579.89 वर बंद झाला. निफ्टी 218 अंकाच्या घसरणीसह (1.27%) 16,953.95 वर पोहोचला. शेअर बाजारात (SHARE MARKET) सध्या अनिश्चिततेचं सावट आहे. गुंतवणुकदारांतील चलबिचल शेअर बाजाराच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात सेन्सेक्समध्ये 1141 अंकाची(1.95%)घसरण नोंदविली गेली. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना (SHARE MARKET INVESTOR) तब्बल 2.4 लाख कोटी रुपयांवर पाणी सोडावं लागलं आहे. (Share market update in Marathi sensex down by 617 point today)

विक्रीचा ओघ, मार्केट डाउन

भारतीय शेअर बाजारात घसरणीला मुख्यत्वे परकीय गुंतवणुकदार (FOREGIN INVESTMENT) कारणीभूत ठरले आहेत. सलग सातव्या महिना परकीय पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांनी विक्रीचा सपाटा लावला आहे. एप्रिल महिन्यात आतापर्यंत एकूण 12300 कोटी रुपयांचं भांडवल काढून घेण्यात आलं. गेल्या चार महिन्यात एफपीआयच्या माध्यमातून 1.22 लाख कोटी मूल्याच्या शेअर्सची विक्री करण्यात आली आहे.

शेअर बाजारावर परिणामकारक घट

• अमेरिका फेडरल रिझर्व्हचे व्याजदर फेररचनेचे संकेत • रशिया-युक्रेन विवाद • कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार • महागाईचा उच्चांक

गुंतवणुकदारांचे आस्ते कदम

अर्थजाणकारांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ, वाढती महागाई, जीडीपी दरात वाढीचे संकेत यामुळे भविष्यात परकीय गुंतवणुकीचे प्रमाण कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. केवळ भारतच नव्हे जगातील अन्य भांडवली बाजारांना शेअर विक्रीचा सामना करावा लागतो आहे. एफपीआयमध्ये एप्रिल महिन्यात तैवान, दक्षिण कोरिया आणि फिलिपिन्स देशांत विक्रीचं सत्र दिसून आलं.

आजचे वधारणीचे शेअर्स (Todays Top Gainers)

बजाज ऑटो (1.11%) एचडीएफसी बँक (0.75%) आयसीआयसीआय बँक (0.61%) एचडीएफसी (0.19%) मारुती सुझुकी (0.10%)

आजचे घसरणीचे शेअर्स (Todays Top Loosers)

कोल इंडिया (-6.78%) बीपीसीएल (-6.02%) टाटा स्टील (-4.48%) एसबीआय लाईफ इन्श्युरन्स (-4.04%) हिंदाल्को (-3.63%) (Share market update in Marathi sensex down by 617 point today)

इतर बातम्या

world richest people List : अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, गेल्या वर्षभरात संपत्तीमध्ये ‘इतकी’ वाढ

Share Market Updates : शेअर बाजारातील पडझड कधी थांबणार? आज पुन्हा एकदा सेन्सेक्स 700 अंकानी घसरला; गुंतवणूकदारांच्या अपेक्षेवर पाणी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.