SHARE MARKET TODAY: 4 दिवसांच्या घसरणीला ब्रेक! सेन्सेक्समध्ये 600 अंकांची वाढ

आज सेन्सेक्स (Sensex today) 581 अंकांच्या तेजीसह 53424 टप्प्यावर आणि निफ्टी 150 अंकांच्या तेजीसह 16013 वर बंद झाला. बाजारच्या अखरेच्या तासात मोठ्या प्रमाणात शेअर्स खरेदी करण्यात आले.

SHARE MARKET TODAY: 4 दिवसांच्या घसरणीला ब्रेक! सेन्सेक्समध्ये 600 अंकांची वाढ
शेअर बाजार
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 9:50 PM

नवी दिल्ली : शेअर बाजाराच्या(Share Market Updates) सलग चार दिवसांच्या घसरणीला आज ब्रेक लागला. काल (सोमवार) शेअर्स बाजारात मोठी पडझड नोंदविली गेली होती. आज (मंगळवार) सकाळपासून बाजार बंद होईपर्यंत मोठ्या प्रमाणात खरेदीवर जोर राहिला. आज सेन्सेक्स (Sensex today) 581 अंकांच्या तेजीसह 53424 टप्प्यावर आणि निफ्टी 150 अंकांच्या तेजीसह 16013 वर बंद झाला. बाजारच्या अखरेच्या तासात मोठ्या प्रमाणात शेअर्स खरेदी करण्यात आले. आज सेन्सेक्सवर टॉप-30 मधील 24 शेअर तेजीसह आणि सहा शेअर घसरणीसह बंद झाले. सनफार्मा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि NTPC शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. टाटा स्टील, पावरग्रिड आणि टायटन शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण नोंदविली गेली. शेअर बाजारातील तेजीमुळे रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत झाला.

एक्झिट पोलमुळं बळकटी!

फायनान्शियल्स सर्व्हिसचे रिसर्च हेड विनोद कुमार यांनी बाजारातील तेजीला फार्मा आणि आयटी क्षेत्रांत मजबूतीचे कारण सांगितलं आहे. निर्यात आधारित दोन्ही क्षेत्राला रुपयाच्या घसरणीमुळे बळकटी मिळाली आहे. तसेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले आहेत. उत्तर प्रदेशात पुन्हा भाजर सत्तास्थापनेच्या दिशेनं कौल असल्यामुळं गुंतवणुकदारांत स्थिरता पाहायला मिळाल्याचं निरीक्षण गुंतवणूक तज्ज्ञांनी वर्तविलं आहे. बाजारात 16 टक्के करेक्शन शेअर बाजारात आतापर्यंत सर्वोच्च उच्चांकापासून 16 टक्के करेक्शन दिसून आलं आहे. रशियाच्या आक्रमणामुळं जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठी आव्हानं उभी ठाकली आहे. क्रूड ऑईलच्या किंमती 13 वर्षांच्या सर्वोच्च स्तरावर आहेत. महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. अनेक कंपन्यांच्या महसूली गंगाजळीत थेट घट होण्याची शक्यता आहे.

आशिया बाजार डाऊन!

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम आशियाई शेअर बाजारावर दिसून आला आहे. हाँगकॉग, शांघाई आणि टोकियो सारख्या प्रमुख बाजारात घसरण नोंदविली गेली आहे. अमेरिकनं शेअर बाजारातही मोठ्या प्रमाणात घसरण झाली.

कच्च्या तेलाच्या किंमती गगनाला

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूड 2.87 टक्के वाढीसह 126.6 डॉलर प्रति बॅरल वर पोहोचले आहे. परकीय गुंतवणुकदार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेत आहे. शेअर बाजारातील माहितीनुसार, विदेशी गुंतवणुकदारांनी आज (सोमवारी) 7,482.08 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.

इतर बातम्या

Share Market | शेअर बाजारात शुगर स्टॉक्सचा गोडवा, 20 टक्क्यांची तेजी! गुंतवणूकदारांच्या खरेदीसाठी उड्या

आता इंटरनेटशिवायही वापरता येणार UPI सेवा! RBI कडून फीचर फोनसाठी यूपीआय सेवा सुरु

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.