Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ फार्मा कंपनीच्या शेअर्समध्ये 6 महिन्यांत 200 टक्क्यांहून अधिक परतावा, किंमत 40 रुपयांपेक्षा कमी

कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेनंतर या फार्मा कंपनीच्या स्टॉकमध्ये मोठी वाढ झाली आणि फक्त 6 महिन्यांत स्टॉक 200 टक्क्यांहून अधिक वाढला. गेल्या 6 महिन्यांत कंपनीचा शेअर 11.95 रुपयांवरून 38.75 रुपये झाला.

'या' फार्मा कंपनीच्या शेअर्समध्ये 6 महिन्यांत 200 टक्क्यांहून अधिक परतावा, किंमत 40 रुपयांपेक्षा कमी
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 10:49 AM

नवी दिल्लीः देशांतर्गत शेअर बाजार विक्रमी पातळीवर व्यवहार करीत आहे. बाजारातील तेजीदरम्यान अनेक मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभाग मल्टिबॅगर बनलेत. यापैकी एक म्हणजे राज मेडिसेफ इंडियाचा शेअर आहे. कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेनंतर या फार्मा कंपनीच्या स्टॉकमध्ये मोठी वाढ झाली आणि फक्त 6 महिन्यांत स्टॉक 200 टक्क्यांहून अधिक वाढला. गेल्या 6 महिन्यांत कंपनीचा शेअर 11.95 रुपयांवरून 38.75 रुपये झाला. राज मेडिसेफ इंडियाच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आणि त्यांची गुंतवणूक 6 महिन्यांत 1 लाख रुपयांनी वाढून 3.20 लाख रुपये झाली.

एक महिन्यात आपल्या भागधारकांना 30 टक्के परतावा

सोमवारी बाजारात कमकुवतपणा असूनही राज मेडिसेफ इंडियाच्या शेअरने उडी घेतली. बीएसईवर राज मेडिसेफ इंडिया लिमिटेडचा शेअर्स 4.87 टक्क्यांनी वाढून 38.75 रुपये झाला. स्मॉलकॅप फार्मा स्टॉक गेल्या आठवड्यात 7.5 टक्क्यांनी घसरला होता, गेल्या एक महिन्याच्या व्यापार सत्रात 41.85 रुपयांचा उच्चांक गाठल्यानंतर गेल्या आठवड्यात 7.5 टक्क्यांच्या जवळपास घसरला. फार्मा स्टॉकने गेल्या एक महिन्यात आपल्या भागधारकांना 30 टक्के परतावा दिला. गेल्या एका महिन्यात हा फार्मा स्टॉक 28.45 रुपये प्रति शेअरवरून 38.75 च्या पातळीवर गेला. या वर्षी आतापर्यंत त्यात 270 टक्के वाढ झाली, तर गेल्या एका वर्षात स्टॉक 224 टक्क्यांनी वाढला.

फेब्रुवारी 2021 मध्ये किंमत 10 रुपयांच्या खाली होती

फेब्रुवारी 2021 पर्यंत हा फार्मा स्टॉक प्रति शेअर 10 रुपयांच्या खाली व्यापार करत होता. कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेनंतर शेअर्स गगनाला भिडलाय.

1 लाखाचे 6 महिन्यांत 1.20 लाख केले

जर एखाद्या गुंतवणूकदाराने एक महिन्यापूर्वी फार्मा कंपनी राज मेडिसेफ इंडियाच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असती, तर त्याचे 1 लाखाचे वाढून 1.30 लाख झाले असते. दुसरीकडे जर 1 जानेवारी 2021 रोजी कोणी त्यात 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याची गुंतवणूक 3.70 लाख रुपये झाली असती. त्याचप्रमाणे जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी राज मेडिसेफ इंडियाच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याचे 1 लाख रुपये वाढून 3.24 लाख रुपये झाले असते. गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शेअर्समधून त्यांची गुंतवणूक काढून घेतली नाही.

संबंधित बातम्या

नोकरी शोधणाऱ्यांसाठी अलर्ट, EPFO ​चा हा सल्ला पाळल्यास पैसे राहणार सुरक्षित

ड्रोन उद्योगाला PLI योजनेतून संजीवनी मिळणार, 5000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित

Shares of Yaa Pharma return more than 200 per cent in 6 months, priced below Rs 40

केईएम रुग्णालयाकडून 'माय मराठी'चा अवमान, शिवसैनिकांनी गेटला फासलं काळं
केईएम रुग्णालयाकडून 'माय मराठी'चा अवमान, शिवसैनिकांनी गेटला फासलं काळं.
नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत
नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत.
दगंलीचं विस्तव विझेल पण भडकाऊ वक्तव्यांच काय? फडणवीसांची राणेंना तंबी
दगंलीचं विस्तव विझेल पण भडकाऊ वक्तव्यांच काय? फडणवीसांची राणेंना तंबी.
विकासचा मृत्यू मारहाणीमुळेच; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे
विकासचा मृत्यू मारहाणीमुळेच; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे.
औरंगजेब कबरीचा वाद सुरू अन् पुरातत्व विभागाकडून धक्कादायक माहिती उघड..
औरंगजेब कबरीचा वाद सुरू अन् पुरातत्व विभागाकडून धक्कादायक माहिती उघड...
लाडके असले तरी काहीही बोलायला मुभा नाही; नितेश राणेंना घरचा आहेर
लाडके असले तरी काहीही बोलायला मुभा नाही; नितेश राणेंना घरचा आहेर.
नागपुरातील हिंसाचाराला जबाबदार कोण? राड्यातील मास्टरमाईंडचे नाव समोर
नागपुरातील हिंसाचाराला जबाबदार कोण? राड्यातील मास्टरमाईंडचे नाव समोर.
कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू
कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू.
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'.
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला.