Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकारच्या निर्णयानंतर साखर कारखान्याचा मोठा निर्णय; ‘या’ गोष्टीसाठी 450 कोटींची तजवीज

Ethanol production | श्री रेणुका शुगर्स या कंपनीने इथेनॉल उत्पादन मोठ्याप्रमाणावर वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी कंपनीकडून 450 रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आता श्री रेणुका शुगर्सकडून दिवसाला 430 किलोलीटर ऐवजी 1400 किलोलीटर इथेनॉलचे उत्पादन केले जाईल.

मोदी सरकारच्या निर्णयानंतर साखर कारखान्याचा मोठा निर्णय; 'या' गोष्टीसाठी 450 कोटींची तजवीज
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 7:31 AM

नवी दिल्ली: देशभरात इंधनाच्या वाढत असलेल्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल (ethanol) मिसळवणे (ब्लेडिंग) बंधनकारक केले होते. 2025 पर्यंत देशभरात इथेनॉल ब्लेडिंगचे प्रमाण 20 टक्क्यांवर नेण्याचे मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर आता देशभरातील साखर कारखाने इथेनॉल निर्मितीसाठी पुढे सरसावले आहेत. (Shree Renuka Sugers will invest 450 crore for increasing ethanol production capicity)

श्री रेणुका शुगर्स या कंपनीने इथेनॉल उत्पादन मोठ्याप्रमाणावर वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी कंपनीकडून 450 रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आता श्री रेणुका शुगर्सकडून दिवसाला 430 किलोलीटर ऐवजी 1400 किलोलीटर इथेनॉलचे उत्पादन केले जाईल.

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्याचे लक्ष्य

पुढील दोन वर्षांत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. यामुळे देशाला महाग तेलाच्या आयातीवरील अवलंबन कमी करण्यास मदत होईल. केंद्र सरकारने 2025 पर्यंत हे लक्ष्य साध्य करण्याचे ठरवले होते. परंतु आता सरकारने निर्णय बदलला आहे. सरकारला हे लक्ष्य आता 2023 पूर्वी साध्य करायचे आहे.

गडकरी म्हणाले की, सध्या पेट्रोलमध्ये 8.5 टक्के इथेनॉल मिसळले जाते. 2014 मध्ये हेच प्रमाण 1-1.5 टक्के इतकं होतं. ते म्हणाले की इथेनॉल हे पेट्रोलपेक्षा चांगले इंधन आहे आणि ते आपल्याला आयात करावं लागत नाही. हे इंधन कमी खर्चिक, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी आहे. फ्लेक्स-फ्यूल इंजिन अनिवार्य केल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. कारण आपला देश कॉर्न सरप्लस आहे, आपण शुगर-गहु सरप्लस आहोत, आपल्याकडे हे सर्व धान्य साठवण्यासाठी जागा नाही.

इथेनॉल म्हणजे काय?

इथेनॉल हे एक प्रकारचं अल्कोहोल आहे, जे पेट्रोलमध्ये मिसळलं जातं आणि वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरलं जातं. इथेनॉल ऊसापासून तयार होतं. हे पेट्रोलमध्ये मिसळल्यास कार्बन मोनोऑक्साइडचे प्रमाण 35 टक्क्यांनी कमी होऊ शकतं. इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा सामान्य लोकांनाही मोठ्या प्रमाणात फायदा होईल. इथेनॉलने चालवलेली कार पेट्रोलपेक्षा कमी गरम होते. इथेनॉलमध्ये अल्कोहोलचे पटकन बाष्पीभवन होते, ज्यामुळे इंजिन लगेच गरम होत नाही.

इतर बातम्या:

पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘या’ तेलावर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन

सरकारची नवी E-Vehicle Policy सादर, चार्जिंग स्टेशनसाठी 10 लाखांचे अनुदान

Petrol & Diesel: राज्यात इंधनाच्या दराचा भडका; आठवडाभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ

(Shree Renuka Sugers will invest 450 crore for increasing ethanol production capicity)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.