Signal अ‍ॅप सुरक्षित आहे का? कंपनीच्या COO ने वापरकर्त्यांसाठी दिली महत्त्वाची माहिती

व्हॉट्सअ‍ॅपला मागे सोडून सिग्नल डाउनलोड करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. पण हा अ‍ॅपदेखील सुरक्षित आहे का?

Signal अ‍ॅप सुरक्षित आहे का? कंपनीच्या COO ने वापरकर्त्यांसाठी दिली महत्त्वाची माहिती
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 7:58 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांत व्हॉट्सअ‍ॅपला रामराम करत लोकांनी मोठ्या प्रमाणात सिग्नल अ‍ॅप डाऊनलोड केला आहे. पण काही दिवसांनी सिग्नलमध्येही व्हॉट्सअ‍ॅपसारख्या प्रायव्हसीचा प्रॉब्लेम येणार नाही ना? असा प्रश्न आता वापरकर्त्यांच्या समोर आहे. खरंतर, नवीन व्हॉट्सअ‍ॅप पॉलिसीमुळे वापरकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे असंख्य वापरकर्त्यांनी सिग्नल अ‍ॅप डाऊनलोड केलं. इतकंच नाही तर व्हॉट्सअ‍ॅपला मागे सोडून सिग्नल डाउनलोड करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. पण हा अ‍ॅपदेखील सुरक्षित आहे का? (signal user privacy is priority app not collect user metadata says coo aruna harder)

मीडिया रिपोर्टमधून समोर आलेल्या माहितीनुसार, सिग्नल हा जगातला सगळ्यात सुरक्षित अ‍ॅप्सपैकी एक आहे. कारण, या अ‍ॅपमध्ये वापरकर्ता डेटा सामायिक केला जात नाही आणि सिग्नल अ‍ॅप वापरकर्त्यांना वैयक्तिक माहितीही विचारत नाही. सिग्नलचे सीओओ अरुणा हाडर यांनी इंडिया टुडेला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये यासंबंधी माहिती दिली आहे. सिग्नलचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तो ग्राहकांकडून कुठलीही माहिती विचारत नाही.

या क्रॉस-प्लॅटफॉर्म एन्क्रिप्टेड मेसेजिंग सर्व्हिस सिग्नल अ‍ॅपने भारतासह जगातल्या अनेक देशांमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. डाऊनलोडिंगच्या बाबतीत सिग्नल अ‍ॅप (Signal App) टॉपवर आहेत. तसेच अनेक व्हॉट्सअ‍ॅप युजर्स टेलिग्राम अ‍ॅपवर शिफ्ट होत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपने त्यांच्या गोपनीयता धोरणाबाबत आतापर्यंत दोन वेळा स्पष्टीकरण दिले आहे. तसेच युजर्सचा डेटा कोणासोबतच शेअर केला जाणार नसून सर्व डेटा सुरक्षित आहे, असे स्पष्टीकरण देऊन व्हॉट्सअ‍ॅपने ग्राहकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने लोक व्हॉट्सअ‍ॅप बंद करुन सिग्नल किंवा टेलिग्राम अ‍ॅपवर शिफ्ट होत आहेत. त्यामुळे या महिन्यात नव्याने अ‍ॅप्स इन्स्टॉल करण्याच्या बाबतीत व्हॉट्सअ‍ॅप पिछाडीवर आहे. तर सिग्नल आणि टेलिग्राम या दोन अ‍ॅप्सनी बाजी मारली आहे. कारण सिग्नल आणि टेलिग्रामवरील युजर्स सातत्याने वाढत आहेत.

सिग्नल आणि टेलिग्राम या दोन्ही अ‍ॅप्ससाठी भारत हे सर्वात मोठं मार्केट आहे. भारतात 2.3 मिलियन युजर्सनी सिग्नल अ‍ॅप डाऊनलोड केलं आहे. तर टेलिग्रामला 25 मिलियन नवे भारतीय युजर्स मिळाले आहेत. सिग्नल अ‍ॅपसाठी अमेरिका हे दुसरं सर्वात मोठं मार्केट ठरलं आहे. 1 मिलियन अमेरिकन युजर्सनी सिग्नल अ‍ॅप डाऊनलोड केलं आहे. (signal user privacy is priority app not collect user metadata says coo aruna harder)

संबंधित बातम्या

तुमचा डेटा फेसबुकसोबत शेअर केला जात नाही, नव्या Privacy policy बाबत Whatsapp चं स्पष्टीकरण

व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस ग्रुप लिंक Goggle Search वर लीक, WhatsApp कडून भूमिका जाहीर

सावधान! गुगलच्या एका क्लिकवर तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये कोणीही होऊ शकतं सहभागी

(signal user privacy is priority app not collect user metadata says coo aruna harder)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.