‘सिल्व्हर कॉइन आटा’ची भेसळीविरुद्ध मोहीम, महाराष्ट्रासह गुजरातमध्ये गव्हाचे भेसळयुक्त पीठ जप्त
संघवी फूड्स प्रा. लि.चे अॅटर्नी व वकील राजेंद्र भन्साळी म्हणाले की, "आपल्या ग्राहकांची सुरक्षा व विश्वास कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. गव्हाच्या बनावट पीठाचे हे उत्पादक ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत होते. एकसारखे वाटणारे नाव व रंगसंगतीचा पॅकेजिंगसाठी वापर करून ग्राहकांची दिशाभूल करत होते.
मुंबई, 13 जानेवारी 2024 : ग्राहकांच्या आरोग्याला हानी पोहोचू नये आणि ब्रँडचा दर्जा कायम राहावा यासाठी संघवी फूड्स प्रा. लि.च्या सिल्व्हर कॉइन आटा (पीठ) यांनी मोठं पाऊल उचलत गव्हाचे भेसळयुक्त पीठ जप्त केले आहे. या भेसळयुक्त पिठामध्ये सिल्व्हर कॉइन ब्रँडच्या रंगांची कॉम्बिनेशन्स आणि ब्रेडच्या नवाशी साधर्म्य साधणारा मार्क (नाव) वापरले होते. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होणे शक्य होते. मुंबई आणि गुजरातमध्ये दाखल केलेल्या अनेक एफआयआरनंतर संघवी फूड्स प्रा. लि. यांनी सिल्व्हर कॉइन ट्रेडिशनल चक्की आटा या ब्रेडतर्फे धाडसत्र सुरू केले. याची सुरुवात मुंबई व आसपासच्या परिसरापासून करण्यात आली. त्याचप्रमाणे भेसळीच्या आणि बनावट ब्रेडिंगच्या मूळाशी जाण्यासाठी गुजरातमध्येही धाडी टाकल्या.
संघवी फूड्स प्रा. लि. यांनी पोलिस एफआयआरच्या जोरावर स्थानिक प्रशासनाच्या सहयोगाने मिरा रोड येथील काशीमिरा येथील एका कारखान्यात धाड टाकली. हा कारखाना मनिष राकेश सिंग यांच्या मालकीचा आहे. या ठिकाणी टीमला निकृष्ट दर्जाचे बनावट पीठ तयार होत असल्याचे आढळून आले. पिवळ्या व लाल रंगसंगतीच्या पॅकेजिंगमध्ये आणि सिल्व्हर कुक या ब्रेड नावाच्या अंतर्गत अशलेले 2.500 टनांहून अधिक बनावट पीठ आणि 43000 पॅकेजिंग बॅग्स या ठिकाणाहून जप्त करण्यात आले. या टीमने बजरंग किराणा स्टोअर व गीता एजन्सीज या ठिकाणीही धाड टाकली आणि या ठिकाणाहून 118 बॅग जप्त केल्या.
आधीही धाडसत्र
ब्रेड आणि त्यांची बौद्धिक संपदा यांचे संरक्षण करण्यासाठी या आधी संघवी फूड्सने लीगल टीमच्या मदतीने अनेक ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. कंपनीने महाराष्ट्रातील नालासोपारा येथील अपना बाजार आणि पालघर येथील ओम साई ट्रेडर्समधून बनावट उत्पादने जप्त केली. यातून गव्हाचे भेसळयुक्त पीठ उत्पादनकर्ते निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आरोपीला अटक करून दोन दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. धाडसत्राच्या माध्यमातून संघवी फूड्सने हे साटेलोटे उघडकीस आणले आहे, जे शेजारील राज्यात देखील पसरले आहे. कंपनीने गुजरात राज्यातील वलसाडजवळील उमरगाम येथील हेमंत सुरेश रावल यांच्यावर धाड टाकली. या धाडीमध्ये 2.5 टन बनावट पीठ जप्त केले. या पीठाच्या पॅकेजिंगवर Silver Cion सारखे नकली ब्रेड नाव घातले होते. त्याचप्रमाणे अनेक अतिरिक्त टन रिकामे पॅकेजिंगही या ठिकाणी आढळले.
गुजरातमध्येही छापेमारी
गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील चिखली येथेही छापा मारण्यात आला होता. हीत हरेशफाई छापला याच्या रिद्धी सिद्धी ग्रेन प्रोसेसिंगमध्ये Silver Cool, Select Cool यासारख्या बनावट नावाच्या पिवळ्या व लाल रंगसंगतीचे पॅकेजिंग असलेले सुमारे तीन टन गव्हाचे पीठ जप्त केले. या ठिकाणी कित्येक टन रिकामे पॅकेजिंग होते. दर्जा आणि अस्सलेतचा अतूट निर्धार असणारा बँड म्हणून ओळख असलेल्य या बँडने तत्काळ कायदा अंमलबजावणी विभागाच्या सहयोगाने बनावट उद्योग करणाऱ्या स्रोतांचा छडा लावला.
ते आरोग्याशी खेळत होते
संघवी फूड्स प्रा. लि.चे अॅटर्नी व वकील राजेंद्र भन्साळी म्हणाले की, “आपल्या ग्राहकांची सुरक्षा व विश्वास कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. गव्हाच्या बनावट पीठाचे हे उत्पादक ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत होते. एकसारखे वाटणारे नाव व रंगसंगतीचा पॅकेजिंगसाठी वापर करून ग्राहकांची दिशाभूल करत होते. सिल्व्हर कॉइन या ब्रँड लेबलची नक्कल वापरून अनधिकृत उत्पादन आणि वितरण करून ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत होता. तसेच इतक्या वर्षापासून कंपनीने ग्राहकांमध्ये निर्माण केलेल्या विश्वासाला तडा जात होता.”
आवाहन काय?
संघवी फूड्सचे संचालक राहुल संघवी म्हणाले की, “बनावट उत्पादनांपासून ग्राहकानी सतर्क राहावे आणि अधिकृत आणि प्रतिष्ठित रिटेलर्सकडूनच सिल्व्हर कॉइन आटा उत्पादने खरेदी करावी, असे आवाहन आम्ही करत आहोत. ग्राहकांना सुरक्षित व अस्सल उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे संघवी फूड्सने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. बाजारात बनावट उत्पादनांचे वितरण होण्याला प्रतिबंध करण्यासाठी दर्जा नियंत्रणात्मक उपाययोजना राबविण्यासाठी यापुढेही आम्ही प्रयत्नशील राहू.”
संघवी फूड्स प्रायव्हेट लिमिटेड बाबत…
संघवी ग्रुप ऑफ कंपनी ही ब्रँड सिल्व्हर कॉईनसह ओळखली जाते. प्रत्येक घरातील हे विश्वासहार्य नाव आहे. 1990मध्ये 60 मॅट्रीक टन इतक्या छोट्या उत्पादनापासून या कंपनीची सुरुवात झाली होती. आता या कंपनीची गहू दळण्याची दिवसाची क्षमता 3000 मॅट्रीक टन इतकी मोठी झाली आहे. कंपनीच्या एकूण सात यूनिटमध्ये हे उत्पादन घेतलं जात आहे. या कामासाठी स्वित्झर्लंडच्या अत्याधुनिक मशीनचा चार राज्यातील युनिटमध्ये वापर केला जात आहे. या प्लांटला FSSC 22000 प्रमाणपत्र आहे. USFDA 22000 प्रमाणपत्रही आहे. तसेच ISO 9001:2008 आणि HACCP प्रमाणपत्रही आहे.
रिटेल सेमेंटमध्ये सिल्व्हर कॉईन हा देशातील चक्कीच्या पीठाचा सर्वात आघाडीवरचा आणि यशस्वी ब्रँड आहे. आता हा ब्रंड रवा, डाळ, बेसन, सुजी, मैदा, विविध धान्यांचे पीठ, बाफ्ला पीठ, ज्वारीचे पीठ, मक्याचे पीठ, मिसी रोटी पीठ, सोया उत्पादन आणि साबुदाना आदी पीठही या ब्रँडमधून दिले जाते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एफएमसीजीही या कंपनीचे ग्राहक आहेत.