Mukesh Ambani : या पेनी शेअर कंपनीचे नशीब पालटणार, मुकेश अंबानी खेळणार मोठा डाव!

Mukesh Ambani : दिवाळखोरीत निघालेल्या या कंपनीचे लवकरच नशीब पालटणार आहे. मुकेश अंबानी मोठा डाव खेळणार असल्याने गुंतवणूकदारांना येत्या काही दिवसात कमाईची संधी मिळू शकते. तेव्हा या घडामोडींवर नक्की लक्ष असू द्या.

Mukesh Ambani : या पेनी शेअर कंपनीचे नशीब पालटणार, मुकेश अंबानी खेळणार मोठा डाव!
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 10:10 AM

नवी दिल्ली : दिवाळखोरीत निघालेल्या या कंपनीचे लवकरच नशीब पालटणार आहे. मुकेश अंबानी मोठा डाव खेळणार आहेत. टेक्सटाईल सेक्टरमधील कंपनी सिंटेक्स इंडस्ट्रीज (Sintex Industries) कर्जात आकंठ बुडालेली आहे. रिलायन्स समूह या कंपनीचे लवकरच नशीब पाटलवणार आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (NCLT) रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आणि एसेट्स केअर अँड रिकंस्ट्रक्शन एंटरप्राईज (ACRE) यांनी या कंपनीसाठी संयुक्त बोली लावली होती. या प्रक्रियेला एनसीएलटीने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना येत्या काही दिवसात कमाईची संधी मिळू शकते. तेव्हा या घडामोडींवर नक्की लक्ष असू द्या.

सिंटेक्स इंडस्ट्रीजने या नवीन घडामोडींची शेअर बाजाराला अधिकृत माहिती दिली. त्यानुसार, अहमदाबाद येथील एनसीएलटीच्या खंडपीठाने शुक्रवारी तोंडी आदेश दिले. त्यात आरआयएल आणि एसीआरईच्या संयुक्त कर्ज समाधान योजनेला मंजुरी देण्यात आली. अर्थात अजून याविषयीची ऑर्डर कंपनीला अद्याप मिळालेली नाही.

रिलायन्स एसीआरईच्या योजनेत शेअर भांडवल कपात आणि शून्य मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सला गैर-सुचीबद्ध यादीत समावेशालाही मंजूरी देण्यात आली आहे. याविषयीची माहिती सिंटेक्सन इंडस्ट्रीजने बाजाराला दिली आहे. आदेशाची प्रत प्राप्त झाल्यानंतर याविषयीची अधिकृत माहिती कंपनी देणार आहे.

हे सुद्धा वाचा

अहवालानुसार, रिलायन्स-एसीआरआय यांनी संयुक्तपणे जवळपास 3,650 कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवला आहे. सर्वात चांगली बाब म्हणजे, सिंटेक्स इंडस्ट्रीजच्या कर्जदारांनी रिलायन्स-एसीआरआयच्या संयुक्त बोलीच्या बाजूने मतदान केले होते. त्यानंतर गेल्या वर्षी मार्च 2022 मध्ये कंपनीने याविषयीचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी एनसीएलटीकडे पाठविला होता.

सिंटेक्स इंडस्ट्रीज दिवाळखोरीत गेली होती. या कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया गेल्या एप्रिल,2022 मध्ये सुरु करण्यात आली होती. या कंपनीवर 7500 कोटी रुपयांचे कर्ज थकित आहे. अर्थात या बोली प्रक्रियेत केवळ रिलायन्स-एसीआरआय हे सहभागी नव्हते. त्याच्यासोबत इतरही मोठ्या कंपन्या या बोली प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या.

या बोली प्रक्रियेत रिलायन्स-एसीआरआय यासह ईजीगो टेक्सटाईल्स, जीएचसीएल आणि हिमत्सिंगका वेंचर्स असे तगडे खेळाडूही सहभागी झाली होते. बीएसई निर्देशांकावर सिंटेक्स इंडस्ट्रीजच्या शेअरचा भाव 2.21 रुपये आहे. हा शेअर 1.78 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला आहे. सध्या कंपनीचा हा शेअर 52 आठवड्यांच्या निच्चांकी स्तरावर आहे. हा कुठलाही गुंतवणुकीचा सल्ला नाही. बाजारातील ही अपडेट आहे.

मुकेश अंबानी हे सातत्याने त्यांच्या उद्योगाचा पसारा वाढवत आहे. त्यांच्या व्यवसायाचा विस्तार होत आहे. नवनवीन उद्योग सुरु करत आहेत. गेल्या वर्षी 2022 मध्ये त्यांनी एकानंतर एक नवीन करार केला आहे. तर यावर्षीच्या सुरुवातीला 2023 मध्ये रिलायन्स उद्योग समूहाने (Reliance Industries Group) आणखी एक मोठी डील केलेली आहे. रिलायन्स समूहाच्या Reliance Retail ने पुन्हा एक नवीन उद्योग त्यांच्या ताब्यात घेण्याची घोषणा केली आहे. गुजरातमधील 100 वर्ष जुनी बेवरेज कंपनी सोस्योचा (Sosyo) अर्धा हिस्सा रिलायन्स समूहाचा झाला आहे.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.