AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SIP : 500 रुपयांची बचत, तुम्हाला करेल लखपती, समजून घ्या एसआयपीचे गणित..

SIP : एक छोटीशी रक्कमही तुम्हाला लखपती बनवू शकते..पण नियोजन तेवढे हवे..

SIP : 500 रुपयांची बचत, तुम्हाला करेल लखपती, समजून घ्या एसआयपीचे गणित..
छोटी बचत, मोठा फायदाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 29, 2022 | 6:48 PM

नवी दिल्ली : स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या रक्कमेची नेहमी गरज लागते. पण समस्या तेव्हा येते, जेव्हा मोठ्या रक्कमेसाठी (Huge Amount) तु्म्हाला नियोजन करता येते नाही. कोणी वेळेवर तुम्हाला एवढी मोठी रक्कमही देऊ शकत नाही. त्यामुळे भविष्यातील मोठ्या गुंतवणुकीसाठी (Investment) आतापासूनच योग्य आर्थिक नियोजन (Financial Planning) करणे आवश्यक आहे.

पारंपारिक आर्थिक गुंतवणुकीच्या योजना तुमचे मोठे स्वप्न पूर्ण करु शकत नाही. महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने तुम्हाला अधिक फायदा देणाऱ्या आर्थिक नियोजनाची गरज आहे. अशावेळी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा चांगला पर्याय ठरू शकतो.

तर म्युच्युअल फंडात एसआयपी द्वारे केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यातील मोठ्या उद्दिष्टासाठी फायदेशीर ठरेल. एसआयपीद्वारे दर महिन्याला एक ठराविक अल्प रक्कम गुंतवल्यास तुम्ही काही वर्षात लखपती व्हाल.

हे सुद्धा वाचा

दर महिन्याला केवळ 500 रुपयांची गुंतवणूक करुन तुम्ही भविष्यातील मोठ्या रक्कमेचे मालक होऊ शकता. तर हे उद्दिष्ट कसे साध्य होईल ते पाहुयात..

जर तुम्ही दर महिन्याला म्युच्युअल फंडात 500 रुपयांची गुंतवणूक केली तर हे लक्ष्य गाठता येईल. एसआयपीद्वारे दर महिन्याला तुम्हाला ही गुंतवणूक करता येईल. 11 वर्षे म्हणजे 132 महिने तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल.

दर महिन्याला 500 रुपयांची बचत केल्यास 11 वर्षांत तुमचे एकूण 66,000 रुपये जमा होतील. जर 11 वर्षात सरासरी 30 टक्क्यांनी परतावा मिळाल्यास तुम्हाला 4,47,206 लाख रुपयांचा परतावा मिळेल. म्हणजे एकूण 5,13,208 रुपये मिळतील.

सरासरी 20 टक्क्यांचा परतावा जरी गृहित धरला तरी तुम्ही लखपती असाल. विशेष म्हणजे ही रक्कम तुम्ही एकदाच गुंतवलेली नसेल. दर महिन्याला खर्चातून एक छोटीशी रक्कम तुम्हाला बचत म्हणून जमा करावी लागेल.

एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात दीर्घकाळ केलेली गुंतवणूक अधिक फायदेशीर असल्याचा दावा बाजारातील तज्ज्ञ करतात. अर्थात त्यासाठी योग्य म्युच्युअल फंडाची निवड करणे आवश्यक आहे. गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने तुम्ही यामध्ये गुंतवणूक करु शकता.

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.