Chandubhai Virani : या वेफर्स कंपनीची 4000 कोटींची उलाढाल, चंदूभाई विराणी यांच्या कष्टाला तोड नाही

Chandubhai Virani : अनंत अडचणींचा सामना करुन, जगण्यासाठी संघर्ष करत असतानाच मोठा उद्योग उभारण्याचे स्वप्न साकारणे साधं काम नाही. चंदूभाई विराणी यांची यशोगाथा तुम्ही वाचली का?

Chandubhai Virani : या वेफर्स कंपनीची 4000 कोटींची उलाढाल, चंदूभाई विराणी यांच्या कष्टाला तोड नाही
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 6:44 PM

नवी दिल्ली | 20 जुलै 2023 : स्वप्नांचा पाठलाग करणे सोपं नसतं. अनेक जण अर्ध्यातच प्रयत्न सोडून देतात. पण काही जण त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवतात. छोट्या कामातून अनेक जण मोठी झेप घेतात. बालाजी वेफर्स (Balaji Wafers) ही अशीच एक कंपनी आहे. तुम्ही नक्कीच हे वेफर्स खाल्ले असेल. पण या कंपनीची माहिती तुम्हाला नसेल. हा ब्रँड भारतभर गाजत आहे. पण ब्रँड पर्यंतचा या कंपनीचा प्रवास सोपा नव्हता. गुजरातच्या गल्लीतून आज देशभरात या ब्रँडचा पसारा पसरला आहे. त्यासाठी चंदूभाई विराणी (Chandubhai Virani) यांनी अफाट श्रम घेतले आहे. पोटाला चिमटा देत त्यांनी हे स्वप्न मोठ्या कष्टाने साकारले आहे. काय आहे त्यांची यशोगाथा..कशी मिळाली त्यांना उद्योगाची प्रेरणा, किती खडतर होता हा प्रवास..

संघर्ष पाचवीलाच

चंदूभाई यांचा जन्म एका साधारण कुटुंबात झाला. आर्थिक चणचण होती. त्यामुळे संघर्ष त्यांच्या पाचवीलाच पुजला होता. पैशांची तंगी होती. वयाच्या 15 वर्षीच त्यांच्यावर कुटुंबाला हातभार लावण्याची जबाबदारी येऊन पडली. छोटी कामे करुन त्यांनी पैसा जमावला. चंदूभाई यांनी दोन भाऊ मेघजीभाई आणि भीखूभाई यांच्यासोबत नवीन व्यवसाय करण्याचा निश्चय केला. त्यावेळी त्यांनी 20,000 रुपयांचे भांडवल जमावले. त्यांनी राजकोट येथे कृषी उत्पादनाचा व्यवसाय सुरु केला. पण हा व्यवसाय चौपट झाला. ते मोठ्या आर्थिक संकटात अडकले.

हे सुद्धा वाचा

नशीबाने थट्टा मांडली

सर्व जमापुंजी संपल्याने त्यांना बिगारी काम करावे लागले. पोट भरण्यासाठी त्यांनी चित्रपटगृहाच्या कँटीनमध्ये काम सुरु केले. चित्रपटाची पोस्टर चिपकावली. पण घराचं भाडं सुद्धा भरण्याची तजवीज झाली नाही. त्यांना घर सोडावं लागलं. त्यांनी कँन्टिनमध्येच रात्री झोपण्याची सोय केली. त्यांचा प्रामाणिक पणा उपयोगी आला. कँटीन मालकाने त्यांना एक हजार रुपये महिना दिला. येथून त्यांच्या मेहनतीला बळ मिळाले. त्यांना हुरुप आला.

गरज शोधाची जननी

चंदूभाई हे चित्रपटगृह आणि कँटीन यामध्ये गुंग होते. तेव्हा सिनेमा पाहताना प्रेक्षक वेफर्सवर ताव मारतो हे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत त्यांनी घर शोधले. त्यांनी वेफर्स इंडस्ट्रीत नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तोपर्यंत बऱ्यापैकी रक्कम जमवली होती. 10,000 रुपयांत त्यांच्या व्यवसायाला सुरुवात झाली. घराच्या अंगणापासून व्यवसाय बहरला. हे चिप्स ते थिएटरमध्ये विक्री करत. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

मागे वळून पाहिले नाही

वेफर्स हातोहात खपू लागले. त्यामुळे चंदूभाईंनी राजकोट येथील गुजरात एमआयडीसीत एक गाळा घेऊन तिथेच बटाटे वेफर्सची सुरुवात केली. ही कंपनी अगदीच छोटी होती. पुढे व्यवसाय वाढला. त्यांनी बँकेकडे कर्ज मागितले. बँकेने त्यांना 50 लाख रुपयांचे कर्ज दिले.

बालाजी वेफर्सचे मार्केट

1992 मध्ये चंदूभाई यांनी भावांना सोबत घेऊन बालाजी वेफर्स प्रायव्हेट लिमिटेडची सुरुवात केली. त्याच वर्षी देशात चार ठिकाणी कारखाने सुरु केले. आर्थिक वर्ष 2011 पर्यंत बालाजी वेफर्सची उलाढाल 4,000 कोटी रुपयांपर्यंत पोहचली.

हजारो हातांना काम

आज बालाजी वेफर्स 5,000 व्यक्तींना रोजगार देत आहे. यामध्ये आर्धी संख्या महिलांची आहे. चंदूभाईंना आजही त्यांचे जूने दिवस आठवतात. कधी-कधी दोन वेळेच्या जेवणाला पण ते मुकले होते. पहिलाच व्यवसायात हात भाजल्यानंतर त्यांना पोट भरण्यासाठी अनेक कामे करावी लागली. पण अशा चुकातूनच मनुष्य शिकतो आणि काही तर करुन दाखवतो. चंदूभाई हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी कष्टाने आकाश व्यापले आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.