गोल्ड बाँडमध्ये गंतवणुकीची सोनेरी संधी आली चालून, स्वस्तात सोन्यात गुंतवणुकीच्या पायघड्या ठेवल्यात अंथरुण 

तुम्ही आजपासून  गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करू शकता, गोल्ड बाँडच्या बाजार मूल्याची रिझर्व्ह बँकेने घोषणा केली असून, या बाजार मूल्यानुसार गुंतवणुकदारांना गुंतवणूक करता येईल. गुंतवणूकदारांचा दर प्रति ग्रॅम ४७८६ रुपये निश्चित करण्यात आला आहे. डिजिटल पेमेंटवरील दर ४७३६ रुपये असेल. त्यावर 50 रुपयांची विशेष सूट देण्यात आली आहे. 

गोल्ड बाँडमध्ये गंतवणुकीची सोनेरी संधी आली चालून, स्वस्तात सोन्यात गुंतवणुकीच्या पायघड्या ठेवल्यात अंथरुण 
सोने
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 10:11 AM

देशभरातील गुंतवणुकदारांसाठी आजची गुंतवणूक त्यांचे सोनेरी भविष्य घडवू शकते. त्यांचे भविष्य पिवळं धम्मक होऊन त्याला सोनेरी लकाकी ही चढू शकते. जास्त विचार करु नका, हा सोनेरी मोका चुकवू नका. तर ज्या योजनेविषयी आम्ही भरभरुन बोलत आहोत. ती आहे, रिझर्व्ह बँकेने (RBI)  स्वस्तात सोने खरेदी करण्याची योजना. या योजनेचे गोल्ड बाँडमध्ये (Gold Bond Scheme 2021-22) असे नाव आहे.

या योजनेत गुंतवणुकीची संधी बँकेने उपलब्ध करुन दिली आहे. रिझर्व्ह बँकेने नवीन हप्त्यासाठी इश्यू प्राईस (Gold bond issue price) निर्गम मूल्य/ बाजार मूल्य घोषीत केले आहे. आजपासून या योजनेत गुंतवणुकदारांना गुंतवणूक करता येईल.  गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुकीसाठी 5 दिवसांचा कालावधी असेल.  10 ते 14 जानेवारी दरम्यान या बाँडचे इश्यु प्राईसमध्ये गुंतवणूक करता येऊन हिस्सेदार होता येईल.  बाँडचे इशु प्राईस अर्थात बाजारातील पदार्पणाची निर्धारीत किंमत 4,786 रुपये प्रति ग्रॅम ठरविण्यात आली आहे.

ऑनलाईन गुंतवणुकदारांना विशेष सूट 

गोल्ड बाँडमध्ये ऑनलाईन गुंतवणूक करणा-या सदस्यांना, हिस्सेदारांना विशेष सूट देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करणा-या आणि इश्यू प्राईस ऑनलाईन  खरेदी करणा-या सदस्यांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन सदस्यांसाठी गोल्ड बॉंडची पदार्पणाची निर्धारीत किंमत 4,736 रुपये प्रति ग्रॅम आहे. यापूर्वी 29 नोव्हेंबर रोजीच्या इश्यू प्राईससाठी अर्जदारांना प्रति ग्रॅम 4,791 रुपये मोजावे लागले होते. 3 डिसेंबर 2021 रोजी पर्यंत या गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करता आली होती.

या सोने रोखीत (Gold Bond Scheme 2021-22) या आर्थिक वर्षात  किमान १ ग्रॅम आणि जास्तीत जास्त ४ किलो सोने खरेदी करता येईल. संयुक्त कुटंबाला 4 किलो तर संस्थेला 20 किलोपर्यंत सोने रोखेत खरेदी करुन नशीब आजमावता येईल.  गोल्ड बाँड गुंतवणूकदारांना वार्षिक २.५ टक्के वार्षिक दराने व्याज मिळेल. तर अर्ध वार्षिक व्याजही मिळेल. योजनेतून बाहेर पडताना भांडवली नफा कर (capital gain tax) कपात करण्यात येणार नाही. तसेच कर्ज घेतानाही तारण म्हणून गुंतवणुकदार या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

GST सह अन्य शुल्काची कटकट नाही

सोन्याचे रोखे हे प्रत्यक्ष सोने नाही. हा सर्व अभासी सोने खरेदी-विक्रीचा व्यवहार आहे. त्याची व्यापार देवाण-घेवाण करता येते. परिणामी  त्याच्या साठवणुकीत कोणतीही अडचण नाही. त्याचा व्यापार एक्स्चेंजवर केला जाऊ शकतो,

हा व्यवहार GST सह अन्य शुल्काच्या परिघात येत नाही.. संबंधित खासगी बँका,पोस्ट ऑफिस, ठराविक परदेशी बँका, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (shcil) आणि परवानाधारक स्टॉक एक्स्चेंजच्या एजंटांमार्फत रोखे खरेदी केले जाऊ शकते.

8 वर्षांचा कालावधी 

सोने रोखे हा अभासी व्यवहार असला तरी त्याचा परतावा हा 24 कॅरेट सोन्याच्या मुळ मुल्याधारित असतो. या सोन्याच्या शुद्धतेची पूर्ण हमी भारत सरकार देते. त्यामुळे 8 वर्षांच्या कालावधीनंतर त्यावेळेसच्या 24 कॅरेट सोन्याच्या मुल्याआधारित सरकारने निर्धारित केलेल्या व्याजदरानुसार परतावा देण्यात येईल. विशेष म्हणजे योजनेतून बाहेर पडताना भांडवली नफा कर (capital gain tax) कपात करण्यात येणार नाही. तसेच कर्ज घेतानाही  गुंतवणुकदार गोल्ड बाँड तारण ठेऊ शकतील.

5 वर्षानंतर योजनेतून बाहेर पडू शकता

योजनेचा कालावधी 8 वर्षांचा आहे. तरीही योजनेतून बाहेर पडायचे असेल तर 5 वर्षानंतर बाहेर पडता येते.  मुदतपूर्तीपूर्वी रोखे विकण्यावर व्यवहार शुल्क जास्त असते. एकूणच सोन्यात गुंतवणूक करण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. त्यात २४ कॅरेट सोन्याची हमी सरकार देत आहे. 8 वर्षांच्या कालावधीनंतर सरकार निश्चित असे व्याज देत आहे आणि 8 वर्षानंतर सोन्याचे जे मुल्य असेल त्यानुसार परतावा मिळणार आहे.

कुठे करु शकता गुंतवणूक

रिझर्व्ह बँकेने नेमूण दिलेली बँका, टपाल खाते, त्याच्याशी संबंधित शाखा, स्टॉक एक्सचेंज याठिकाणी गोल्ड बाँड खरेदी करता येतात. ब्रोकर, एजंट यांच्याकडूनही खरेदीचा पर्याय उपलब्ध आहे. डीमॅट अकाऊंटच्या माध्यमातूनही बाँडमध्ये गुंतवणूक करता येते.

संबंधित बातम्या : 

HDFC व्यवहाराच्या माहितीसाठी आता प्रति SMS 20 पैसे मोजा, Insta Alert Services च्या नियमांमध्ये बदल 

तुम्ही ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड वापरता ? तुमच्यासाठी आहे मोठी बातमी, वेळेवर परतावा केला नाही तर भरावा लागणार दंड

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....