स्पाईसजेटची मोठी घोषणा, 38 नव्या मार्गांवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाईट सुरु करणार

स्पाइसजेटने बुधवारी मुंबई आणि उदयपूर सारख्या देशांतर्गत ठिकाणांना जोडणाऱ्या  38 नवीन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांची घोषणा केली आहे.

स्पाईसजेटची मोठी घोषणा, 38 नव्या मार्गांवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाईट सुरु करणार
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 1:53 PM

नवी दिल्ली: देशांतर्गत विमान वाहतूक कंपनी स्पाईस जेट वेगाने आपल्या उड्डाणांचे मार्ग वाढवत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, स्पाइसजेटने बुधवारी मुंबई आणि उदयपूर सारख्या देशांतर्गत ठिकाणांना जोडणाऱ्या  38 नवीन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांची घोषणा केली आहे. विमान वाहतुकीद्वारे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि लहान शहरे देशाच्या विमान वाहतुकीच्या नकाशावर आणणे ही कंपनीची वचनबद्धता आहे, असं स्पाईसजेटच्यावतीनं सांगण्यात आलं आहे.

कोणत्या मार्गावर नवीन उड्डाणे सुरू

स्पाइसजेट टप्प्याटप्प्याने उड्डाणे सुरू करत आहे. स्पाइसजेटची नवी उड्डाणे दिल्ली-वाराणसीसह बंगळुरू आणि जयपूरसाठी असतील. याशिवाय जयपूर-मुंबई, चेन्नई आणि पुणेसाठी नवीन उड्डाणे सुरू होत आहेत. बंगळुरू आणि दिल्ली, बंगळुरू आणि मंगलोर, किशनगड आणि मुंबई, चेन्नई आणि गोवा येथे उड्डाणांची संख्या वाढवण्याचीही विमान कंपनीची योजना आहे.

या मार्गांवर फ्लाईट सुरु

स्पाईसजेट कंपनीनं ऑगस्टमध्ये कंपनीने भावनगर-दिल्ली, भावनगर-सूरत, ग्वाल्हेर-जयपूर, किशनगड (अजमेर) -मुंबई, पुणे-तिरुपती आणि वाराणसी-डेहराडूनची पहिली उड्डाणे सुरू केली. भावनगर हे गुजरातमधील सहावे मोठे शहर आहे, जिथे स्पाइसजेटने विमान सेवा सुरू केली आहे. नवीन मार्गावरील उड्डाणं सुरु ठेवण्यासाठी स्पाईसजेट एअरलाईन आपल्या Q400 विमानांचा वापर करणार असल्याची माहिती आहे. स्पाइसजेटने अलीकडेच चेन्नई ते विशाखापट्टणम, हैदराबाद आणि कोलकाता नॉन-स्टॉप फ्लाइट सुरू करण्याची घोषणा केली आहे.

इंडिगोची नवीन सेवा सुरू

इंडिगो कंपनीनं नवीन व्हॉट्सअॅप द्वारे माहिती देणारी सुविधा सुरु केली आहे. आता ग्रारकांना फ्लाईटची माहिती, बुकिंगची माहिती व्हॉट्सअॅपवर काही सेकंदात उपलब्ध होईल. ही सेवा ग्राहकांसाठी 24 तास, आठवड्यातील सात दिवस उपलब्ध असेल.

इंडिगोच्या ग्राहकांना त्यांच्या व्हॉट्सअॅपवर डॉटीशी गप्पा मारण्यासाठी फक्त हाय टाइप करणे आवश्यक आहे. येथे तुम्ही तुमच्या फ्लाइट तिकिटाचा तपशील, बॅगेज अलाऊन्स, प्रवासासंबंधी महत्त्वाच्या सूचना, प्रवासाचे कोविड प्रोटोकॉल, फ्लाइट अलर्ट इत्यादी माहिती मिळेल.

जर इंडिगोच्या ग्राहकांनी फ्लेक्स पे/होल्ड बुकिंगचा पर्याय निवडला, तर त्यांना पेमेंट पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचं बुकिंग निश्चित करण्यासाठी व्हॉट्सअॅपवर एक लिंक मिळते. प्रवाशांच्या सोयीसाठी, इंडिगोकडून ग्राहकांना बुकिंग करताच लगेचच व्हॉट्सअॅपवर बुकिंग कन्फर्मेशन देण्यात येतं. या व्यतिरिक्त, इंडिगो व्हॉट्सअॅपवर फ्लाइट रिमाइंडरही पाठवेल.चेक-इन ,बॅगेज टॅग तयार करण्याची वेळ आल्यावर इंडिगोकडून व्हॉट्सअॅपवर मेसेज

तुम्ही खालीलपैकी एका पद्धतीचा वापर करून इंडिगोच्या व्हॉट्सअॅप अपडेटसाठी सबस्क्राइब करू शकता. व्हॉट्सअॅप मेसेज विंडोवर 7428081281 वर ‘HELLO 6E’ पाठवा, तुम्हाला व्हॉट्सअॅप आणि इंडिगो या दोन्हीच्या गोपनीयता धोरण मान्य असणं आवश्यक आहे.

इतर बातम्या:

EPFO पोर्टलवरुन जुन्या खात्यातून नव्या खात्यात PF ऑनलाईन ट्रान्सफर कसा करायचा? वाचा सोप्या टिप्स

टेलिकॉम कंपन्यांसंदर्भात मोठ्या निर्णयाची शक्यता, व्होडाफोन आयडियाला दिलासा? केंद्रीय कॅबिनटची महत्वाची बैठक

Spicejet flights latest news SpiceJet launches 38 new domestic and international flights New flights effective from 15th September in a phased manner

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.