SpiceJet : स्पाइसजेटच्या पायलटचा लायसन्स निलंबित ; इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याने DGCA ची कारवाई

मुंबईहून दुर्गापूर येथे जाणारे विमान लँडिंगदरम्यान खराब हवामानामुळे अडकले होते. त्यामध्ये क्रू सदस्यांसह अनेक प्रवाशांना दुखापत झाली होती. त्यानंतर डीजीसीने याप्रकरणी एअरलाइन्सला नोटीस जारी केली होती.

SpiceJet : स्पाइसजेटच्या पायलटचा लायसन्स निलंबित ; इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याने DGCA ची कारवाई
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 1:18 PM

नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) स्पाइसजेट कंपनीच्या एक पायलटचा लायसन्स रद्द केला आहे. मुंबईहून पश्चिम बंगाल येथील दुर्गापूर येथे जाणाऱ्या स्पाइसजेटच्या (SpiceJet flight) विमानातील पायलटने सह-वैमानिकाने दिलेल्या खराब हवामानाच्या (turbulence in a flight) इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर हे विमान एका मोठ्या अपघातातून थोडक्यात वाचले. मात्र खराब हवामानामुळे विमानाला मोठा झटका जाणवला व त्यामुळे विमानातील क्रू सदस्य आणि अनेक प्रवाशांना दुखापत झाली होती. या प्रकरणाचा तपास करण्यात आला असता मुख्य पायलटची चूक असल्याचे समोर आले. त्यानंतर डिजीसीएने त्या पायलटवर कारवाई करत त्याचा लायसन्स 6 महिन्यांसाठी निलंबित केला आहे. यापूर्वीही डीजीसीएने विमानाच्या मेंटेनन्स विभागातील कर्मचाऱ्यांवर कारवाई केली होती.

काय आहे प्रकरण ?

थोडक्यात टळलेला हा अपघात 1 मे रोजी घडला होता. B737 मॅक्स या स्पाईस जेटच्या विमानात हा प्रकार घडला. वाईट हवामानाचा फटका या विमानाला बसला. पश्चिम बंगालमधील दुर्गापूर जिल्ह्यातील काढी नझरुल इस्लाम विमानतळावर या विमानाचे लॅंडिंग होणार होतं. मात्र खराब हवामानामुळे लँडिगच्या वेळेस विमानात मोठे झटका जाणवला. हा झटका इतका मोठा आणि भीषण होता की, त्यामुळे विमानाच्या आतमध्ये ठेवलेलं सामान प्रवाशांच्या डोक्यावर आदळलं आणि काही प्रवासी जखमीही झाले. जवळपास 40 प्रवाशांना टर्ब्युलन्समुळे (Extreme turbulence in a flight) सामान अंगावर पडून दुखापत झाली. सगळेच प्रवासी या वातावरणात गोंधळून गेले होते. यावेळी ऑक्सिजन मास्कही खाली आले होते. या बाबतचा थरकाप उडवणारा एक व्हिडीओ देखील समोर आला होता. सुदैवानं मोठा अनर्थ यावेळी टळला. यामध्ये 10 प्रवासी आणि 3 क्रू मेंबर्सना गंभीर दुखापत झाली होती.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली व डीजीसीएने नोटीसही पाठवली होती. खराब हवामान असतानाही लँडिंग का करण्यात आले, असा प्रश्नही डिजीसीएने उपस्थित केला होता. या प्रकरणात मुख्य वैमानिकाची चूक असल्याचे निदर्शनास आले. मुख्य वैमानिकाने हवामाना संदर्भात सह-वैमानिकाने दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले आणि खराब हवामान असतानाही विमानाचे लँडिंग केले. ज्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला. असे चौकशीतून समोर आल्याने मुख्य वैमानिकाचा लायसन्स 6 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

अन्य एका पायलटचा लायसन्सही झाला रद्द

डीजीसीएने आणखी एका प्रकरणात दुसऱ्या एका पायलटचा लायसन्सही निलंबित केला आहे. लवकर लँडिंग करता यावे यासाठी विमानात कमी इंधन असल्याची खोटी महिती दिली होती, असा आरोप चार्टर्ड फ्लाईटच्या या पायलटवर लावण्यात आला होता. हे प्रकरण 19 ऑक्टोबर 2021 रोजी घडले होते. हे विमान बोकारो येथून रांची येथे जात होते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.