Share Market news: वर्षभरात 74000 टक्के रिर्टन, 1.65 रुपयांचा शेअर 1226 रुपयांवर, घसरणीच्या काळात जोरदार कमाई
Share Market news: सहा महिन्यांपूर्वी 25 एप्रिल 2024 या कंपनीचा शेअर 98.20 रुपयांवर होता. तो 25 ऑक्टोबर 2024 रोजी 1226 रुपयांवर गेला आहे. ऑक्टोबर महिन्यात शेअर बाजारात घसरण दिसून आली. परंतु या शेअरने जबरदस्त कामगिरी केली.
Sri Adhikari Brothers Share: शेअर बाजारात सध्या घसरणीचा काळ सुरु आहे. ऑक्टोबर महिन्यात शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. पीएसयू बँक किंवा दिग्गज कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. परंतु या घसरणीच्या काळात काही शेअर दमदार कामगिरी करत आहे. एक वर्षांपासून 1.65 रुपयांवर असलेला हा शेअर आता 1226 रुपयांवर पोहचला आहे. म्हणजेच एका वर्षात 74000 टक्के परतावा या शेअरने दिला आहे. जबरदस्त परतावा देणारी कंपनी श्री अधिकारी ब्रदर्स लिमिटेड आहे.
सहा महिन्यांत दमदार वाटचाल
श्री अधिकारी ब्रदर्स लिमिटेड (Sri Adhikhari Brothers Television Network Limited) या कंपनीचे शेअर जोरदार कामगिरी करत आहे. या कंपनीच्या शेअरला गेल्या काही दिवसांपासून सतत अपर सर्किट लागत आहे. सहा महिन्यांपूर्वी 25 एप्रिल 2024 या कंपनीचा शेअर 98.20 रुपयांवर होता. तो 25 ऑक्टोबर 2024 रोजी 1226 रुपयांवर गेला आहे. ऑक्टोबर महिन्यात शेअर बाजारात घसरण दिसून आली. परंतु या शेअरने जबरदस्त कामगिरी केली.
अशी राहिली कामगिरी
सहा महिन्यांच्या काळात श्री अधिकारी ब्रदर्सचे शेअरने जबरदस्त परतावा दिला आहे. वर्षभराचा विचार केला तर हा परतावा 74,209 टक्के आहे. वर्षभरापूर्वी म्हणजे 30 ऑक्टोंबर 2023 या शेअरची किंमत 1.65 रुपये होती. ती आता 1226.10 झाली आहे. पाच वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत 1.80 रुपये होती.
135 पेक्षा जास्त ट्रेडिंग सत्रांमध्ये अप्पर सर्किट
मुंबईतील टेलिव्हिजन नेटवर्क कंपनी श्री अधिकारी ब्रदर्सच्या शेअर्सने नफ्याचे तसेच अपर सर्किटमध्ये नवा विक्रम केला आहे. हा शेअर सलग 135 पेक्षा जास्त ट्रेडिंग सत्रांमध्ये अप्पर सर्किटवर गेला आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी या समभागात दोन टक्क्यांची वाढ झाली होती. शुक्रवारी भारतीय शेअर बाजार घसरणीत बंद झाला. जानेवारीपासून आतापर्यंत या शेअरने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. 1 जानेवारी 2024 रोजी या शेअरची किंमत फक्त 2.90 रुपये होती.