‘या’ शेजारील देशाची तिजोरी रिकामी, इंधन खरेदीसाठी भारताकडून घेतले 500 दशलक्ष डॉलर कर्ज
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडलेत. सध्या ते $ 85 च्या जवळ आहे. यामुळे श्रीलंकेला तेल आयात करण्यात अडचण येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत देशातील तेलाची रक्कम 41.5 टक्क्यांनी वाढून 2 अब्ज डॉलर्स झाली.
नवी दिल्लीः परकीय चलन संकटादरम्यान तेल खरेदीसाठी रक्कम देण्यासाठी भारताकडून $ 500 दशलक्ष कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे श्रीलंका सरकारने शनिवारी सांगितले. याबाबत ऊर्जामंत्री उदय गमनापिला म्हणाले, “”कर्जाचा प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त विभागाकडे पाठवलाय. त्यानंतर ते मंत्रिमंडळासमोर सादर केले जाणार आहे.
इंधन खरेदीसाठी ओमानकडून $ 3.6 अब्ज कर्ज मंजूर
ते म्हणाले की, मंत्रिमंडळाने इंधन खरेदीसाठी ओमानकडून $ 3.6 अब्ज कर्ज मंजूर केले. परकीय चलनाचे संकट आणि जागतिक कच्च्या तेलाच्या उच्च किमतींच्या पार्श्वभूमीवर देशातील इंधनाची सध्याची उपलब्धतेची पुढील वर्षी जानेवारीपर्यंतच हमी दिली जाऊ शकते, असे गॅमनपिला यांनी यापूर्वी एका निवेदनात म्हटले होते. देशाची पेट्रोलियम कंपनी सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशन (सीपीसी) द्वारे इंधनाचे दर वाढण्याची शक्यता पाहता गुरुवारपासून देशातील अनेक भागात पेट्रोल पंपावर लांब रांगा लागल्यात.
तेल आयात बिलं लक्षणीय वाढली
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडलेत. सध्या ते $ 85 च्या जवळ आहे. यामुळे श्रीलंकेला तेल आयात करण्यात अडचण येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत देशातील तेलाची रक्कम 41.5 टक्क्यांनी वाढून 2 अब्ज डॉलर्स झाली. अर्थमंत्री तुलसी राजपक्षे यांनी गेल्या महिन्यात सांगितले की, साथीच्या रोगाने देशाच्या पर्यटन आणि रेमिटन्सच्या कमाईवर लंकेला तीव्र परकीय चलन संकटाचा सामना करावा लागत आहे.
आर्थिक आणीबाणीची घोषणा
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशात आर्थिक आणीबाणी जाहीर केली होती. सतत वाढणाऱ्या महागाईमुळे त्यांनी हे पाऊल उचलले. देशाच्या चलनाच्या किमतीत मोठी घसरण झाली, ज्यामुळे खाद्यपदार्थांचे भाव गगनाला भिडत आहेत.
पर्यटन आणि चहाच्या निर्यातीवर अर्थव्यवस्था अवलंबून
श्रीलंकेची अर्थव्यवस्था मुख्यत्वे पर्यटन आणि चहा निर्यातीवर अवलंबून आहे. महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलाय. राजपक्षे म्हणाले की, बाह्य संकटांव्यतिरिक्त देशांतर्गत आघाडीवरही संकट आहे. देशाचा महसूल कमी होत आहे, तर खर्च सातत्याने वाढत आहे.
संबंधित बातम्या
कोरोना काळात पेट्रोल अन् डिझेलच्या किमतीत मोठी वाढ, पेट्रोल 36 रुपयांनी, डिझेल 27 रुपयांनी महाग
ऊर्जा मंत्रालयाकडून वीज क्षेत्र वाचवण्यासाठी नवे नियम जारी; आर्थिक भार कमी होणार