success story | 39000 कोटीच्या कंपनीचे मालक आहेत, तरी चालवतात सायकल

आय इंजिनिअर म्हणून अमेरिकेतील बड्या कंपनीची नोकरी सोडायला ध्यैर्य लागते. एका ग्रामीण भागातून स्वत:ची कंपनी उघडून साम्राज्य उभ्या करणाऱ्या या उद्योगपतीने नवा आदर्श उभा केला आहे.

success story | 39000 कोटीच्या कंपनीचे मालक आहेत, तरी चालवतात सायकल
Sridhar VembuImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Nov 02, 2023 | 1:17 PM

मुंबई | 2 नोव्हेंबर 2023 : माणूस श्रीमंत झाला की लागलीच त्याला आकाश टेंगणं वाटायला लागते. लागलीच त्याचे श्रीमंतीचे सगळे शौक पुर्ण करण्याचे ध्यैय सुरु होते. परंतू एका अवलियाने अमेरिकेतील आयटी इंजिनिअरची नोकरी सोडून गावात ऑफीस सुरु केले. आपण बोलत आहोत झोहो ( Zoho ) कंपनीचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांच्याबद्दल. त्यांनी अमेरिकेतून देशात येत अब्जावधी रुपयांच्या कंपनीचा सेटअप तयार केला आहे. श्रीधर वेम्बू यांनी आपल्या साधेपणा मात्र सोडलेला नाही. ते आजही सायकलने प्रवास करतात हे पाहून लोक आश्चर्यचकीत होत असतात.

एका सर्वसाधारण कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांनी आपले प्रोफेशनल करियर सुरु केले. श्रीधर वेम्बू यांनी आज 39,000 कोटीची कंपनी उभी केली आहे. विशेष म्हणजे ते नेहमी सायकलने प्रवास करतात. एवढंच नाही तर त्यांनी एवढे मोठे साम्राज्य कोणत्याही फंडशिवाय सुरु केले आहे. मूळचे तामिळनाडूचे रहाणारे श्रीधर वेम्बू एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यांनी 1989 मध्ये आयआयटी मद्रासमधून इलेक्ट्रीक इंजिनिअरींगमधून ग्रॅज्युएशन केल्यानंतर पीएचडीसाठी ते अमेरिकेला गेले होते.

नोकरी सोडल्याने नाराज झाले होते कुटुंबिय

अमेरिकेत राहून पीएचडी केल्यानंतर श्रीधर वेम्बू यांनी आयटी इंजिनिअर म्हणून तेथे नोकरी केली. त्यानंतर त्यांनी ती नोकरी सोडून भारत गाठला. त्यामुळे घरच्यांनी त्यांना खूप बोल लावला. परंतू त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरु करायचा होता. त्यांनी 1996 मध्ये भावासोबत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी एडवेंटनेट सुरु केली. तेरा वर्षांनंतर त्यांनी कंपनीचे नाव झोहो कॉर्पोरेशन असे ठेवले. त्यांनी आपल्या अब्जावधी व्यवसायाची सुरुवात तामिळनाडू तेनकासी जिल्ह्यातून केली. ग्रामीण भागात ऑफीस सुरु करुन त्यांनी गावातील प्रतिभावंत तरुणांना आकर्षित केले. त्यांची एकूण संपत्ती 39,000 कोटी आहे. इतका मोठा व्यवसाय असूनही ते सतत सायकलवरून प्रवास करीत असतात.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.