लवकरच सुरू होणार अपघात पॉलिसीची विक्री, 1 कोटी रुपयांपर्यंत विमा, वाचा सविस्तर

चांगल्या परताव्यासह आणि सुरक्षेची हमी मिळेल अशा अनेक योजना मार्केटमध्ये आहेत. अशाच एका योजनेबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

लवकरच सुरू होणार अपघात पॉलिसीची विक्री, 1 कोटी रुपयांपर्यंत विमा, वाचा सविस्तर
या सरकारी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करा आणि दोन लाखांचा अपघाती विमा मिळवा
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 8:41 AM

मुंबई : कोरोनाच्या भीषण संकटानंतर विमा पॉलिसी असणं सध्या सगळ्यात महत्त्वाचं आहे. यामुळे कमी पैशात जास्त सुरक्षित असलेली पॉलिसी आपल्या भविष्यासाठीही उत्तम आहे. खरंतर, चांगल्या परताव्यासह आणि सुरक्षेची हमी मिळेल अशा अनेक योजना मार्केटमध्ये आहेत. अशाच एका योजनेबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (standard personal accident insurance policy cover irdai issues guidelines for saral suraksha bima)

खरंतर, लोकांच्या सोयीसाठी विमा क्षेत्रातील विमा नियामक आयआरडीएने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. विमा नियामकाने सर्व सामान्य आणि आरोग्य विमा कंपन्यांना 1 एप्रिल 2021 पासून मानक वैयक्तिक अपघाताची पॉलिसी विक्री करण्याचे निर्देश दिले आहेत.

सरल सुरक्षा विमा : 1 एप्रिलपासून ग्राहकांना उपलब्ध

या स्‍टँडर्ड पर्सनल एक्‍सिडंट कव्हरचं नाव आहे ‘सरल सुरक्षा बीमा’. विमा कंपन्या या अंतर्गत 1 कोटी रुपयांचा विमा प्रदान करतील. या पॉलिसीअंतर्गत विम्याची किमान रक्कम अडीच लाख रुपये असणार आहे. आयआरडीएने सर्व विमा कंपन्यांना 1 एप्रिल 2021 पासून एक स्‍टँडर्ड ट्रॅव्हल पॉलिसी आणि एक स्‍टँडर्ड गृह विमा पॉलिसी आणण्यास सांगितलं होतं. याचे फायदे एकसारखे असणार आहेत.

काय आहे पॉलिसीमध्ये खास?

यामध्ये अनेक खास ऑफर देण्यात आली असून यामध्ये बेसिक कव्हर देण्यात आला आहे. यामध्ये पॉलिसीधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास संपूर्ण कुटुंबाला रक्कम मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपघात झाल्याच्या तारखेनंतर 12 महिन्याच्या आतमध्ये जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तरच कुटुंबाला रक्कम मिळेल.

संपूर्ण अपंगत्वावरही भरपाई

या विमा पॉलिसीअंतर्गत विमा कंपन्या पूर्ण अपंगत्व असल्यास पैसे देतील. इतकंच नाहीतर संरक्षण विम्याच्या अंतर्गत पॉलिसीधारकास गंभीर दुखापतीमुळे झालेल्या उत्पन्नात झालेल्या नुकसानाची भरपाई केली जाईल. हे दर आठवड्याच्या विमा रकमेच्या 0.2 टक्के असेल. जोपर्यंत पॉलिसीधारक कामावर परत येत नाही तोपर्यंत हे देय जारी राहील.

लोकांना काय फायदा होईल?

जर एखाद्या अपघातामुळे रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असेल तर उपचाराचा खर्च देखील या विमा पॉलिसीनुसार केला जाऊ शकतो. इतकंच नाहीतर या सुविधेला काही अटी लागू होतील. यामध्ये, विमा उतरलेल्या बेस रकमेच्या 10 टक्के पर्यंत दावा केला जाईल. (standard personal accident insurance policy cover irdai issues guidelines for saral suraksha bima)

संबंधित बातम्या – 

फक्त 94 रुपयांमध्ये मिळेल गॅस सिलेंडर, आज आहे शेवटची संधी; ‘असा’ करा बूक

Petrol-Diesel Price Today : राज्यात आज पेट्रोल स्वस्त की महाग? वाचा आजचे दर

SBI ची विशेष योजना सुरू; 5000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लाखोंचा फायदा

(standard personal accident insurance policy cover irdai issues guidelines for saral suraksha bima)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.