नव्या वर्षात करा गुंतवणुकीचा श्रीगणेशा, पोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजना कोणती?, व्याजदर काय?

तुम्ही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांचा गुंतवणुकीसाठी नक्कीच विचार करू शकतात. तुम्हाला गुंतवणुकीवर रिटर्न सोबतच पैशांच्या सुरक्षिततेची हमी मिळेल. बँकप्रमाणे पोस्ट ऑफिस गुंतवणुकीला विशिष्ट रकमेची मर्यादा नाही. तुमच्या आर्थिक क्षमेतनुसार तुम्ही गुंतवणुकीला प्रारंभ करू शकतात.

नव्या वर्षात करा गुंतवणुकीचा श्रीगणेशा, पोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजना कोणती?, व्याजदर काय?
Post Office FD Scheme
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 3:58 PM

नवी दिल्ली: तुम्ही नव्या वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा करणार असल्यास ही बातमी तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरेल. तुम्ही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांचा गुंतवणुकीसाठी नक्कीच विचार करू शकतात. तुम्हाला गुंतवणुकीवर रिटर्न सोबतच पैशांच्या सुरक्षिततेची हमी मिळेल. बँकप्रमाणे पोस्ट ऑफिस गुंतवणुकीला विशिष्ट रकमेची मर्यादा नाही. तुमच्या आर्थिक क्षमेतनुसार तुम्ही गुंतवणुकीला प्रारंभ करू शकतात.

पोस्ट ऑफिसच्या लघू बचत योजनेत पोस्ट ऑफिस मुदत ठेवींचा समावेश होतो. जाणून घेऊया पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेबद्दल-

व्याज दर

पोस्ट ऑफिसमध्ये मुदतीनुसार ठेवींवर विभिन्न व्याजदर दिला जातो. एक वर्ष मुदत ठेवींवर वार्षिक 5.5 टक्के व्याजदर आहे. दोन आणि तीन वर्षांच्या ठेवीवर देखील वार्षिक 5.5 टक्के व्याजदर दिले जाते. मात्र, 5 वर्षांच्या कर बचतीच्या मुदत ठेवीवर वार्षिक 6.7 टक्के व्याजदर दिला जातो. वार्षिक आधारावर व्याज देय केले जाते. मात्र, व्याज गणना तिमाही आधारावर केली जाते.

गुंतवणूक रक्कम

पोस्ट ऑफिसमध्ये किमान एक हजार रुपयांची मुदत ठेव ठेऊ शकतो. गुंतवणुकीची रक्कम 100 रुपयांच्या गुणात्मक प्रमाणात असायला हवी. मात्र, गुंतवणुकीला कोणत्याही प्रकारची कमाल मर्यादा नाही.

अकाउंट कोण उघडू शकते?

पोस्ट ऑफिसच्या या योजनेसाठी एक प्रौढ व्यक्ती किंवा तीन प्रौढ व्यक्ती संयुक्त खाते उघडू शकतात. मात्र, अल्पवयीन खातेधारकाला एक नॉमिनीची खाते उघडण्यासाठी आवश्यकता असेल. वयाची 10 वर्षे पूर्ण केलेला बालक स्वत:च्या नावे अकाउंट उघडू शकतो.

कर लाभ-

पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेवीवर कर लाभ देखील मिळतो. पाच वर्ष कालावधी साठी मुदत ठेवीतील गुंतवणूक आयकर अधिनियम कलम 80 अंतर्गत करमुक्त आहे.

मॅच्युरिटी:

पोस्ट ऑफिस मध्ये मुदत ठेव उघडल्याच्या तारखेपासून 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष किंवा 5 वर्ष संपल्यानंतर ठेवींच्या रक्कम देय केली जाते.

मुदतीत वाढ:

खातेधारकाला ठेवीच्या मुदतीत वाढ करण्याची एकदा संधी मिळते. मुदतीत वाढ करण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. एक वर्षाच्या मुदत ठेवीसाठी सहा, दोन वर्षांसाठी बारा महिने तसेच तीन व पाच वर्षांसाठी अठरा महिने निर्धारित करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या:

नववर्षाच्या स्वागताला काश्मीरला जायचंय?, चिंता सोडा पटापट बॅग भरा, आयआरसीटीसीकडून मिळतीये खास ऑफर

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये 400 अकांची घसरण, गुंतवणूकदारांना मोठा फटका

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक वाढली; वर्षभरात 24 टक्क्यांची वाढ, ‘ही’ आहेत प्रमुख कारणे

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.