दोन लाखांच्या भांडवलात सुरु करा व्यवसाय, सरकारकडून 80 टक्के मदत, महिन्याला 50 हजारांची कमाई
टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचपची मागणी सहसा नेहमीच असते. आजकाल, अनेक मोठ्या आणि लोकप्रिय ब्रँडसह, अनेक प्रकारचे सॉसचे स्थानिक ब्रँड देखील बाजारात आहेत. | tomato sauce ketchup
नवी दिल्ली: सध्याच्या काळात कोरोनामुळे नोकऱ्या आणि थेट लोकांशी संबंध येणाऱ्या उद्योगांविषयी अनिश्चिततेचे वातावरण आहे. एखादं दुकान टाकायचं म्हटलं तर सरकार कधी आणि कितीवेळा लॉकडाऊन लावेल, याचा नेम नाही. अशा परिस्थितीत बंद जागेत राहूनच एखादा उद्योग करणे हे फायद्याचे ठरेल. अशावेळी टॉमेटो सॉस तयार करण्याचा उद्योग फायदेशीर ठरू शकतो. या व्यवसायासाठी सरकारच्या मुद्रा योजनेतंर्गत कर्ज मिळते.
टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचपची मागणी सहसा नेहमीच असते. आजकाल, अनेक मोठ्या आणि लोकप्रिय ब्रँडसह, अनेक प्रकारचे सॉसचे स्थानिक ब्रँड देखील बाजारात आहेत. जर स्थानिक ब्रँडची गुणवत्ता देखील चांगली असेल तर मागणी वाढते. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी साधारण 7.82 लाख रुपयांचा एकूण खर्च अपेक्षित आहे. यामध्ये 2 लाखांचे फिक्स्ड कॅपिटलचा समावेश आहे. हे पैसे मशीन्स आणि इतर उपकरणांसाठी लागतात. तर व्यवसाय चालवण्यासाठी 5.82 लाख रुपयांचे वर्किंग कॅपिटल अपेक्षित आहे. हे पैसे कच्चा माल, सॉस तयार लागण्यासाठी लागणारे घटक, कर्मचाऱ्यांचे पगार, पँकिंग, टेलिफोन बिल आणि वेतनासाठी गरजेचे आहेत.
सरकारकडून आर्थिक मदत
या व्यवसायात तुम्हाला तुमच्याकडून 1.95 लाख रुपये गुंतवावे लागतील. मुदत कर्ज 1.50 लाख रुपये असेल. कार्यरत भांडवली कर्ज 4.36 लाख रुपये असेल. मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेकडून हे कर्ज सहजपणे घेता येईल.
मुद्रा योजनेअंतर्गत कर्जासाठी तुम्हाला सरकारी किंवा बँक शाखेत अर्ज करावा लागतो. जर तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला घराची मालकी किंवा भाड्याची कागदपत्रे, कामाशी संबंधित माहिती, आधार, पॅन नंबर यासह इतर अनेक कागदपत्रे द्यावी लागतील. पडताळणीनंतर बँक व्यवस्थापक कर्ज मंजूर करतो.
व्यवसायात किती फायदा?
या व्यवसायात 7.82 लाखांची गुंतवणूक केल्यास वार्षिक उलाढाल अंदाजे 28.80 लाख रुपये असू शकते. कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन: वार्षिक 24.22 लाख रुपये, निव्वळ नफा: 4.58 लाख रुपये वार्षिक, महिन्याचा नफा: सुमारे 40 हजार रुपये असेल.
मत्स्यशेतीमधून कशाप्रकारे कमाई होईल?
मत्यशेतीच्या व्यवसायात तुम्ही वर्षाला 25 हजारांची गुंतवणूक करून महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न कमावू शकता. अनेक राज्यांमध्ये सरकार मत्स्य व्यवसायालाही प्रोत्साहन देत आहे. मत्स्य उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्तीसगड सरकारने त्याला शेतीचा दर्जा दिला आहे. याशिवाय, राज्य सरकार मत्स्य उत्पादकांना बिनव्याजी कर्ज सुविधा देत आहे. यासोबतच सरकारकडून मच्छीमारांसाठी अनुदान आणि विमा योजनाही उपलब्ध आहे.
जर तुम्हीही मत्स्यपालनाच्या व्यवसायात असाल किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर त्याचे आधुनिक तंत्रज्ञान तुम्हाला भरपूर नफा देऊ शकते. सध्याच्या काळात बायोफ्लोक तंत्र मत्स्यपालनासाठी खूप प्रसिद्ध होत आहे. अनेक लोक या तंत्राचा वापर करून लाखोंची कमाई करत आहेत.
संबंधित बातम्या:
मत्स्यपालन ठरेल आर्थिक कमाईचा राजमार्ग, पेंग्बा मासे विक्रीतून एक व्यक्ती 45 लाखांची उलाढाल करतेय
भात शेतीमध्ये मत्स्यपालन करुन दुप्पट कमाईची संधी, फिश राईस फार्मिंग नेमकं काय?