एक्झिट पोलपूर्वी शेअर बाजारात तेजी, निकालाआधी काय आहेत याचे संकेत

1 जून रोजी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल समोर येणार आहेत. या एक्झिट पोलकड सगळ्या जगाचं लक्ष असणार आहे. कारण पंतप्रधान मोदी हे हॅट्ट्रिक करतात का हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. पण त्याआधीच शेअर बाजारत तेजी दिसत आहे.

एक्झिट पोलपूर्वी शेअर बाजारात तेजी, निकालाआधी काय आहेत याचे संकेत
Follow us
| Updated on: May 31, 2024 | 7:05 PM

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार आहे. उद्या मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल समोर येणार आहेत. एक्झिट पोलमध्ये कोणाला किती जागा मिळणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीचा फक्त राजकारणातच नाही तर इतर क्षेत्रांवर देखील परिणाम होत असतो. सर्वात मोठा परिणाम हा शेअर बाजारावर होत असतो. गेल्या पाच दिवसांत शेअर बाजारात घसरण सुरु होती. पण त्याला आज पूर्णविराम मिळाला. कारण शुक्रवारी मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार हिरव्या रंगात बंद झाला. काय आहेत याचे संकेत.

लोकसभा निवडणुकीचा उद्या शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर अनेक एक्झिट पोलही शनिवारी येतील. याआधी, बाजारातील तेजीमुळे सकारात्मक संकेत मिळत आहेत. आज बीएसई सेन्सेक्स 75.71 अंकांनी वाढून 73,961.31 अंकांवर बंद झाला. NSE निफ्टी 42.05 अंकांनी मजबूत होऊन 22,530.70 वर पोहोचला आहे.

अदानी एंटरप्रायझेसच्या समभागात आज ६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. याशिवाय टाटा स्टील, इंडसइंड बँक, एसबीआय, आयटीसी, रिलायन्स, महिंद्रा आदी कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ नोंदवण्यात आली. नेस्ले, मारुती आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये मात्र घसरण झाली.

परदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरूच

आशियाई बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी, हाँगकाँगचा हँग सेंग, जपानचा निक्केई आणि चीनचा शांघाय कंपोझिट यांचा समावेश होता. गुरुवारी अमेरिकी बाजार नकारात्मक ट्रेंडसह बंद झाला. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्युचर्स 0.34 टक्क्यांनी घसरून US$81.58 प्रति बॅरलवर व्यवहार करत होता. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FII) गुरुवारी भांडवली बाजारात विक्री करणारे होते आणि त्यांनी निव्वळ 3,050.15 कोटी रुपयांचे समभाग विकले.

टाटा स्टील, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, पॉवर ग्रिड, इंडसइंड बँक, लार्सन अँड टुब्रो, आयसीआयसीआय बँक यांचे समभाग वाढीसह बंद झाले.

एक्झिट पोलच्या आकड्यांवर सगळ्यांची नजर

प्री-पोल संपल्यानंतर आता देशातील लोकांचे लक्ष एक्झिट पोलवर आहे. एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर ही याचा मोठा परिणाम शेअर बाजारावर दिसू शकतो. उद्या एक्झिट पोल आल्यानंतर ४ जून रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे एक्झिट पोलचे आकडे किती खरे ठरतात याकडे ही सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.