Share Market Update : गुंतवणूकदारांचे देव पाण्यात, कापल्या जाईल खिसा की होईल मोठा फायदा, बाजाराची दशा आणि दिशा काय?

Share Market Update : शेअर बाजारात सातत्याने भूकंप होत असल्याने गुंतवणूकदारांचे देव पाण्यात आहे.

Share Market Update : गुंतवणूकदारांचे देव पाण्यात, कापल्या जाईल खिसा की होईल मोठा फायदा, बाजाराची दशा आणि दिशा काय?
बाजाराची दिशा कंची?
Follow us
| Updated on: Dec 25, 2022 | 5:15 PM

नवी दिल्ली : शेअर बाजाराने (Share Market) गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळवले. 5 व्यापारी सत्रांपैकी 4 ही दिवस गुंतवणूकदारांचे हात पोळले. सेन्सेक्स आणि (Sensex) निफ्टी (Nifty) या आठवड्यात जवळपास 2.7% घसरले. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये क्रमशः जवळपास 4.75% आणि 7.62% घसरण झाली. या सर्व घडामोडींमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत जवळपास एकूण 19 लाख कोटींची घट झाली. त्यातच आता कोरोना आणि आर्थिक मंदीच्या भीतीने बाजाराची गाळण उडाली आहे. त्यामुळे सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात बाजार फायदा मिळवून देईल की त्यांच्या आनंदावर विरजण पडेल याकडे गुंतवणूकदारांचे (Investors) लक्ष लागले आहे.

IIFL Securities चे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी सांगितले की, दरवर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला फंड हाऊस नफा जमाविताना दिसतात. आमच्या मते, शेअर बाजारात सध्या सुरु असलेली घसरण ही केवळ नफा वसूली आहे. त्यामुळेच इंडेक्स ओव्हरबॉट झोनमध्ये व्यापार करत आहे.

गेल्या आठवड्यात निफ्टीत 2.53% घसरण आली आणि तो 17806 अंकावर बंद झाला. तर बँक निफ्टीत 3.59% घसरण होऊन तो 41,668 अंकावर बंद झाला. एकीकडे निफ्टी आणि सेंसेक्स हे दोन्ही निर्देशांक सध्या ओव्हरसोल्ड झोनमध्ये आहेत. तर कच्च्या तेलाच्या किंमती आणि अमेरिकन डॉलर कमजोर झाले आहेत. हा भारतीय बाजारासाठी चांगला संकेत असल्याचा दावा त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

अनुज गुप्ता यांच्या मते, गेल्या आठवड्यात रुपयामध्ये 0.12% टक्क्यांची घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया 82.76 रुपयांवर बंद झाला. इक्विटी बाजारातील घसरणीच्या सत्राने भारतीय रुपयावर दबाव आला आहे. डॉलरमध्ये सुधारणा झाल्याने रुपयाची धडाधड सुरु असलेल्या घसरणीला ब्रेक लागला आहे.

आर्थिक मंदी आणि कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता, त्याचा डॉलरच्या घौडदौडीवर परिणाम दिसून येईल. डॉलरमध्ये घसरण दिसून येईल. तर रुपया मजबूत होत आहे. येत्या काही दिवसात रुपया डॉलरच्या तुलनेत 82.30 ते 83 स्तरावर व्यापार करण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.