SHARE MARKET: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मार्केट गडगडलं, सेन्सेक्स 1150 अंकांनी डाउन; 2 लाख कोटींचे नुकसान

चीन मध्ये कोविड बाधितांची वाढती संख्या आणि रशिया-युक्रेन चिघळणारा (RUSSIA-UKRAINE CRISIS) विवाद यामुळे गुंतवणुकदारांनी सावध पवित्रा धारण केला आहे. आज (सोमवारी) सेन्सेक्स 1172 अंकांच्या घसरणीसह 57,166.74 च्या स्तरावर पोहोचला आणि निफ्टी 302 अंकांच्या घसरणीसह 17173 वर बंद झाला.

SHARE MARKET: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मार्केट गडगडलं, सेन्सेक्स 1150 अंकांनी डाउन; 2 लाख कोटींचे नुकसान
घसरणीचे सलग 6 दिवस, शेअर बाजार गडगडलाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 5:11 PM

नवी दिल्ली- आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात (SHARE MARKET UPDATE) मोठ्या प्रमाणात घसरण नोंदविली गेली. आर्थिक तिमाहित अहवाल आणि जागतिक आर्थिक बाजारातील नकारात्मक घटनांचा प्रभावामुळे प्रमुख निर्देशांकात तब्बल दोन टक्क्यांची घसरण नोंदविली गेली. गेल्या आठवड्यात इन्फोसिस (INFOSYS) व एचडीएफसीची (HDFC BANK) कामगिरी बाजारावर प्रभाव टाकू शकली नाही. त्यामुळे प्रमुख शेअर्समध्ये मोठ्या प्रमामात घसरण नोंदविली गेली. आज (सोमवारी) इन्फोसिस मध्ये दोन वर्षाच्या दरम्यान एका दिवसात नोंदविलेली सर्वाधिक घसरण दिसून आली. चीन मध्ये कोविड बाधितांची वाढती संख्या आणि रशिया-युक्रेन चिघळणारा (RUSSIA-UKRAINE CRISIS) विवाद यामुळे गुंतवणुकदारांनी सावध पवित्रा धारण केला आहे. आज (सोमवारी) सेन्सेक्स 1172 अंकांच्या घसरणीसह 57,166.74 च्या स्तरावर पोहोचला आणि निफ्टी 302 अंकांच्या घसरणीसह 17173 वर बंद झाला.

इन्फोसिस डाउन, 2 लाख कोटी नुकसान:

शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणुकदारांना तब्बल 2.78 लाख कोटींवर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. शेअर बाजारातील आजच्या घसरणीमागे एकाधिक कारणे सांगितली जातात. इन्फोसिस आणि एचडीएफसी बँकेच्या कामगिरीमुळे गुंतवणुकदारांत निराशेचे वातावरण निर्माण झाले. 31 मार्चच्या आकडेवारीनुसार, दोन्ही स्टॉकचे निफ्टी 50 वर 17 टक्क्यांहून अधिक भागीदारी आहे. इन्फोसिस मध्ये आज सात टक्क्यांहून अधिक घसरण झाली. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक प्रत्येकी 4-4 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्री शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री दिसून आली.

कोविड ते युद्ध परिणाम:

चीनमध्ये कोविडचा वाढता प्रकोप जागतिक विकास दराला मारक ठरत असल्याचे चित्र निर्माण झालं आहे. रशिया-युक्रेन वाद निवाळण्याची अद्यापही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे जागतिक गुंतवणुकदारांत मोठ्या प्रमाणात अस्थिरता आहे. सलग चार दिवसांच्या सुट्ट्यांनंतर शेअर बाजाराच्या व्यवहारांना सुरुवात झाली. गेल्या चार दिवसांत घडलेल्या विविध घडामोडींचा एकत्रित परिणाम आजच्या शेअर बाजाराच्या व्यवहारांवर दिसून आल्याचा निष्कर्ष अर्थजगतातील तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

आजचे वधारणीचे शेअर्स (Todays Top Gainers)

एनटीपीसी (6.01%) एसबीआय लाईफ फार्मा (2.31%) एचडीएफसी लाईफ (1.67%) कोल इंडिया (1.53%) टाटा स्टील (1.49%)

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.