Stock Market Update: रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) युद्ध सुरूच आहे. या युद्धाचा परिणाम हा जागतिक मार्केटवर होताना दिसून येत आहे. कच्च्या तेलापासून ते खाद्यतेलापर्यंत सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत. धातुंच्या किमती देखील वाढल्या आहेत. एवढेच नाही तर युद्धामुळे शेअर मार्केट (Share Market) देखील दबावात असून, आशियामधील सर्वच शेअर मार्केट सध्या रेड झोनमध्ये कारभारत करत असल्याचे पहायला मिळत आहे. भारतात देखील हीच स्थिती आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार कोसळला. सोमवारी शेअर बाजार सुरू होताच पहिल्याच सत्रात सेंन्सेक्समध्ये तब्बल 1,450 अकांची घसरण झाली, त्यानंतर सेंन्सेक्समध्ये थोडीशी सुधारणा झाल्याचे पहायला मिळाले, सध्या सेंन्सेक्स 1,375 अकांच्या घसरणीसह 53 हजारांच्या देखील खाली पोहोचला आहे. तर दुसरीकडे निफ्टी देखील 400 अकांनी कोसळला असून, 15,850 अंकांवर पोहोचला आहे. या सर्व घडामोडीमध्ये टाटाच्या शेअरला मोठा फटका बसला आहे, टाटाचे शेअर 400 हून 350 रुपये प्रति शेअरवर पोहोचले आहेत.
गेल्या आठवड्यात शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी देखील शेअर मार्केटमध्ये मोठ्याप्रमाणात घसरण झाली होती. शुक्रवारी शेअरमार्केटमध्ये 1.4 टक्क्याची घसरण नोंदवण्यात आली. शुक्रवारी सेंन्सेक्स 769 अंकाच्या घसरणीसह 54,333 अंकावर बंद झाला होता. तर निफ्टीमध्ये देखील 1.53 टक्क्यांची घसरण होऊन निफ्टी 16,245 वर पोहोचला होता. तर गुरुवारी गेल्या आठवड्यात सेंन्सेक्समध्ये 366.22 अंकाची घसरण नोंदवण्यात आली होती. सोमवारी आज शेअर मार्केट सुरू होताच सेंन्सेक्समध्ये तब्बल 1,450 अंकाची घसरण पहायला मिळाली.
शेअर मार्केटला युद्धाचे ग्रहण लागले आहे. गेल्या दोन आठवड्यापासून सतत भारतीय शेअर बाजाराच्या सेंन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण होत आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचे वातावरण असून, सततच्या घसरणीमुळे त्यांना कोट्यावधी रुपयांचा फटका बसला आहे. ही स्थिती केवळ भरताचीच नसून जगातील सर्वच शेअरबाजारात सध्या पडझड सूर आहे.
कच्च्या तेलाची रॉकेट भरारी, 14 वर्षांत पहिल्यांदा किंमती 130 डॉलरवर तर सोन्यालाही दरवाढीची झळाळी
10 मार्चनंतर पेट्रोल-डिजेलच्या किंमती भडकणार ? काय आहे तज्ज्ञांचे मत, जाणून घेऊयात