शेअरबाजारात सलग दुसाऱ्या दिवशी पडझड; सेन्सेक्स 748 अंकांनी घसरला

शेअर बाजारात पडझड सुरूच आहे, आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार कोसळला. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम शेअर मार्केटवर होताना दिसत आहे. आज शेअर  बाजार सुरू होताच आयटी, बँक आणि ऑटो क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअरला मोठा फटका बसल्याचे पहायला मिळाले.

शेअरबाजारात सलग दुसाऱ्या दिवशी पडझड; सेन्सेक्स 748 अंकांनी घसरला
शेअर बाजार
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 11:47 AM

मुंबई – शेअर बाजारात पडझड सुरूच आहे, आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार कोसळला. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम शेअर मार्केटवर होताना दिसत आहे. आज शेअर  बाजार सुरू होताच आयटी, बँक आणि ऑटो क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअरला मोठा फटका बसल्याचे पहायला मिळाले. दिवसाच्या पहिल्याच सत्रात सेन्सेक्स तब्बल 482 अकांनी कोसळला. त्यानंतर ही घसरण कायम राहीली असून, सध्या स्थितीत सेन्सेक्समध्ये 748 अकांची घट झाली असून, तो 57,983.95 वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे निफ्टी देखील 17300 अंकांपेक्षा खाली आली आहे.

लिस्टेड कंपन्यांना 9,45,141.13 कोटी रुपयांचा तोटा

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शेअर बाजाराला मोठा झटका बसला होता. सेंसक्समध्ये झालेल्या तीव्र घसरणीमुळे गुंतवणुकदारांचे तब्बल 8,21,666.7 कोटी रुपयांचे नुकसान झाले. सोमवारी तिसऱ्या सत्रामध्ये सेन्सेक्स 1,624.09 अंकांपेक्षाही खाली आता होता. त्यानंतर चौथ्या सत्रात त्यामध्ये थोड्याप्रमाणात सुधारणा झाली, मात्र घसरण कायम राहिली. मंगळवारी शेअर मार्केट सुरू होताच सेन्सेक्स 482 अकांनी कोसळला ही घसरण अजूनही सुरूच असून, सध्या सेन्सेक्स 748 अंकाच्या घसरणीसह 57,983.95 अंकांवर पोहोचला आहे. आज देखील गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. शेअर मार्केटममध्ये सुरू असलेल्या पडझडीमुळे बीएसई लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप 1,23,474.43 कोटी रुपयांनी कमी होऊन, 2,59,75,055.79 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या दोन दिवसांत लिस्टेड कंपन्यांना तब्बल 9,45,141.13 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

भारती एअरटेल टॉपवर 

दुसरीकडे मात्र गेल्या दोन दिवसांपासून भारती एअरटेलच्या शेअरमध्ये तेजी असल्याचे पहायला मिळत आहे. आपल्या सर्व प्रिपेड प्लॅनचे दर वाढवण्याचा निर्णय भारती एअरटेलने घेतला आहे. येत्या 26 तारखेपासून एअरटेलचे सर्व प्लॅन हे 20 ते 25 टक्क्यांनी महागणार आहेत. याबाबत रविवारी कंपनीच्या वतीने निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा कंपनीला होताना दिसून येत असून, कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आली आहे.

संबंधित बातम्या 

ज्येष्ठ नागरिक रेल्वेच्या सवलतींपासून वंचित; 4 कोटी जणांकडून पूर्ण भाड्याची वसुली

गुंतवणुकीपूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा होऊ शकतो मोठा तोटा

‘या’ 4 चुकांमुळे PPF खाते बंद होऊ शकते, जमा पैशावर व्याज किंवा कर सूट नाहीच

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.