शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1150 अकांची घसरण; गुंतवणूकदारांना 6 लाख कोटींचा फटका

आठवड्याची सुरुवातच शेअर बाजारासाठी नकारात्मक राहिली आहे. सोमवारी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स तब्बल 1150 अकांनी कोसळला. तर दुसरीकडे निफ्टी देखील 16, 700 अकांच्याखाली घसरला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये दीड टक्क्यांची घसरण झाली आहे.

शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1150 अकांची घसरण; गुंतवणूकदारांना 6 लाख कोटींचा फटका
शेअर बाजार
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 2:27 PM

मुंबई : आठवड्याची सुरुवातच शेअर बाजारासाठी नकारात्मक राहिली आहे. सोमवारी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स तब्बल 1150 अकांनी कोसळला. तर दुसरीकडे निफ्टी देखील 16, 700 अकांच्याखाली घसरला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये देखील दीड टक्क्यांची घसरण झाली आहे. आज सर्वाधिक फटका हा एचडीएफसी बँक, रिलायन्स, आसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक यांच्या शेअर्सला बसला आहे. बँकिंग क्षेत्रातल्या शेअरमधील गुंतवणूक कमी होताना दिसत आहे.

गेल्या आठवड्यातही होती मंदी

दरम्यान गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी देखील शेअरबाजाारामध्ये मोठी घसरण झाली होती. सेन्सेक्स 889.40 अंकाच्या घसरणीसह 57,011.74 वर बंद झाला होता. निफ्टीमध्ये देखील 263.20 अंकांची घसरण झाली होती. आठवड्याच्या सुरुवातीला शेअर मार्केटमध्ये सुधारणा होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र सोमवार देखील गुंतवणूकदारांसाठी निराशेचा राहिला. आज शेअर मार्केट सुरू होताच मोठी पडझड पहायला मिळाली. शेअर बाजार घसरल्याने एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक नुकसान झाले आहे.

शेअर बाजारावर ओमिक्रॉनचा प्रभाव

पुढील दोन आठवडे तरी शेअरबाजारात अशीच स्थिती कायम राहाण्याचा अंदाज तज्ज्ञाकडून वर्तवला जातो आहे. याचे मुख्य कारण म्हणजे काही युरोपीयन देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे. ज्या देशात प्रादुर्भाव वाढला आहे, तेथील सरकार लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत आहे. याचा परिणाम हा अशियाई शेअरबाजारांवर होत असून, गुंतवणूक झपाट्याने कमी होत असल्याने सेन्सेक्स कोसळत आहे.

संबंधित बातम्या 

Royal Enfield : जर तुमच्याकडेही असेल रॉयल एनफिल्डचं ‘हे’ व्हर्जन तर जाणून घ्या काय म्हटलं कंपनीनं?

Indian Railway : थंडीतही प्रवास होणार सुकर! रेल्वेनं सुरू केली ‘ही’ नवी सुविधा

UPI पेमेंट करताना रहा सावधान, नाहीतर व्हाल कंगाल; सुरक्षीत पेमेंट हीच खात्यातील रकमेची हमी 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.