Stock market : कोरोनाकाळात सलग 9 तिमाहीत तोटा; निर्बंध हटवताच ‘या’ मनोरंजन क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रमी तेजी

दोन वर्षांपूर्वी लॉकडाऊनमुळे मल्टिप्लेक्स (Multiplex) आणि सिनेमाहॉल बऱ्याच काळासाठी बंद होते. बंद असल्यामुळे या व्यवसायाचं नुकसान देखील तितकंच झालंय. मात्र निर्बंध उठवल्यानंतर आता या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.

Stock market : कोरोनाकाळात सलग 9 तिमाहीत तोटा; निर्बंध हटवताच 'या' मनोरंजन क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रमी तेजी
पश्चिम महाराष्ट्रात कोट्यवधींच्या शेअर मार्केट घोटाळ्याचा आरोपImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 2:10 AM

दोन वर्षांपूर्वी लॉकडाऊनमुळे मल्टिप्लेक्स (Multiplex) आणि सिनेमाहॉल बऱ्याच काळासाठी बंद होते. बंद असल्यामुळे या व्यवसायाचं नुकसान देखील तितकंच झालंय. परंतु मल्टिप्लेक्स बंद झाल्याचा फायदा OTT ला मात्र झाला. यामध्ये आता PVR, INOX आणि इतर मल्टिप्लेक्स तग धरू शकतील का ?असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु असे न होता लॉकडाऊन (Lockdown) शिथिल केल्यानंतर मल्टिप्लेक्स पुन्हा सुरू झाली आहेत. व्यवसाय पुन्हा तेजीत सुरू झाला आहे. एका महिन्यात PVR चा शेअर (Stock) 14 टक्क्यांनी वाढलाय. 29 जुलैला तर या शेअरच्या किंमतीने 2153.85 रुपये प्रति शेअर इतका उच्चांक गाठला. गेल्या दोन वर्षांत कंपनीने प्रथमच नफा नोंदवलाय. त्यामुळे हा शेअर इतका तेजीत कसा आला? याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सलग 9 तिमाहीत तोटा

कोरोनाकाळात सलग 9 त्रैमासिकांमध्ये या कंपनीला तोटा झाला. पण आता जो नफा झाला त्यामुळे शेअर्सची किंमत गगनाला भिडली. यामध्ये केवळ नफा नाही तर पहिल्या तीन महिन्यात PVR ची कामगिरी देखील चांगली राहिली. या काळातील कमाई कोरोनाच्या आधीच्या काळापेक्षा 7 टक्के अधिक आहे. लोक चित्रपटगृहात येऊ लागल्याने कंपनीचा EBITDA 3.4 पट वाढलाय. बॉक्सऑफिस कलेक्शन कोरोनाकाळाच्या आधीपेक्षा 16 टक्के जास्त आहे.यावर्षी KGF:CHAPTER 2, RRR, भुलभुलैया, डॉ.स्ट्रेंज 2, द कश्मीर फाइल्स आणि विक्रम (तमिळ) यासारखे ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित झाले. यांचा थेट फायदा PVR ला झाला.तिकीट दराचा मुद्दा महत्वाचा आहे कारण गेल्या अडीच वर्षांत तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती.

हे सुद्धा वाचा

कंपनीचा वेगाने विस्तार

आता जाणून घेऊया कंपनीच्या विस्ताराबद्दल. 2023 मध्ये 125 नवीन स्क्रीन सुरू करण्यात येणार आहेत. 3 मल्टिप्लेक्समध्ये 14 स्क्रीन वाढवण्यात आल्यात. 82 ठिकाणी काम सुरू आहे. या वर्षात कंपनी विस्तारासाठी 400 ते 500 कोटी इतका खर्च करण्याचा अंदाज आहे. या कराराला BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळालंय. बाजार नियामक सेबीनेही या कराराला मंजुरी दिलीये. आता फक्त NCLT ची मंजुरी बाकी आहे.PWC च्या मते 2022 ते 2026 दरम्यान मल्टिप्लेक्स क्षेत्राची वार्षिक वाढ 38.3 टक्के दरानं अपेक्षित आहे. तसेच ब्रोकरेज हाऊस GCL सिक्युरिटीजने PVR साठी 2600 रुपयांचे टार्गेट दिलं आहे. KGF आणि RRR सारखे साऊथ इंडियन चित्रपट हिट ठरलेत, हिंदी चित्रपटांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या 6 महिन्यात बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे PVR चा व्यवसाय पाहता शेअर आकर्षिक दिसतोय परंतु आर्थिक गुंतवणूक करण्याआधी तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्यायला विसरू नका.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.