Stock Market Timing : मोठी बातमी! संध्याकाळपर्यंत करा ट्रेडिंग, 5 वाजेपर्यंत शेअर बाजार राहणार सुरु?
Stock Market Timing : देशातील सर्वात मोठ्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये इक्विटी सेगमेंटमध्ये व्यापारी तास वाढविण्याची शिफारस करण्यात आली आहे. अर्थात ही चर्चा काही पहिल्यांदा होत नाहीये. यापूर्वीही वेळ वाढविण्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) ट्रेडिंगच्या वेळेत बदल करण्याची चर्चा पुन्हा रंगली आहे. शेअर बाजारात व्यापारी सत्रात वाढ करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ट्रेडिंग वेळ (Trading Timing) आता 3:30 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाढविण्याची शक्यता आहे. शेअर बाजाराची व्यापार करण्याची वेळ वाढविण्यासंबंधीची रुपरेखा बाजार नियामक सेबीने (SEBI) 2018 साली तयार केली होती. दरवेळी याविषयीची खमंग चर्चा रंगते आणि गुंतवणूकदारांसह ब्रोकर्सला हा विषय चघळायला मिळतो. बाजाराची वेळ दोन तासांनी वाढविल्यास त्याचा अनेक घटकांवर परिणाम होईल. त्याची तयारी करणेही आवश्यक आहे.
सध्या भारतीय शेअर बाजार सकाळी 9:15 वाजता सुरु होतो. दुपारी 3:30 वाजेपर्यंत बाजारात ट्रेडिंग करण्यात येते. रॉयटर्सच्या अहवालानुसार, स्टॉक मार्केटमध्ये व्यापाराची वेळ वाढविण्याची तयारी करण्यात येत आहे. त्यातंर्गत ट्रेडिंग वेळ वाढविण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही वेळ वाढविण्यात येऊ शकते. अर्थात याविषयीची चर्चा केवळ प्राथमिकस्तरावर आहे.
बाजार नियामक सेबीने 2018 साली याविषयीचा आराखडा तयार केला होता.त्यामध्ये शेअर बाजारातील व्यापार वेळेत वाढ करण्याचा महत्वाचा मुद्या मांडण्यात आला होता. गेल्या जानेवारी महिन्यातही सेबीने याविषयीच्या एका दस्ताऐवजात याविषयीची चर्चा केली होती. बाजारात कोणत्याही कारणाने ट्रेडिंग प्रभावित झाले. त्याला अडथळा आला तर 15 मिनिटात याविषयीची सूचना देण्यात येणार आहे.
अर्थात अनेकदा काही तांत्रिक अथवा इतर अडथळ्यांमुळे बाजाराचे कामकाज प्रभावित झाले आहे. त्यावेळी सेबीने गुंतवणूकदारांना तेवढ्या वेळेची भरपाई करुन दिली आहे. त्यासाठी अनेकदा दीड ते दोन तासांचा अवधी वाढवून देण्यात आला आहे. त्यामुळे त्या दिवशीचे व्यवहार पूर्ण करता आले आहे. गुंतवणूकदारांचे होणारे नुकसान टाळण्यात आले आहे.
देशातील मोठे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज इक्विटी सेगमेंटमध्ये व्यापारी तास वाढविण्याच्या तयारीत आहे. अर्थात ही चर्चा काही पहिल्यांदा होत नाहीये. यापूर्वीही वेळ वाढविण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरवेळी याविषयीची खमंग चर्चा रंगते आणि गुंतवणूकदारांसह ब्रोकर्सला हा विषय चघळायला मिळतो. बाजाराची वेळ दोन तासांनी वाढविल्यास त्याचा अनेक घटकांवर परिणाम होईल. त्याची तयारी करणेही आवश्यक आहे.
स्टॉक मार्केटमध्ये व्यापाराची वेळ वाढविण्याच्या या चर्चेवर आता विरोधी सूरही उमटत आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज वेळ वाढविण्याच्या बाजूने आहे. Zerodha सीईओ नितीन कामथ यांनी ट्विट करत याविषयीच्या निर्णयाला विरोध केला आहे. जर असा निर्णय घेतला तर त्याचा ट्रेडर्सवर प्रतिकूल परिणाम होईल. ट्रेड टाईमिंग वाढविल्याने कमी भागीदारी आणि अधिक काळासाठी लिक्विडिटीची समस्या येऊ शकते, , असा दावा त्यांनी केला.