शेअर बाजारात पडझड, तेजीच्या तुफानाला लागला ब्रेक

Share Market | जोरदार उसळीनंतर भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी पहिल्या सत्रात सपाटून मार खाल्ला. निर्देशांक 300 अंकांनी घसरला. ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमच्या शेअरला मोठा फटका बसल्याचे दिसले. बाजार उघडताच या शेअरमध्ये 20 टक्क्यांचे लोअर सर्किट लागले. उद्या या आठवड्याचे शेवटचे व्यापारी सत्र आहे. त्यापूर्वीच बाजाराच्या वारुला लगाम लागला.

शेअर बाजारात पडझड, तेजीच्या तुफानाला लागला ब्रेक
Follow us
| Updated on: Dec 07, 2023 | 10:27 AM

नवी दिल्ली | 7 डिसेंबर 2023 : भारतीय शेअर बाजाराने सलग 7 व्यापारी सत्रात मोठी झेप घेतली. बीएसई आणि एनएसईचा वारु उधळला. गुरुवारी या वारुला लगाम लागला. गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने लाल निशाणी फडकवली. सुरुवातीच्या व्यापारी सत्रात सेन्सेक्स 262 अंकांच्या घसरणीसह 69,391 अंकावर ट्रेड करत आहे. तर निफ्टीत 70 अंकांची पडझड झाली आहे. ऑनलाई पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमला त्याचा फटका बसला. या शेअरला 20 टक्क्यांचे लोअर सर्किट लागले. तर अदानी पोर्ट्स आणि अदानी एंटरप्राईजेसने निफ्टीत आघाडी घेतली आहे.

निवडणुकीनंतर घौडदौड

गेल्या तीन दिवसांपासून शेअर बाजाराचे वारु उधळले होते. बाजारात तुफान तेजीचे सत्र होते. सेन्सेक्स आणि निफ्टीने प्रत्येक दिवशी नवीन विक्रम केला. निवडणूक निकालानंतर शेअर बाजारात तुफान तेजी आली. सोमवारी सेन्सेक्स 1300 अंकांनी वधारला. तर निफ्टीने रॉकेट भरारी घेतली. निफ्टी 21000 अंकांवर पोहचला. पण गुरुवारी ही रॅली टिकली नाही. बाजार उघडताच पडझडीला सुरुवात झाली. बातमी लिहेपर्यंत सेन्सेक्समध्ये 0.38 टक्क्यांची घसरण होऊन तो 69, 383 अंकांच्या घरात होता. तर निफ्टीत 0.32 टक्क्यांची घसरण झाली होती. निफ्टी 20,872 अंकावर होता.

हे सुद्धा वाचा

पेटीएमला फटका

या पडझडीचा मोठा फटका पेटीएमला बसला. बाजार उघडताच पेटीएमच्या शेअरला 20 टक्क्यांचे लोअर सर्किट लागले. निफ्टी 50 मध्ये ओएनजीसीचे शेअर 2.57 टक्क्यांनी घसरले. हिंदुस्थान युनिलिव्हरचा शेअर 2.24 टक्के घसरला. भारती एअरटेल, अपोलो हॉस्पिटल, बजाज फायनान्सच्या स्टॉकने गुंतवणूकदारांची निराशा केली. तर अदानी पोर्ट्स आणि अदानी एंटरप्राईजेसने निफ्टीत आघाडी घेतली आहे. अल्ट्राटेक सिमेंट, पॉवरग्रिड, एशियन पेंट्स, मारुती, टेक महिंद्रा आणि एचसीएलने हिरवे निशाण फडकावल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला.

निफ्टी 21000 अंकावर जाणार?

सलग सात व्यापारी सत्रात बाजाराने मोठी घौडदौड केली. निफ्टीने सर्वकालीन उच्चांक 20,961.95 तर सेन्सेक्सने ऑलटाईम हाय 69,744.62 गाठला आहे. भारतीय शेअर बाजाराने सलग तेजीचे सत्र आरंभले. या आठवड्यात निफ्टी 21000 अंकांचा पल्ला गाठण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स फायद्याचे गणित आजमावत असल्याने बाजार एका बाजूला झुकला आहे. पण तज्ज्ञांना अजूनही निफ्टी 21000 अंकावर जाण्याचा अंदाज आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.