शेअरबाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 611 अंकाच्या वाढीसह बंद; गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण

शेअर बाजारामध्ये आज सलग दुसऱ्या दिवशीही तेजी कायम राहिल्याचे दिसून आले. सेन्सेक्स 611 अंक तर निफ्टी 185 अंकाच्या वाढीसह बुधवारी बंद झाले.

शेअरबाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 611 अंकाच्या वाढीसह बंद; गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण
शेअर बाजार
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 6:32 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारामध्ये आज सलग दुसऱ्या दिवशीही तेजी कायम राहिल्याचे दिसून आले. सेन्सेक्स 611 अंक तर निफ्टी 185 अंकाच्या वाढीसह बुधवारी बंद झाले. बुधवारी सेन्सेक्स 56,931 अंकांवर तर निफ्टी 16955 वर पोहोचला. आज जवळपास सर्वच क्षेत्रात तेजी दिसून आली. विशेषा: फार्मा आणि आयटी सेक्टमधील कंपन्याचे शेअर मोठ्याप्रमामात वधारले. मागील आठवड्यात झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर या आठवड्यात तेजी दिसून येत असल्याने, गुंतवणूकदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

शेअर बाजारामधील तेजीची कारणे

या आठवड्यात शेअर बाजारात तेजी येण्याचे मुख्य कारण म्हणजे, आतंरराष्ट्रीय बाजारातून सकारात्मक संकेत मिळत आहेत. डॉलरमध्ये घसरण झाली आहे. तर सलग दोन दिवसांपासून भारतीय चलनाची किंमत वधारत आहे, तसेच विदेशी गुंतवणूकदारांचा देखील गुंतवणुकीमधील कल वाढला आहे. बँकिंग क्षेत्रातील शेअरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असल्याचे पहायला मिळत आहे.आज रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर 2.42 टक्क्यांनी तर आयसीआयसीआय बँकेचे शेअर 0.74 टक्क्यांनी वाढले आहेत.

सर्वाच क्षेत्रात तेजी

आज शेअर बाजारात सर्वच क्षेत्रामध्ये तेजी दिसून आली. सर्वाधिक तेजी ही रियल्टी क्षेत्रामध्ये दिसून आली. रियल्टी क्षेत्रातील कंपनीच्या शेअरमध्ये तीन टक्क्यांची वाढ झाली. तर फार्मा क्षेत्रातील शेअरच्या किमती 1.99 टक्क्यांनी वधारल्या  आहेत. बँकिंग क्षेत्रामध्ये देखील तेजी असून, बँकिंग क्षेत्रातील शेअर हे 1.74  टक्क्यांनी वधारले आहेत. दुसरीकडे मेटल आणि पेट्रोलियम कंपन्यांच्या शेअरमध्ये अनुक्रमे 1.22  आणि 1.49 टक्क्यांची वाढ झाली.

संबंधित बातम्या

चिनी मोबाईल कंपन्यांवर आयकर विभागाचा छापा; दिल्लीसह महत्त्वाच्या शहरातील कार्यालयांची झाडाझडती

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.