शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्समध्ये 840 तर निफ्टीमध्ये 236 अकांची वाढ

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी आज शेअरमार्केटमध्ये सकारात्मक संकेत दिसून येत आहेत. आज शेअर मार्केट सुरू होताच पहिल्या सत्रात सेन्सेक्सने उसळी घेतली. सेन्सेक्स हजार अंकांनी वाढला. बँकिंग, ऑटोमोबाईल आणि मेटल क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी आली आहे.

शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्समध्ये 840 तर निफ्टीमध्ये 236 अकांची वाढ
शेअर बाजार
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 3:59 PM

मुंबई : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी आज शेअर मार्केटमध्ये सकारात्मक संकेत दिसून येत आहेत. आज शेअर मार्केट सुरू होताच पहिल्या सत्रात सेन्सेक्सने उसळी घेतली. सेन्सेक्स हजार अंकांनी वाढला. बँकिंग, ऑटोमोबाईल आणि मेटल क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी आली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा सेन्सेक्स 840 अकांच्या वाढीसह 57,587 अंकांवर स्थिरावला होता. तर दुसरीकडे निफ्टीमध्ये देखील वाढ झाली आहे. निफ्टी 236 अकांनी वाढली असून, 17150 अंकावर पोहोचली आहे. गेल्या आठवड्यामध्ये सेन्सेक्स घसरला होता.मात्र या आठवड्यात सकारात्मक सुरूवात झाली आहे.

तेजी कायम राहण्याचा अंदाज

सेन्सेक्स वधारल्याने भारतीय शेअर बाजाराची मार्केट कॅप देखील वाढली आहे. मार्केट कॅपमध्ये 0.85  टक्क्यांची वाढ झाली आहे. केवळ भारतीयच नाही आशियातील सर्वच शेअर बाजारांमध्ये सध्या तेजीचे वातावरण आहे.  गुंतवणूकदारांचा शेअर खरेदीकडे कल वाढला असून, बँकिंग, ऑटोमोबाईल आणि मेटल क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची मागणी वाढली आहे. दरम्यान पुढील काही दिवस शेअर बाजारामध्ये तेजीचे वातावरण कायम राहाणार असल्याचा अंदाज शेअर मार्केटमधील गुंतवणूक तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनच्या बातम्या आल्यानंतर सुरुवातीला शेअर मार्केटमध्ये घसरण झाली होती. सेन्सेक्स तब्बल 1600 अंकांनी कोसळला होता. मात्र आता या सावटातून शेअर बाजार बाहेर पडला असून, आज सेन्सेक्सने एक हजार अंकांची उसळी घेतली.

गुंतवणूकदारांचा 3.30 लाख कोटींचा फायदा

दरम्यान आज दिवसभर शेअर मार्केटमध्ये तेजी असल्याने, गुंतवणूकदारांची चांदी झाल्याचे पहायला मिळाले. गुंतवणूकदारांचा मोठा फयदा झाला आहे. नफ्यात एकूण 3.30 लाख कोटींची भर पडली आहे. या नफ्यासह भारतीय शेअर बाजाराची मार्केट कॅप देखील 0.85 टक्क्यांनी वाढली आहे.  तसेच येणाऱ्या काळात अनेक कंपन्या आपले आयपीओ जाहीर करणार असल्याने शेअर मार्केटमध्ये तेजीचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या 

IRCTC चा मोठा निर्णय; खासगी कंपन्यांना लवकरच मिळणार थीम आधारित रेल्वे चालवण्याची परवानगी

घर नको पण अटी आवर; साधा पंखा असला तरी मिळणार नाही ‘पंतप्रधान आवास’चा लाभ

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचे भाव

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.