Stock market updates : शेअर बाजारात पडझड, सेंसेक्स 1,100 अकांनी कोसळला, गुंतवणूकदारांना मोठा फटका
चार दिवसांच्या दीर्घ सुटीनंतर आज सोमवारी शेअर बाजार (Stock Market) पुन्हा एकदा सुरू झाला. मात्र शेअरबाजार सुरू होताच पहिल्याच सत्रात गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. शेअर मार्केटमध्ये मोठी उलथापालथ पहायला मिळाली.
चार दिवसांच्या दीर्घ सुटीनंतर आज सोमवारी शेअर बाजार (Stock Market) पुन्हा एकदा सुरू झाला. मात्र शेअरबाजार सुरू होताच पहिल्याच सत्रात गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. शेअर मार्केटमध्ये मोठी उलथापालथ पहायला मिळाली. सेंसेक्समध्ये मोठी घसरण झाली. सेंसेक्स (Sensex) तब्बल 1,100 अकांनी घसरला तर दुसरीकडे निफ्टीमध्ये (Nifty) देखील तब्बल 281 अकांची घसरण पहायला मिळाली. सेंसेक्स 1 हजार 100 अकांच्या घसरणीसह 57,109 अंकांवर पोहोचला तर निफ्टी 281 अंकाच्या घसरणीसह 17,194 अकांवर पोहोचली आहे. शेअर बाजार गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार असा चार दिवस बंद होता. चार दिवसांनंतर आज शेअर बाजार सुरू होताच शेअर बाजरात गुंतवणूकदारांना तेजीची अपेक्षा होती. मात्र सेंसेक्समध्ये झालेल्या घसरणीने गुंतवणूकदरांच्या या अपेक्षेवर पाणी फिरवले आहे.
इन्फोसिसचे शेअर कोसळले
सोमवारी शेअर बाजार सुरू होताच मोठी उलथापालथ झाली. विक्रीचा दबाव वाढल्याने सेंसेक्स पहिल्याच सत्रामध्ये 1 हजार 100 अकांनी घसरला. तर निफ्टीमध्ये देखील 281 अकांची घसरण झाली. पहिल्याच सत्रामध्ये शेअर बाजार कोसळल्याने गुंतवणूकदारांची निराशा झाली. कोट्यावधीचा फटका बसला. आज हेवीवेट, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, टीसीएस, रिलायन्स आणि आयसीआयसीआयच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली, सध्या सेंसेक्स 1,230 अंकाच्या घसरणीसह 57,109 अंकावर कारभार करत आहे.
गुतंवणूकदारांना 3.80 लाख कोटींचा फटका
सोमवारी शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली, शेअर बाजारावर विक्रीचा दबाव वाढल्यामुळे पहिल्याच सत्रामध्ये सेंसेक्स 1 हजार 100 अंकानी कोसळला तर निफ्टी देखील 281 अंकांनी घसरली. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. गुंतवणूकदारांना तब्बल 3.80 लाख कोटींचा फटका बसला आहे. एकट्या इंन्फोसीसच्या शेअरमधील गुंतवणूकदारांचे 40 हजार कोटी रुपये बुडाले आहेत.
Sensex plunges over 1000 points in early trade, currently at 57,323; Nifty trading at 17,212
— ANI (@ANI) April 18, 2022
संबंधित बातम्या
लवकरच ‘GST’च्या स्लॅबमध्ये बदलाची शक्यता; सर्वसामान्यांना बसणार आर्थिक फटका, ‘अशी’ असेल नवी रचना
जगभरात भाववाढीचा आगडोंब : भारतीयांच्या खिशावर भार, महागाईने अमेरिका-ब्रिटनसह उर्वरित देशही धास्तावले
दिलासादायक! पंतप्रधान मोदींच्या काळात गरीबीचे प्रमाण कमी होण्याचा दर वाढला; जागतिक बँकेची माहिती