Stock Market : सेन्सेक्स सूसाट, गुंतवणूकदारांना छप्परफाड कमाई

Stock Market : स्टॉक मार्केटने गुंतवणूकदारांना निराशेतून बाहेर आणले. गेल्या सात दिवसांपासून अनेक शेअरने जोरदार कामगिरी बजावली. सेन्सेक्सने आठवड्यात कमाल केली. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला.

Stock Market : सेन्सेक्स सूसाट, गुंतवणूकदारांना छप्परफाड कमाई
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 8:17 PM

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजार (Share market) सलग सातव्या दिवशी तेजी दिसून आली. आजही सेन्सेक्स आणि निफ्टी (Sensex-Nifty) तेजीसह बंद झाले. सलग सातव्या व्यापारी सत्रात तेजीचा हंगाम सुरुच होता. मंगळवारी सेन्सेक्समध्ये 311 अंकांची तेजी दिसून आली. या तेजीनंतर सेन्सेक्सने 60,000 अंकांचा टप्पा ओलांडला. तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारातील तेजी आणि परदेशातील गुंतवणुकीचा ओघ सुरु असल्याने हा गुंतवणूकदारांचा फायदा झाला. मेटल, बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी वाढली. त्यामुळे बाजाराला मदत झाली. गुंतणूकदारांना कमाईची मोठी संधी मिळाली.

सेन्सेक्स-निफ्टी तेजीत 30 शेअर्सचा सेन्सेक्स 311.21 अंकांनी म्हणजे 0.52 टक्क्यांनी वधारला. आज सेन्सेक 60,157.72 अंकावर बंद झाला. व्यापारी सत्राच्या काळात सेन्सेक्स 421.17 अंकांनी वधारला. सेन्सेक्समध्ये वाढीचा हा सातवा दिवस आहे. या काळात सेन्सेक्स एकूण 2,544 अंकांनी म्हणजे 4.41 टक्क्यांनी वधारला. बीएसई प्रमाणेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजने पण निफ्टीत मंगळवारी 98.25 अंकांची म्हणजे 0.56 टक्क्यांची तेजी दिसून आली. एनएसई 17,722.30 अंकावर बंद झाला.

या कंपन्यांची कमाल सेन्सेक्समध्ये कोटक महिंद्रा, टाटा स्टील, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, मारुती सुझुकी, माहिंद्रा ॲंड महिंद्रा आणि भारतीय स्टेट बँक प्रामुख्याने फायद्यात राहिल्या. त्यांना मोठा फायदा झाला.

हे सुद्धा वाचा

विक्रीचे सत्र जोरात तर दुसरीकडे टाटा कन्सटलन्सी सर्व्हिसेज, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स, विप्रो आणि टाटा मोटर्सच्या शेअर्सचे मोठे नुकसान झाले. या शेअरमध्ये जोरदार विक्री झाली.

जागतिक बाजाराची स्थिती काय बीएसई स्मॉलकॅप 0.62 टक्क्यांनी वधारला. तर मिडकॅप 0.40 टक्क्यांनी वाढला. याशिवाय आशियातील इतर बाजारांमध्ये दक्षिण कोरियाची कॉस्पी, जापानची निक्की आणि हाँगकाँगचा हँगसँग हा बाजार फायदात राहिला. तर शांघाई कम्पोझिटला फार मोठे नुकसान झाले. युरोपातील प्रमुख बाजारात दुपारी तेजी दिसून आली. अमेरिकेतील बाजारा सोमवारी तेजीसह बंद झाले.

तिमाही निकालांची प्रतिक्षा तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदार आता कंपन्यांचे मार्च महिन्यातील निकालाची प्रतिक्षा करत आहेत. या हप्त्यात कंपन्यांच्या चौथ्या तिमाही निकालाची प्रतिक्षा आहे. हे निकाल या आठवड्यात येण्यास सुरुवात होईल. याशिवाय महागाई आणि औद्योगिक उत्पादनाशी संबंधित आकडे पण या आठवड्यात समोर येतील. शेअर बाजारातील आकड्यानुसार, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी सोमवारी 882.52 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केल्याचे दिसून आले.

अदानी यांचे शेअर चमकले स्टॉक मार्केटमध्ये गुरुवारच्या व्यापारी सत्रात अदानींचे इतर शेअर तेजीत होते. Adani Wilmar Ltd चा स्टॉक 3.43 टक्क्यांनी वधारला. हा स्टॉक 410.55 रुपये, Adani Ports and Special Economic Zone स्टॉक 0.77 टक्के तेजीसह 641.65 रुपये, Adani Enterprises च्या शेअरमध्ये 3.22 टक्के वाढीसह 1,752.60 रुपयांवर, Adani Power Ltd चे शेअर 1.03 टक्के तेजीसह 192.05 रुपयांवर, ACC Ltd चा स्टॉकमध्ये 1.42 टक्क्यांची वाढ होऊन तो 1,712 रुपयांवर आणि Ambuja Cenments Ltd चा शेअरमध्ये 0.70 टक्के वाढून 382.60 रुपयांवर बंद झाला.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.