Gold Silver Price Today : सोने सर्व रेकॉर्ड तोडणार! भावात जोरदार मुसंडी, चांदी लकाकली

Gold Silver Price Today : सोन्याने गुरुवारी थोडी उसंत घेत पाचव्या दिवशी दरवाढ नोंदवली आहे. सोन्यासह चांदीनेही जोरदार मुसंडी मारली. गेल्या महिन्यात 2 फेब्रुवारी रोजीचा रेकॉर्ड सोने आज दिवसभरात केव्हा तोडू शकते.

Gold Silver Price Today : सोने सर्व रेकॉर्ड तोडणार! भावात जोरदार मुसंडी, चांदी लकाकली
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 9:18 AM

नवी दिल्ली : पिवळधम्मक सोने (Gold Price Today) पुन्हा एकदा चकाकले आहे. नुसते चकाकले नाही तर त्याच्या भावाने अनेकांचे डोळे दिपले आहेत. सोन्याने जोरदार मुसंडी मारली आहे. सोने रॉकेटसिंग झाले आहे. सोमवारपासून सुरु असलेली सोन्याची मुलूखगिरी काही केल्या थांबताना दिसत नाही. भावात एक एक टप्पा पार करत सोने पुन्हा त्याच्या विक्रमी भावाजवळ येऊन ठेपले आहे. आज दिवसभरात सोने त्याच्या विक्रमाला गवसणी तरी घालेल अथवा हा विक्रम तरी मोडीत काढेल असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटत आहे. सोन्याने घेतलेली ही उसळी अनेकांना धक्का देणारी आहे. पण आंतरराष्ट्रीय घडामोडींचा (International Affairs) परिणाम डॉलरवर झाला असून, गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याला जवळ केले आहे. त्यासोबतच चांदीने विक्रमाकडे (Silver Price Today) धाव घेतली आहे.

यापूर्वी 2 फेब्रुवारी रोजी भावात, सोन्याने 58,880 रुपये तोळा तर चांदीने प्रति किलो 74,700 रुपये असा रेकॉर्ड नावावर नोंदवला आहे. त्यानंतर सोने सातत्याने घसरणीवर होते. मध्यंतरी एक महिना सोने-चांदीचे भाव एका निश्चित किंमतीच्या बाहेर गेले नाही. या आठवड्यात सोने-चांदीने मुड बदलत तुफान बॅटिंग केली आहे. सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. तर चांदीनेही दरवाढीची गुढी उभारली आहे.

3000 रुपयांची सूसाट वाढ गुरुवारी सोन्याने थोडा ब्रेक घेतला. पण शुक्रवारी किंमती पुन्हा भडकल्या. 17 मार्च रोजी 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात वाढ झाली. 22 कॅरेट सोने प्रति तोळा 500 रुपयांनी वाधारुन 53,700 रुपये झाले. तर 24 कॅरेट सोन्यात 550 रुपयांची प्रति 10 ग्रॅम वाढ होऊन हा भाव 58,700 रुपये प्रति तोळा झाला. गेल्या शुक्रवारी 10 मार्च रोजी सोने 383 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले होते. त्यावेळी भाव 55669 रुपये होता. आठवड्याभरात 3031 रुपयांची वाढ झाली.

हे सुद्धा वाचा

असा झाला बदल

  1. शुक्रवारी, 17 मार्च रोजी सोने 500 रुपये तोळा महागले
  2. गुरुवारी सोन्याने भाव वाढीत ब्रेक घेतला सोन्याने रिव्हअर्स गिअर टाकला
  3. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात प्रति तोळा 100, 110 रुपयांची घसरण झाली होती
  4. बुधवारी हा भाव 58,140 रुपयांवर पोहचला. सोन्यात प्रति तोळा 10 रुपयांची वाढ झाली
  5. मंगळवारी सोने झरझर चढले. हा भाव 58,130 रुपये तोळा झाला
  6. 13 मार्च रोजी सोमवारी सोने 1299 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले
  7. सोन्याचा भाव प्रति तोळा 56968 रुपयांवर पोहचला
  8. चांदीत गुरुवारी प्रति किलो 500 रुपयांची तेजी दिसून आली. चांदीचा भाव किलोमागे 69000 रुपये झाला
  9. शुक्रवारी चांदीत किलोमागे 200 रुपयांची वाढ झाली, हा भाव 69,200 रुपये इतका झाला

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.