छोटूरामची धमाल; आठ महिन्यातच 1450 टक्क्यांचा परतावा, गुंतवणूकदार मालामाल

Multibagger Share : या कंपनीने गुंतवणूकदारांना आठच महिन्यात मालामाल केले. हा शेअर 75 रुपयांहून थेट 1200 रुपयांपर्यंत वधारला. कंपनीच्या शेअर्संनी 8 महिन्यात गुंतवणूकदारांना 1450 टक्क्यांहून अधिकचा रिटर्न दिला. कंपनीच्या शेअरने बुधवारी 52 आठवड्यातील उच्चांक गाठला.

छोटूरामची धमाल; आठ महिन्यातच 1450 टक्क्यांचा परतावा, गुंतवणूकदार मालामाल
गुंतवणूकदार मालामाल
Follow us
| Updated on: Apr 24, 2024 | 4:06 PM

बोंडाडा इंजिनिअरिंग (Bondada Engineering ) ही एक छोटी कंपनी आहे. या कंपनीच्या शेअरने सध्या बाजारात धुमाकूळ घातला आहे. कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 8 महिन्यात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 8 महिन्यात बोंडाडा इंजिनिअरिंगचा शेअर 1450 टक्क्यांहून अधिक वधारला. बोंडाडा इंजिनिअरिंगचा शेअर बुधवारी 24 एप्रिल रोजी 5 टक्क्यांच्या तेजीसह 1226.10 रुपयांवर पोहचला. कंपनीच्या शेअर्सने बुधवारी 52 आठवड्यातील नवीन उच्चांक गाठला. ही कंपनी टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्टरशी संबंधित कामं करते. या कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यातील निच्चांक 142.50 रुपये आहे.

75 रुपयांहून 1200 रुपयांची भरारी

बोंडाडा इंजिनिअरिंगचा आयपीओ 75 रुपये किंमतीवर आला होता. कंपनीचा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी 18 ऑगस्ट 2023 रोजी उघडला होता आणि हा आयपीओ 22 ऑगस्टपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला होता. कंपनीचा शेअर 30 ऑगस्ट 2023 रोजी 142.50 रुपयांवर सूचीबद्ध झाला. सूचीबद्ध झाल्यापासून कंपनीचा शेअर नवनवीन रेकॉर्ड करत आहे. कंपनीचा शेअर आज 24 एप्रिल रोजी 1226.10 रुपयांवर पोहचला. आयपीओ ते आतापर्यंत या कंपनीने गुंतवणूकदारांना 1450 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

हे सुद्धा वाचा

6 महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये 400 टक्क्यांहून अधिक तेजी

Bondada Engineering चा शेअर गेल्या 6 महिन्यात 405 टक्क्यांनी उसळला. कंपनीचा शेअर 25 ऑक्टोबर 2023 रोजी 242.90 रुपयांवर होता. तर आज, 24 एप्रिल 2024 रोजी हा शेअर 1226.10 रुपयांवर पोहचला आहे. या वर्षभरात या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 194 टक्क्यांचा परतावा दिला आहे. कंपनीचा शेअर या वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी 2024 रोजी 417.10 रुपयांवर व्यापार करत होता. आता तो 1200 रुपयांच्या पुढे पोहचला आहे.

8 रुपयांहून 1700 रुपयांची भरारी

KPI Green Energy च्या शेअरने गेल्या 4 वर्षांत मोठा पल्ला गाठला. कंपनीचा शेअर 17 एप्रिल 2020 रोजी 8 रुपये होता. तर कंपनीचा शेअर गुरुवारी 18 एप्रिल 2024 रोजी 1773.35 रुपयांवर होता. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक 1895.95 रुपये इतका आहे. तर या शेअरचा 52 आठवड्यातील निच्चांक 309 रुपये आहे.

एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 457 टक्के उसळी

स्मॉलकॅप कंपनी केपीआय ग्रीन एनर्जीचा शेअर गेल्या एका वर्षात 457 टक्क्यांनी उसळला. कंपनीचा शेअर 18 एप्रिल 2023 रोजी 318.77 रुपयांवर होता. तर या कंपनीचा शेअर आज 18 एप्रिल 2024 रोजी 1773.35 रुपयांवर आहे. गेल्या सहा महिन्यात सोलर कंपनीच्या शेअरमध्ये 207 टक्क्यांची जबरदस्त उसळी दिसून आली. एकाच वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 86 टक्क्यांची तेजी दिसून आली.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.