LPG Subsidy : तर संपणार का LPG वरील सबसिडी? तज्ज्ञांनी सांगतिलं खरं गणित
अर्थसंकल्पामध्ये पेट्रोलियम सबसिडी संपवणं हे भर म्हणून पाहिली जात आहे. याबद्दल लोकांच्या मनातही अनेक शंका आहेत.
LPG Gas Cylinder Subsidy : सिलेंडरबद्दल एलपीजी सबसिडी (LPG Subsidy) सरकार संपवण्याच्या तयारीत असल्याची बातमी सध्या समोर येत आहे. खरंतर, अर्थसंकल्पामध्ये पेट्रोलियम सबसिडी संपवणं हे भर म्हणून पाहिली जात आहे. याबद्दल लोकांच्या मनातही अनेक शंका आहेत. जाणून घेऊयात यासंबंधी महत्त्वाच्या गोष्टी. (subsidy decrease in budget lpg subsidy may end or lpg gas cylinder price hike)
वित्त मंत्रालयाने 2022 या आर्थिक वर्षासाठी पेट्रोलियम अनुदान कमी करून 12,995 कोटी केलं आहे. तर दुसरीकडे उज्ज्वला योजनेंतर्गत लाभार्थ्यांची संख्या एक कोटीपर्यंत वाढवण्याचंही लक्ष्य सरकारने ठेवलं आहे. त्यामुळे एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवण्यामुळे त्यावरचा अनुदानाचा बोजा कुठेतरी कमी होईल अशी अपेक्षा आहे. यामुळेच केरोसीन आणि एलपीजीच्या किंमतींमध्येही सतत वाढ दिसून येत आहे.
LPG महागला
वाढत्या महागाईने एकदा पुन्हा सामान्य माणसाला झटका दिला आहे. (LPG Gas Cylinder Price Hiked). घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरचे दर जारी केले आहेत. सिलेंडरचे दर 25 रुपये प्रति सिलेंडरने वाढले आहेत. व्यावसायिक सिलेंडरचे दर 6 रुपयांने घसरले आहेत. यापूर्वी कमर्शियल एलपीजी सिलेंडर (19 kg) च्या दरात 190 रुपये प्रति सिलेंडरची वाढ करण्यात आले होते
सध्या घरगुती गॅसच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 719 रुपये झाली आहे. हे नवे दर 5 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले आहेत. पण अशात गॅसची सबसिडी सरकार बंद करणार असल्याच्या बातम्या सुरू आहे. याबद्दल सखोल माहिती काढण्यासाठी आम्ही तज्ज्ञ नरेंद्र तनेजा यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की, सबसिडीवरली कोणताही निर्णय सरकार घेणार एखादा अधिकारी नाही.
केरोसिन सबसिडी संपवण्याची गोष्ट खूप दिवसांपासून सुरू आहे. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे त्याचा गैरवापर टाळणं. दुसरं कारण की आता गावा-गावांमध्ये वीज पोहोचली आबे. त्यामुळे तिथेही केरोसिचा गरज राहिली नाही. त्यामुळे त्याची सबसिडी संपवण्याबद्दल बोललं जात आहे.
पण जर एलपीजीविषयी बोलायचं झालं तर उज्ज्वला योजनेंतर्गत लाभार्थ्यांची संख्या एक कोटी करण्यासाठी हे केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण त्यांची संख्यातर वाढतच आहे. जे लोक सबसिडी सोडत आहेत ते समर्थवान आहे. नोकरी आणि व्यवसायातून त्यांची चांगली कमाई होत आहे. मग ते सबसिडी का घेतील?
एलपीजीच्या किंमती वाढत आहेत
तज्ज्ञ तनेजा हे पुढे म्हणाले आहेत की, एलपीजी हा नैसर्गिक वायू नाही आहे. तो एक द्रव गॅस आहे. एलपीजी म्हणजे लिक्विड पेट्रोलियम गॅस. ते कच्च्या तेलापासून बनवलं आहे. यामुळे जर पेट्रोलची किंमत वाढली तर त्याचा एलपीजीवरही परिणाम होतो, म्हणजेच एलपीजीच्या किंमतीतही वाढ होत आहे.
सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समजा की सिलेंडरवर सरकार 150 रुपये अनुदान देत आहे. 14.2 किलो घरगुती गॅस सिलिंडरची किंमत सुमारे 700 रुपये आहे. अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते. म्हणजेच लाभार्थ्यास 700 रुपये किंमतीचा एलपीजी 550 रुपयांना मिळतो.
अशात घरेलू गॅस सिलेंडर त्याला 550 रुपयांना पडतो. पण आता त्याला 600 रुपयाला घ्यावा लागेल. हा दर पेट्रोलप्रमाणे बदलत राहतो. पण म्हणून याचा अर्थ नाही की सरकारनं अनुदान कमी केलं किंवा से सबसिडी संपवतील. (subsidy decrease in budget lpg subsidy may end or lpg gas cylinder price hike)
संबंधित बातम्या –
LPG नंतर आता CNG आणि PNG गॅसही महागला, इथे वाचा ताजे दर
Petrol Diesel Price Today: दिल्लीत पेट्रोल 87 रुपये पार; डिझेल खूप महाग; मुंबईत भाव काय?
तुमच्याही गाडीला मिळेल सनरूफ फीचर, स्वस्तात आहे खास ऑफर
(subsidy decrease in budget lpg subsidy may end or lpg gas cylinder price hike)