मोफत सेवा देऊन ही Jio ने कसा कमवला करोडो रुपयांचा नफा, जाणून घ्या

Jio ही भारतातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे. ज्याचं व्हिजन मुकेश अंबानी यांनी १० वर्षाआधीच तयार केलं होतं. मुकेश अंबानी यांनी ही कंपनी हळूहळू सर्वाधिक युजर असलेली कंपनी बनली आहे. पण मुकेश अंबानी यांच्या डोक्यात ही आयडिया आली कशी. त्यांनी लोकांना स्वस्त डेटा का ऑफर केला आणि त्यातून आज मोठी कमाई कशी करत आहेत. जाणून घ्या A to Z माहिती.

मोफत सेवा देऊन ही Jio ने कसा कमवला करोडो रुपयांचा नफा, जाणून घ्या
jio
Follow us
| Updated on: Jul 18, 2024 | 6:11 PM

जिओ आज भारतातील सर्वात मोठे मोबाईल नेटवर्क असलेली कंपनी बनली आहे. भारतात जिओचे जवळपास 47 कोटी ग्राहक आहेत. जी भारतातील तिसरी सर्वात मोठी दूरसंचार ऑपरेटर कंपनी आहे. मोफत सेवा देत सुरु झालेल्या कंपनीने आर्थिक वर्ष 2020 मध्ये तब्बल 12,537 कोटी रुपये नफा कमवला होता. ग्राहकांना 2 वर्ष मोफत सेवा देणारी ही कंपनी आता मोठा नफा कमवत आहे. पण जिओ कंपनी स्थापन करण्याची आयडिया मुकेश अंबानी यांना आली कशी? जिओने कोणतं बिझनेस मॉडेल वापरलं याबाबत अनेकांना जाणून घ्यायला आवडेल.? या बातमीत आपण रिलायन्स जिओच्या बिझनेस मॉडेलवर तपशीलवार चर्चा करणार आहोत. जिओचे धोरण, उत्पादन विभागणी, स्पर्धात्मक विश्लेषण याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

JIO ची आयडिया आली कशी?

मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी अमेरिकेत शिक्षणासाठी गेली होती. कॉलेजला सुट्ट्या लागल्याने ती घरी आली होती. या दरम्यान ती काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटचा वापर करत होती. पण इंटरनेट इतकं धिम्या गतीनं सुरु होतं की, तिने वडिलांना म्हटलं की, पप्पा हे काय. इंटरनेट किती स्लो चालत आहे. यावरुनच मुकेश अंबानी यांना प्रश्न पडला की, घरात सर्व प्रकारचे इंटरनेट कनेक्शन असून देखील इतका त्रास होत आहे. तर मग सर्वसामान्य लोकांचं काय होत असेल. त्यावर त्यांनी रिसर्च करायला सुरुवात केली. तज्ज्ञांना बोलवलं आणि माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी चार गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं. पहिलं होतं कव्हरेज. भारतात इंटरनेटचं कव्हरेच फक्त १५ ते २० टक्के लोकांपर्यंत होतं. तेच अमेरिकेत ७० टक्के लोकांकडे होतं. त्यांना मिळत असलेल्या डेटाची क्वालिटी चेक केली. तेव्हा त्यांना कळालं की, शहरातच त्याची इतकी वाईट क्वालिटी मिळत आहे तर मग खेड्या गावात काय होत असेल. डेटा पण खूप महाग होता जो सगळ्यांना परवडत नव्हता. म्हणून याला स्वस्त केलं पाहिजे तरच सर्वसामान्य लोकांना तो परवडेल असं वाटलं. त्यांना या कन्सेप्टमध्ये मोठी संधी दिसली आणि त्यांनी यावर काम सुरु केलं.

मुकेश अंबानी यांनी लिहून काढलं व्हिजन

मुकेश अंबानी यांनी आपल्या हाताने व्हिजन लिहून काढलं. पुढच्या १० वर्षात टेलिकॉमचे भविष्य काय असेल यावर त्यांनी ३६ पानांचं व्हिजन लिहिलं होतं. त्यानंतर त्यांनी ते त्यांच्या कंपनीतल्या लोकांना पाठवून दिलं. आता त्यावर काम सुरु झालं होतं. हळूहळू ते सत्यात उतरवण्यासाठी संपूर्ण रिपोर्ट तयार झाला. मग ठरलं जिओ सुरु करण्यासाठी त्यांनी तब्बल दीड लाख कोटीची गुंतवणूक करण्याचं ठरवलं. पण पहिली सर्वात मोठी अडचण होती की लायसन्स कसं मिळवायचं. दुसरी अडचण होती की, टॉवर कसे उभे करायचे, तिसरी अडचण होती की जमिनीखालून लाईनी कशा टाकायच्या. चौथी गोष्ट होती की मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यात संपत्तीची विभागणी झाली तेव्हा एक करार झाला होता, तो म्हणजे कोणीही एकमेकांच्या बिझनेसमध्ये यायचं नाही. आता टेलिकम्युनिकेशन कंपनी अनिल अंबानी यांंच्याकडे गेली होती. मग त्यांनी एकएक करत सगळ्या अडचणींवर मात केली. त्यांनी हा करार २०१० मध्ये मोकळा करुन घेतला.

दुसरी गोष्ट होती आता लायसन्स कसं मिळवायचं. कारण सगळ्या कंपन्या 3G वर सुरु होत्या. मुकेश अंबानी यांना मात्र 4G ची सुरुवात करायची होती. आता मुकेश अंबानी यांनी ती कंपनी शोधली जिच्याकडे 4G लायसन्स होतं आणि सगळ्या शहरात टॉवर लावण्याची परवानगी होती. आता या कंपनीबाबत अशी पण चर्चा आहे की ही कंपनी मुकेश अंबानी यांनीच सुरु केली होती. फक्त ते या कंपनीत समोर आले नव्हते, कारण तो करार झाला होता. 2010 मध्ये करार संपताच त्यांनी त्या कंपनीत ९५ टक्के हिसेदारी खरेदी करत कंपनी आपल्या नावावर करुन घेतली.

तिसरी गोष्ट होती ती म्हणजे टॉवर कसे लावायचे. स्वताचे एक टॉपर लावण्यासाठी ३० लाखाचा खर्च होता. पण आयआयटी बॉम्बेने एक टॉवर मॉडेल तयार केला होता जो फक्त १२ लाखात तयार होत होता. मुंबईत सगळ्या कंपनींचे मिळून 3600 टॉवर होते. पण एकट्या मुकेश अंबानी यांनी मुंबईत 8000 टॉवर लावले. कारण त्यांचं व्हिजन क्लिअर होतं.

आधी कॉपरच्या वायरी येत होत्या. पण या वायरी चोरी होण्याचं प्रमाण जास्त होतं. कारण यामध्ये तांबे मिळायचं. मग मुकेश अंबानी यांनी पुन्हा डोकं चालवलं. त्यांनी फायबरची वायर टाकण्याचं काम सुरु केलं. ही केबल चोरी केली तरी ती विकता येत नव्हती. त्यामुळे ते नुकसान होण्याचा देखील संबंध नव्हता. केबलचं जाळ पसरवत असताना त्यांनी लोकांना हायर केलं. लोकल लोकांनाच त्याची जबाबदारी दिली. जोपर्यंत वायर पसरत नाही तोपर्यंत अशा लोकांना कामाला ठेवलं.

आता सेटअप पूर्ण झालं होतं. मग प्रश्न येतो कंपनी कमवते कशी. ही तर फ्री मध्ये सेवा देत होती. मुकेश अंबानी यांचा मास्टर प्लान वेगळाच होता. कंपनीने सर्वात स्वस्त डेटा ऑफर केला. ज्यामुळे इतर कंपन्या स्पर्धा करुच शकल्या नाहीत. फक्त एअरटेल, बीएसएनएल आणि व्हीआय या तीनच कंपन्या उरल्या. इतर सगळ्या कंपन्या गायब झाल्या. मुकेश अंबानी यांनी त्यावेळी जाहीर केलं होतं की, जिओ एक टेलिकॉम कंपनी नाहीये. हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला जे काय करायचं आहे ते सगळं मी तुम्हाला देणार.

रिलायन्स जिओची 5 सप्टेंबर 2016 रोजी जगभरात सार्वजनिकरित्या उपलब्ध करण्यात आली. पण त्याच्यासोबत इतर सेवा ही सुरु केल्या. गाणे ऐकायचे आहे जिओ सावन लावा, खरेदी करायची आहे जिओ मार्ट आहे, सिनेमा बघायचा आहे जिओ व्हुवीज लावा. अशा प्रकारे जिओ एक मोठं व्हिजन घेऊन लॉन्च झाली होती. रिलायन्स रिटेल म्हणून ऑफलाईन पण आम्हीच आहोत आणि ऑनलाईन पण आम्हीच आहोत.

रिलायन्स जिओचे उत्पादन आणि सेवा

JioPages – Android उपकरणांसाठी एक वेब ब्राउझर JioChat – इन्स्टंट मेसेजिंग ॲप JioCinema – ऑनलाइन एचडी मूव्ही लायब्ररी JioCloud – क्लाउड-आधारित बॅकअप सेवा JioHealth – आरोग्य संबंधित सेवा ॲप JioNews – ताज्या बातम्या देणारे प्लॅटफॉर्म JioMeet – व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म JioMoney – ऑनलाइन व्यवहार ॲप JioSaavn – इंग्रजी आणि भारतीय भाषांमध्ये संगीत प्रवाहासाठी ॲप JioSecurity – सुरक्षा ॲप JioTV – टीव्ही चॅनल स्ट्रीमिंग सेवा JioVoice – VoLTE फोन सिम्युलेटर MyJio – Jio खाते आणि त्याच्याशी संबंधित डिजिटल सेवा व्यवस्थापित करा

4G ब्रॉडबँड सेवा 2016 मध्ये संपूर्ण भारतात सुरू झाली. नंतर 24 जून 2021 रोजी मुकेश अंबानी यांनी JioPhone Next लॉन्च करण्याची घोषणा केली. जिओची फेसबूक आणि गुगलसोबत भागीदारी आहे. मुकेश अंबानी यांची जिओमध्ये 67 टक्के भागीदारी आहे. इतर भागीदारी त्यांनी काही कंपन्यांना विकली आहे.

“हॅपी न्यू इयर ऑफर”: 2018 मध्ये, रिलायन्स जिओने “हॅपी न्यू इयर ऑफर” लाँच केली. ज्यामुळे लोकांना विनामूल्य अमर्यादित व्हॉइस आणि डेटा सेवा प्रदान केली जात होती. ही ऑफर यशस्वी झाली. कारण जिओला मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळाले. पण नंतर कंपनीच्या नेटवर्कवरील भार ही वाढला आणि डेटाचा वेग कमी झाल्याचा सामना करावा लागला. त्यानंतर मग  2019 मध्ये, Reliance Jio ने “Jio Diwali Dhamaka” ऑफर लाँच केली. ज्याच्या अंतर्गत 649 रुपये किंवा त्याहून अधिक प्लॅन रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना मोफत JioPhone देण्यात आला. ही ऑफर बरीच लोकप्रिय झाली, परंतु यामुळे JioPhone चा तुटवडा निर्माण झाला. 649 रुपयांच्या प्लॅनसह रिचार्ज केलेल्या अनेक ग्राहकांना JioPhone मिळू शकला नाही.

जिओचा सेटअप 100 कोटी लोकांना सपोर्ट करु शकतो इतका मोठा आहे. त्यामुळे त्यांना नंतर ही मोठी गुंतवणूक करावी लागणार नाही. आता जिओला व्हॉईस सर्विससाठी फक्त 8 पैसे लागतात तेच इतर कंपन्यांना 30 पैसे लागतात. अशा प्रकारे जिओ मोठी कमाई करत आहे.

जिओ लॉन्च झाल्यानंतर डिजीटल क्षेत्रात एक मोठी क्रांती झाली. कारण सर्वात स्वस्त डेटा जिओने सुरु केला. जिओमध्ये २० हजार लोकं काम करतात. जिओ लॉन्च करण्यासाठी त्यांनी जगातील अनेक एक्सपर्ट लोकं कामावर घेतली. ज्यांनी मोठ्या मोठ्या कंपन्यांसोबत काम केलंय.

जिओ एक वर्षाआधी एका युजरकडून 138 रुपये कमवत होती. नंतर 177 रुपये कमवू लागली आणि यामध्ये आता आणखी वाढ झाली आहे. कारण जिओ एकच नाही तर अनेक सेवा सुरु केल्या आहेत. अशा प्रकारे जिओने आपला विस्तार इतका वाढला आहे की नफा देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.