Sukanya Samriddhi Yojana : आता उरलेत केवळ 2 दिवस…झटपट करा हे काम; नाही तर बंद होईल सुकन्या खाते

SSY Scheme Rule Change : मोदी सरकारने 2015 मध्ये मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना सुरु केली होती. आता या योजनेत 1 ऑक्टोबरपासून मोठा बदल होत आहे. याविषयीचे निर्देश यापूर्वीच बँका आणि पोस्ट ऑफिसला देण्यात आले आहे. काय आहे हा बदल?

Sukanya Samriddhi Yojana : आता उरलेत केवळ 2 दिवस...झटपट करा हे काम; नाही तर बंद होईल सुकन्या खाते
सुकन्या समृद्धी योजना
Follow us
| Updated on: Sep 29, 2024 | 11:58 AM

मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी मोदी सरकारने सुकन्या समृद्धी योजनेत मोठा बदल केला आहे. हा बदल 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होत आहे. जर या नियमांचे पालन झाले नाही, तर योजनेचे खाते बंद होऊ शकते. मुलींचे शिक्षण आणि लग्नासाठी ही योजना महत्वपूर्ण मानण्यात येते. त्यासाठी पालकांना मुलीच्या नावे दरमहा एक ठराविक रक्कम जमा करावी लागते. SSY योजनेच्या खात्यावर या रक्कमेत व्याज मिळते. वयाच्या 18 व्या वर्षी मुलीला त्यातील काही रक्कम काढता येते.

केवळ 250 रुपयांत उघडा खाते

केंद्राच्या नरेंद्र मोदी सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरू केली आहे. या सरकारी योजनेत केवळ 250 रुपयांपासून खाते उघडता येते. या योजनेवर सरकार सध्या 8.2 टक्के व्याज देत आहे. ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. या योजनेत चक्रवाढ व्याजाने मुलीला लखपती होता येते. ही योजना पालकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे.

हे सुद्धा वाचा

असा झाला बदल

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सर्व सुकन्या समृद्धी योजनेच्या खातेदारांचे आई-वडील, कायदेशीर पालक यांचे पॅनकार्ड आणि आधार कार्ड जोडलेले असावेत. तसे नसेल तर पॅन कार्ड आणि आधार क्रमांक आणि संबंधित कागदपत्रांची प्रत जोडावी लागणार आहे. तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देशातील सर्व पोस्ट कार्यालयांना देण्यात आले आहेत. काही खातेदारांविषयी अथवा त्यांच्या कागदपत्रांविषयी शंका असल्याची त्याची माहिती वित्त मंत्रालयाला द्यावी लागणार आहे.

या योजनेत कायदेशीर पालकांनी मुलीच्या नावे खाते उघडले नसेल. म्हणजे इतर मुलींच्या नावे खाते असेल तर आता हे खाते कायदेशीर पालकांकडे हस्तांतरीत करावे लागणार आहे. सरकारचा यामागील हेतू अजून समोर आलेला नाही. पण हा नियम 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणार आहे. नियमांचे पालन न झाल्यास खाते बंद सुद्धा होऊ शकते.

या योजनेतंर्गत मुलीच्या नावे दर वर्षाला 1.5 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा केल्यास त्यावर व्याज आकरण्यात येत नाही. आयकर खात्याचे कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सवलत मिळते. 1.5 लाख रुपये 15 वर्षांपर्यंत जमा केल्यास एकूण 22,50,000 रुपये जमा होतील. त्यावर 8.2 टक्के दराने 46,77,578 रुपयांचे व्याज जमा होईल. म्हणजे मुलगी 21 वर्षांची झाली तर तिला एकूण 69,27,578 रुपये मिळतील.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.